Posts

Showing posts from February, 2024

तुरुंग

Image
  तुरुंग परवाची गोष्ट. तेजोमयीच्या आईने घर आवरायला घेतलं. तेजोमयी आणि अलेक्झांडर तिच्या अवतीभवती घुटमळत होते. आवरत असताना आईला एका कपाटात तिला बरीच पुस्तकं दिसली. इतकी पुस्तकं , अशी   उस्फुर्त प्रतिकिया देउुन तेजोमयीनं आनंदाने उडी   मारली. हा आनंद तेजोमयीला कशामुळे झाला हे न कळूनही अलेक्झांडरनेही उडी मारली. ठोंब्या,तुला काय झालं उडी मारायला ? आईने अलेक्झांडरचे कान हलेकच पकडून त्यास कपाटासमोर उभं केलं. ही पुस्तकं आहेत ठोंब्या. यात खूप ज्ञान असतं. तू वाचशील कां रे ही पुस्तकं.. . अर्र SS , आईला लगेच तिची चूक लक्षात आली. तिने कान पकडून अलेक्झांडरला सॉरी म्हंटलं. थोड्या क्षणापूर्वी आपले कान पकडणारी आई स्वत:चे कान कां बरं पकडतेय, हा मोठ्ठा प्रश्न अलेक्झांडरला पडून त्याने आईला मिठी मारली. आईने त्याला कुरवाळले.   आई अचानक, कां बरं अलेक्झांडरवर प्रसन्न झाली असावी, हा प्रश्न तेजोमयीस पडला. मी सांगतो, तुझ्या प्रश्नाचं उत्तर. दिवाणखान्यातून आतल्या खोलित आलेले बाबा, तेजोमयीच्या मनातील भाव ओळखून म्हणाले. काय सांगणार कप्पाळ, आई म्हणाली. कप्पाळ नाही गं, कपाट...

उपटसुंभांची बाग

Image
  उपटसुंभांची बाग तेजोमयीच्या सदनिकेला तीन गॅलऱ्या आहेत. प्रत्येक गॅलरीमध्ये वेगवेगळी फुलझाडं आईनं लावली आहेत. या झाडांची सगळी देखभाल आईच करते. बाबांकडे या झाडांना पाणी देण्याचं काम. ते न चुकता दररोज सकाळी करतात. हे काम त्यांना आता आवडायला लागलय. सुरुवातीला भसाभसा पाणी टाकणारे बाबा आता हळूवारपणे झाडांना पाणी देतात. सगळयाच झाडांना सारखच पाणी लागत नाही. ते झाडाप्रमाणे बदलतं. त्यामुळे कमी जास्त करावं लागतं. ते आता बाबांना छान जमतय.   पाणी देता देता या झा डां शी बाबां ची चांगली मैत्रीही झाली. ते आता केवळ झाडांना पाणी देऊन थांबत नाही तर, कुंड्यांमध्ये निघालेलं तण काढतात. शेवाळ दिसलं तर ते काढतात. या पावसाळयात तर त्यांनी झाडांसाठी खत आणलं. ते कसं टाकायचं, किती दिवसांनी टाकायचं हे आईकडून शिकूनही घेतलं. काही काही झाडं बिन बुलाए मेहमान म्हणजेच न बोलावता येणाऱ्या पाहुण्यासारखे कुं डी त उगवतात. मूळ झाडापेक्षाही ते अधिक वेगाने वाढतात. मूळ झाडाच्या वाढीला त्यामुळे खिळ बसतो. ते मूळ झाडाचं पाणी पितात. त्यांना दिलेलं खतही पळवतात, असं बाबांना सारखं वाटायचं. त्यामुळे अ...

ताकापुरती आजी

Image
  ताकापुरती आजी परवा तेजोमयीने घरी हट्टच धरला. तिला ताकापुरती असलेली आजी हवी होती. पाहिजे म्हणजे पाहिजे, तिने नि क्षू ण सांगितलं. तिच्या या मागणिनं बाबा चक्रावले. आई रागावली. अशी काही आजी नसते, असं आईने तेजोमयीस सांगून बघितलं. अलेक्झांडरने या वादाच्या वेळी आई-बाबा आणि तेजोमयी अशा तिघांकडे आळीपाळीनं बघितलं. मात्र कुणीही त्याला प्रतिसाद दिला नाही. तेव्हा प्रकरण गंभीर असल्याचं त्याच्या लक्षात आलं. अशावेळी लुडबडू बरी नसते, असं शहाणपण त्याच्याकडे असल्याने तो गॅलरीत जाऊन झोपला. खरेतर तो जागाच होता. आत काय चाललय याकडे त्याचे कान लक्ष ठेऊन होते. बाबांनी पुन्हा एकदा तिला समजावलं की अशी ताकापुरती आजीबिजी नसते म्हणून.. समजा अशी आजी मीच तुम्हाला दाखवली तर काय द्याल ? तेजामयीने बाबांना थेट विचारलं. "आँ!" " काहीबाही काय बोलतेस तेजो तू, अशी आजी कुठून शोधणार ?" आईनं विचारलं. " आई बरोबर बोलतेय. कुठे शोधणार तू अशा आजीला ? बा बांनी विचारलं. " ते मी माझं ठरवणार.मी अशी आजी दाखवली तर मला काय द्याल. " तेजोमयीने पुन्हा विचारलं. " भलताच हट्ट कशापायी क...

कराटे गर्ल

Image
  कराटे गर्ल सकाळी उठल्या उठल्या तेजोमयीचं, दिवाणखाण्यातील भिंतीकडे बघून कराटे खेळात जसे हूँ हाँ करत हातवारे केलं जातं, तसं सुरु झालं. अलेक्झांडर (द डॉगी) तिच्याकडे आश्चर्यानं बघून मध्येच दच कू लागला . आपल्या अंगावर ही येते की काय या भीतिनं काही वेळाने तो तिच्यापासून दूर जाऊन बसला. सकाळी सकाळी तेजोमयीचं हे असं हातवारं करुन पाय उंचावणं, आई-बाबांना जरा चमत्कारीच वाटलं. " हे काय नवं खुळ ? आईनं विचारलं. " अगं, हे खुळ नाही. याला कराटे म्हणतात. " तेजोमयीनं उत्तर दिलं. " तुला कां बरं आजच कराटेवर प्रेम आलय बुवा " , बाबांनी कौतुकानं विचारलं. " बाबा, मी कराटे शिकावं असं तुम्हाला आजपर्यंत कां वाटलं नाही ?" बाबांनाच तेजोमयीनं उलट प्रश्न केला. या अनपेक्षित प्रश्नानं बाबा भांबावले. " अगं, तुला कधी याची आवड दिसली नाही. " बाबा म्हणाले. " तू कधी बोलली पण नाहीस ना. " बाबांची बाजू घेत आई म्हणाली. " होय ना रे ठोंब्या ?" आईने अलेक्झांडरची साक्ष काढली. " आता हे काय भलतच, असा प्रश्नांकित चेहरा करत अलेक्झांडर हळूच आईज...

न संपणारा खाऊ

Image
  न संपणारा खाऊ तेजोमयीचे बाबा कामानिमि त्तं सतत फिरतीवर असायचे. ते ज्या गावावरुन परत येत त्यावेळी तेजोमयीसाठी त्या गावातील किंवा शहरातील प्रसिध्द असा खाऊ आणत. त्याचं वैशिष्ट्य असं होतं की हा खाऊ छान पॅक केलेल्या कागद, प्लॅस्टिक किंवा ॲल्युनियमच्या डब्यात अ से . बाबा बाहेरगावून आले की बॅग आईकडे देत. आई बॅगेमधून खाऊचा डबा काढून देवापुढे ठेवी. मग तेजोमयीला देई. खाऊचे डबे साधारणत: एकाच आकाराचे अस त . हा खाऊ दोन - तीन दिवस पुरत असे. यावेळी मात्र वेगळचं घडलं. बाबा बाहेरगावाहून आल्यानंतर त्यांची बॅग आईने घेतली. त्यातून खा ऊ चा डबा काढला. त्याचा आकार नेहमीपेक्षा वेगळा होता. डबा जाडजूड होता. आईने तो डबा देवाजवळ ठेवला नि तेजोमयीला दिला. त्या खाऊच्या डब्याचा आकार बघून तिलाही आश्चर्य वाटलं. " बाबांनी वेगळा खाऊ आणलेला दिसतो. " ती आईला म्हणा ली . हा खाऊचा डबा उघडण्याची तेजोमयीस घाई झाली होती. बाबा अंघोळ करुन आल्यानंतर एकत्रच उघडू या, असं आईने ति ला समजावलं. तेजोमयीनं होकारार्थी मान हलवली. बाबा दहा मिनिटांनी बाथरुममधून ताजेतवा ने होऊन आले आणि सोफ्यावर बसले. " आता उघ...