Posts

अपयशाचा मित्र?

Image
  अपयशाचा मित्र ? मी तेव्हा ११वीत होतो. धडपड्या आणि खटपट्या माझा स्वभाव. त्यातूनच मी काहीबाही उद्योग करायचो. अर्थातच चांगल्या अर्थानं. मी तेव्हा   गुगल प्ले स्टोअरसाठी एका ॲपची निर्मिती केली. विद्यार्थ्यांना योग्य अभ्यासमंडळ आणि सहयोगी किंवा मित्र मिळवून देण्याचा प्रोग्रॅम मी विकसित केला. वेळोवेळी मला खाऊ आणि बक्षीसांसाठी मिळालेले ११ हजार रुपये, खर्च न करता साठवून ठेवले होते. त्याचा उपयोग हा ॲप तयार करण्यासाठी झाला. हा ॲप मी प्ले स्टोअरवर ठेवला. पहिल्या तीन तासातच त्याचे १५ हजार डाऊनलोड झाले. हा ॲप पाच दिवस धडधाकटपणे चालला. पाचव्या दिवशी डाऊनलोडची संख्या ३० हजारावर पोहचली. मला मिळालेल्या सर्व्हरला हे ओझं म्हणा की दाब म्हणा सहन करणं शक्य झालं नाही. मला सर्व्हरवर अधिक जागा हवी होती. ती घेण्यासाठी निधी म्हणजेच पैशांची गरज होती. माझी सगळी बचत संपलेली. मी कोरडा ठणठणीत ! आता काय करायचं ? मला प्रश्न पडला. इकडेतिकडे धावाधाव सुरु केली. अनेक मोठमोठ्या कंपन्याच्या बॉसेसना इमेल पाठवले. अशा नव्या आणि नावीण्यपूर्ण उद्योगांना मदत करणाऱ्या गुंतवणुकदारांना ईमेल केले. पण कुणाचाही प...

अभागी आणि दुर्देव्यी!

Image
  अभागी आणि दुर्देव्यी ! बेरिंग समुद्राचं नाव तुमच्या कानावरुन गेलयं का कधी ? या ठिकाणी २०१८ आणि २०१९ या दोन वर्षात भलतच विपरीत घडलं. काय घडलं नेमकं ? या दोन वर्षात या समुद्रातील १० अब्ज जीव नाहीसे झाले. बापरे ! कुठे गेले ते ? काय झालं त्याचं ? त्यांना कुणी पळवून नेलं का ? एखाद्या परग्रहावरुन आलेल्या यानात बसून ते परग्रहावर तर निघून गेले नाहीत ना ? की त्यांची हत्या झाली ? बापरे बाप ! किती हे प्रश्न ! आणि किती भयावह. दहा अब्ज जीव नाहीसे होतात नि त्याची कुणालाच खबरबात नसते म्हणजे काय ? मग ही फेक म्हणजे खोटी बातमी किंवा घटना तर नाही ना ? छे छे , मी कशाला खोटं सांगेन. पण मग तुम्ही कोण ? तुम्हालाच कसं ठाऊक हे सारं ? की तुम्हीही फेकच म्हणजे खोटेराव बनचुके ! छे छे , मी कशाला खोटे सांगू. कारण मी त्यावेळी तिथे होतोना. मी प्रत्यक्ष बघितलं की या जीवांचं काय झालं ते. हे १० अब्ज जीव नाहीसे झाल्या चं सगळयात आधी अमेरिकेतील अलास्का म्हणजे च बेरिंग समुद्र असलेल्या प्रदेशातील मच्छिमारांना कळलं. त्यांनी तेथील काही अधिकाऱ्यांना तसं कळवलं. युनायटेड स्टेट्स नॅशनल ओशनिक अँड ॲटमोस्फे...

ट्रिक्सपेक्षा संकल्पना महत्वाच्या!

Image
ट्रिक्सपेक्षा संकल्पना महत्वाच्या ! बारावीतील विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या असलेल्या बोर्डाच्या परीक्षेची तारीख गेल्याच आठवड्यात जाहीर झाली. १२ वीनंतर वेगवेगळया शाखेतील प्रवेशासाठीच्या कॉमन एंट्रस टेस्ट ( सीईटी ) च्या तारखेचीही घोषणा झाली आहे. नीट आणि जेईई परीक्षेची घोषणा झाली आहे. याचा अर्थ, घोडा मैदान अगदी जवळ आलं आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास जोरात सुरु असलेच. या क्लासमधून त्या क्लासमध्ये सारखी धावाधाव सुरु असणार. ही टेस्ट, ती टेस्ट अशा वेगवेगळया चाचणी परीक्षा त्यांना द्याव्या लागत असणार. हे चक्र स्वत:हून स्वीकारलं असल्यानं त्यातून शेवटच्या क्षणी बाहेर पडणं शक्य नाही आणि रडत बसणंही योग्य नाही. त्यामुळे पुढील काळात अधिकाधिक लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं पाहिजे. पूर्ण सत्य नाही. शिकवणी वर्गांमध्ये तर त्याचसाठी जातो ना, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असणार. ते काही अंशी खरं असलं तरी पूर्ण सत्य नाही. शिकवणी वर्गामध्ये, अभ्यासासाठी कमी आणि अधिकाधिक गुण कसे मिळवता येतील याचे ट्रिक्स आत्मसात करण्यासाठी जातो, हे वास्तव स्वीकारायला हवे. सीईटीमध्ये अधिकाधिक गुण मिळवून मन...

वाढदिवस

Image
  वाढदिवस कवैल्याचा दहावा वाढदिवस जोरात साजरा झाला.   त्याच्या आईबाबांनी हा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरीच छान पार्टी ठेवली. सगळं घर फुग्यांनी आणि फुलांनी सकाळी सकाळीच सजवलं. कैवल्यच्या सर्व मित्रांना त्याने वाढदिवस पार्टीसाठी बोलावलं. पार्टी दणक्यात झाली. दोन प्रकारचे केक, दोन प्रकारचे आईसक्रिम आणि गरम गरम समोसे, अहाहा ! असा सारा थाट! कैवल्य, कधी केक कापतो नि आपल्याला कधी या पदार्थावर ताव मारायला मिळते याची मुलं वाटच बघत होती. एकदाचं हॅप्पी बर्थ डे, झालं. कैवल्यने त्याच्या नावासह असलेलं एक गाणं युट्यूबर शोधून ठेवलं होतं. ते वाजवलं. याला बुवा हे फार मस्त जमतं, असं कौतुक जमलेल्या सर्वांनी केलं. कैवल्यच्या आईबाबांच्या डोळ्यातून कौतुक ओसंडून वाहू लागलं. आजीने त्याची लगेच नजर   काढली. आजोबा म्हणाले, असा हुषार मुलगा मी बघितलाच नाही आमच्या नात्यांमध्ये. या कौतुकाने कैवल्यची छाती फुगली. खाणंपिणं दणक्यात झालं. मुलं खेळण्यात दंग झाली. ज्याला हवं ते, ते खेळू लागली. त्यांच्या खेळाच्या भाषेत बोलू लागली. मुलं त्यांच्या राज्यात रममाण झाल्यावर त्यांचे आईबाबा कैवल्याच्या ...

यांना कसं कळतं?

Image
  यांना कसं कळतं?           तेजोमयी राहत असलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या एका बाजूला एक नाला वाहतो.या नाल्याच्या आसपास बरीच झाडं झुडपं उगवली आहेत.या झाडीमध्ये भटके कुत्रे ,मांजरी राहतात .झुडपांवर वेगवेगळे पक्षी येऊनजाऊन असतात. या ठिकाणी असणारे भटके कुत्रे आपसात खेळत असतात. त्यांचा हा खेळ अधूनमधून अलेक्झांडर टक लावून बघत असे. गेल्या काही दिवसांपासून मात्र या ठिकाणी भटकी कुत्री दिसणं बंद झालं.झाडी मधून कुत्र्यांचा आवाज आयला लागला. तो भुंकण्याचा नव्हता. तर, लहान मूल जसं रडतं तसा तो रडण्याचा होता. सुरुवातीला या रडण्याच्या आवाजाकडे आई-बाबा आणि तेजोमयीचं लक्षं गेलं नाही. पण दिवसभर आणि रात्रीसुध्दा हा आवाज जेव्हा कानावर पडू लागला तेव्हा बाबा वैतागून गेले.आईलाही त्रास व्हायला लागला. आईने तिच्या पध्दतीने त्या कुत्र्यांचा उध्दार केला. हे सगळं घडत असताना अलेक्झांडर खिडकीजवळ जावून हा आवाज ऐकत असल्याचं तेजोमयीच्या लक्षात आलं. तिने जेव्हा त्याला जेवायला बोलावलं,तेव्हा तो नेहमीप्रमाणे उड्या मारत, धावत आला नाही. तेजोमयीला आश्चर्य वाटलं. ती खिडकीजवळ गेली....

टिल्लू रागावला

Image
  टिल्लू रागावला आई ग,दारात पाऊल ठेवताच टिल्लू ओरडला. काय रे काय झालं ? आइने विचारलं. अगं मी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन येतो. टिल्लू म्हणाला. एकटाच ? असं काय अर्जंट काम आलय रे.आईनं विचारलं. मी आल्यावर सांगेन.एव्हढं बोलून टिल्लू पळालासुध्दा. त्याने दफ्तर तसंच टाकलं.शाळेचा गणवेश सुध्दा बदलला नाही.टिल्लू वांद्रेच्या शासकीय वसाहतीत राहायचा.त्याच्या घरासमोरच हनुमानजींच मंदिर होतं.कधी कधी पप्पांसोबत तो मंदिरात जाई. पण असं स्वत:हून जायचं म्हंटल्यावर आईस आश्चर्य वाटलं. टिल्लू काय करतो म्हणून आई दारातून बघू लागली.टिल्लू मंदिरात गेला,त्यावेळेस तिथे कुणीच नव्हतं. पुजारीही यायचा होता.टिल्लूने भक्तिभावाने हात जोडले.नंतर तो हनुमानजींना काहीतरी समजावून सांगण्यासाठी हातवारे करु लागला. आईला गंमत वाटली. पाच मिनिटांनी टिल्लू घरी परत आला. काय मिस्टर टिल्लू, हनुमानजींशी एवढं काय महत्वाचं काम होतं ? त्याला विनंती करायला गेला होतो कशाची रे ? रितेश सरंगीबद्दल. कोण हा रितेश ? तुझा मित्र आहे का ? त्याच्याबद्दल काय सांगायचय तुला ? अगं मला कपडे तर काढू देशील ना. भूक पण लागलीय.माझं दू...

शेखचिल्लीची स्वप्नपूर्ती

Image
  शेखचिल्लीची स्वप्नपूर्ती                     हे ऐकून किंवा वाचून तुम्ही नक्कीच उडाल किंवा आँ तरी म्हणालच. त्याचं कारण आम्ही. तुम्हाला ठाऊक नसेल म्हणून सांगतो की आमच्या प्रजातींची संख्या आहे चार लाख ! तुमच्या आमच्या किंवा आमच्या तुमच्या पृथ्वीचा ८० टक्के बायोमास किंवा जैविक भाग आमच्यामुळे बनलाय. तुम्हाला फारसं न आवडणाऱ्या नि ज्यांच्यासाठी तुम्ही सतत नावबोटं ठेवत असता अशा सूक्ष्म जीवाणू ( बॅक्टेरिआ ) यांचा वाटा आहे १५ टक्क्यांचा आणि तुम्हा मानवांचा   वाटा आहे अवघा ०.०१ टक्के ! निघाला ना तुमच्या तोंडून भला मोठा आँ!                             खरंतर आम्ही या पृथ्वीचे अनभिषिक्त सम्राटच आहोत. हे आमचं साम्राज्य जवळपास ५०० मिलियन (लक्ष) वर्षापासूनचं! आमच्यापुढे तुम्ही कुक्कुले बाळच. तुम्ही म्हणाल काहीतरी थापा हाणतोस ? छे छे थापा कशाला ? तुमचा जन्म झालाय...