Posts

Showing posts from July, 2023

"सूपरहिरो"

Image
  "सूपरहिरो"   हॅलो,हाय,नमस्कार,रामराम वगैरे वगैरे,मी अमूक-ढमूक-तमूक अशी आपण एकमेकांना ओळख करुन देतो ना! म्हंटलं मी सुध्दा स्वत:ची ओळख करुन देण्यापूर्वी असं अभिवादन केललं बरं.याचा अर्थ मी किती सुसंस्कृत आहे,हे तुमच्या लक्षात आलच असणार. तर मी कोण? हे तुम्हाला सांगण्यापूर्वी,माझी एक गंमत गोष्ट सांगतो.तर त्याचं असं झालं की,इस्त्रायल नावाचा जो देश आहे ना,त्यांनी काही वर्षापूर्वी त्याचं बेरशीट नावाचं अवकाशयान चंद्रावर स्वारी करण्यासाठी पाठवलं.त्यात आम्हीसुध्दा होतो. चंद्र जवळ आला. काही क्षणातच हे यान चंद्रावर उतरलं नि,त्याचा स्फोट झाला नि मग पुढचं सारं फुस्स झालं.तुमच्या मनात प्रश्र निर्माण झाला असेल की आमचं काय झालं?आमचं नक्कीच काहीतरी झालं,हे सांगणे न लगे.तुम्हाला असं अद्यापही वाटतं की आम्ही मात्र जिवंतच आहोत. आता हे असं तुम्हाला कां वाटतं?याचं उत्तर माझ्या गोष्टीच्या पुढच्या भागात तुम्हाला मिळेल.तुम्ही मानव आम्हापेक्षा डोक्यानं म्हणजेच बुध्दीने लाखोपट समोर ना.त्यामुळे आम्ही तुम्हाला पहिल्यांदा दिसलो,तेव्हा   ते म्हणजेच तुमच्यातले काही जण आमचाच अभ्यास एके अभ्यास रात्...

अलेक्झांडरची वर्षा खरेदी !

Image
  अलेक्झांडरची वर्षा खरेदी ! देशपांडे काकूंनी दारात पाऊल टाकताच अलेक्झांडरने नाराजीचा सूर आवळला. आईने त्याच्याकडे डोळे वटारुन बघताच तो शेपटी हलवत आतल्या खोलित निघून गेला. तसं तर आईलाही अशा अवचित वेळी न सांगता देशपांडे काकूंचं येणं आवडलं नव्हतं. त्यांची बाहेर जाण्याची लगबग सुरु होती. काकूंच्या ते लक्षात आलं असावं. काय हो, कुठे चाललात अशा लगबगीने ? आई काही बोलायचा आधीच तेजोमयी उत्तरली, डॉक्टरांकडे काकू. अगो बाई, कुणाला काय झालं ? काळजीयुक्त स्वरात काकूंनी विचारलं. अहो काकू, तसं काही नाही. आम्ही अलेक्झांडरच्या डॉक्टरकडे चाललोत जरा. बाबा म्हणाले. त्याला काही झालं का ? काकूंनी विचारलं. नाही हो, तो अगदी ठणठणित आहे. आई म्हणाली. मग ? तेव्हढयात शेपूट हलवत आतल्या खोलितून अलेक्झांडर बाहेर आला. देशपांडे काकू अजून इथेच बघून त्याने त्यांच्याकडे रागाने बघितले. कधी जाता तुम्ही ? अशा आशयाचे भाव त्याच्या डोळयात तरळले.   देशपांडे काकू त्याला कधीच आवडायच्या नाहीत. कारण त्या सतत त्याला हाटहूट करत. नावबोटं ठेवतं. आईने वारंवार बजावूनही, संधी मिळाली की त्याला कधी कुत्रा तर कधी ठ...

लाल यादी

Image
  लाल यादी बऱ्याच दिवसांनी कॉलनीतल्या टोळीतील तेजोमयी,कल्याणी,वैष्णवी,प्रदीप,टिंकू,चिंकू,श्रीकांतही मंडळी मारुतीरायाच्या मंदिरात गोळा झाली. या टोळीला मारुतीराया नेहमीच हसतमूख वाटायचे. अरे या या,तुम्ही आलात ते बरं झालं खूप आनंद झाला, वगैरे ते बोलण्याचा आणि गदा हलवून आशीर्वाद देण्याचा भास तेजोमयीला व्हायचा. हा भास खरच असल्याच सगळया टोळीचं एकमत होतं. त्यामुळे मारुतीरायांनी गदा हलवून आशीर्वाद दिला असं तेजोमयीनं सांगितलं की टोळी मग मंदिरातल्या बाकांवर बसून गप्पा-टप्पा करायला मोकळी. पण आज मारुतीरायांसमोर एक मिनिटे उभे राहूनही, त्यांची गदा हलण्याचा भास तेजोमयीस झाला नाही.त्यामुळे ती काहीच बोलेना. त्यामुळे टोळीसही हालता येईना. अगं काय झालं ? मारुतीरायांनी आशीर्वाद दिला नाही का ? कल्याणीनं विचारलं. तेजोमयीनं नकारार्थी मान हलवली.म्हणजे ते रागावले की काय ? प्रदीप म्हणाला. पण,ते आपल्यावर कशासाठी रागावतील बॉ,आपण तर काहीच केलं नाही ? टिल्लू म्हणाला. काय हो मारुतीराया तुम्ही आमच्यावर रागावलात की काय ? श्रीकांतच्या तोंडून निघूनच गेलं. सर्वांनी आधी त्याच्याकडे आणि नंतर मारुतीरायां...

गुणी बाळ

Image
  गुणी बाळ अलेक्झांडरचं घरातल्या प्रत्येक घडामोडीकडे बारीक लक्ष असतं. त्याचं निरीक्षण चांगलं असल्यानं घरी काय काय घडतं, कोण काय करतो, हे आता त्याच्या चांगलच लक्षात आलय. त्यामुळे आई-बाबा किंवा तेजोमयीकडून दररोज घडणारी गोष्ट घडली नाही तर तो बरोबर त्याच्या पध्दतीने तिघानांही आठवण करुन देतो. आईबाबत अशी वेळ फार कमी येते. मात्र बाबा आणि तेजोमयीच्या बाबत अशी वेळ बरेचदा येते. आता ही परवाची गोष्ट. गॅलरितील झाडांना पाणी टाकण्याचं काम बाबांचं. हे काम ते न चुकता करतात. परवा त्यांना सकाळीच एका दुसऱ्या कामासाठी बाहेर जावं लागलं. त्यामुळे त्यांनी सकाळी काही झाडांना पाणी टाकलं नाही. लवकर काम आटोपून परत येऊ व पाणी टाकू असे त्यांनी आईस सांगितलं. मात्र त्यांना यायला उशीर झाला. कामाच्या व्यापात झाडांना पाणी टाकायला आई विसरली. तेजोमयीने काही तिकडे लक्षच दिलं नाही. बाबा आले तेव्हा दुपारचे १२ वाजून गेले होते. जेवणाची वेळ झाली होती. त्यांनाही भूक लागली होती. त्यामुळे आईने जेवणाचं ताट लावलं. हात पाय स्वच्छ धुवून बाबा जेवणासाठी बसणार तोच अलेक्झांडर त्यांच्या खुर्चीवर जाउुन बसला. अरे ठोंब्या, बाबांना जेवायचय...

दर्जेदार शिक्षणाची हमी

Image
       दर्जेदार शिक्षणाची हमी ग्रामीण आणि शहरी भागातील प्रज्ञावंत मुलांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणाच्या संधी सुलभतेने व जवळपास नि:शुल्क उपलब्ध होण्यासाठी जवाहार नवोदय विद्यालयाची स्थापना केंद्र सरकारने केली आहे. सहअस्तित्वाची जाणीव करुन देणारी शिक्षणप्रणाली नयोदय विद्यालयांचे प्रमुख वैशिष्ट्य ! प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय आहे. मुला - मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था केलेली असते. संपूर्ण शिक्षण, निवास आणि भोजन नि:शुल्क आहे. गणवेश, पाठ्यपुस्तके, इतर शैक्षणिक साहित्य ( पेन, पेन्सिल, खोडरबर, नोटबूक, शाळेची बॅग, स्केल पट्टी ) दैनंदिन गरजेच्या वस्तू ( आंघोळीचा साबण, कपडे धुण्याचा साबण, दंतमंजन/ पेस्ट, ब्रश, केसाला लावण्याचे तेल, कपड्यांची इस्त्री, कपड्यांची स्वच्छता, मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स ) यांचा खर्च संस्थेमार्फतच दिला जातो. इतर सुविधांमध्ये रेल्वेच्या तिसऱ्या श्रेणीतील वातानुकूलीन प्रवास भाडे /एसी बस मधून प्रवास, वैद्यकीय सुविधा यांचा समावेश आहे. सीबीएसईचे ( केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ ) , शुल्क संस्थेमार्फतच भरले जाते. खुल्या संव...