मारुती रायाची गोष्ट
मारुती रायाची गोष्ट मित्रांनो तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी बाबांसोबत हनुमानाच्या मंदिरात गेलात आहात ना. शेंदूर फासलेल्या मूर्तीसमोर बाबा नतमस्तक होतात. त्यांचं बघून आपणही नतमस्तक होतो. हा हनुमान सध्याच्या काळातल्या काही लाडक्या देवांपैकी एक. हा हनुमान रामभक्त असल्याचं कथा वाचून वा दूरचित्रवाणीवरील मालिका बघून आपणास ठाऊक असतं. तो महापराक्रमी होता. त्याने रावण महाराजांची सोन्याची लंका एकट्याने जाळून काढली. त्याने एकट्यानेच राम-रावण युध्दात हजारो राक्षसांचा नायनाट केला हेही आपणास ठाऊक असतं. हनुमानाचं खरं कर्तृत्व यापेक्षाही अधिक होतं. तो अत्यंत हुषार होता. प्रसंगावधानी होता. सिता मातेच्या शोधात महासागर ओलांडताना त्याला तीन मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. पण या संकटातून तो सहिसलामत बचावला ते आपल्या बुध्दीचातुर्याच्या बळावर. अथांग पसरलेल्या सागरावरुन उडत असताना, एके ठिकाणी या सागराच्या अध्येमध्ये असणाऱ्या मयंक पर्वताने त्यास अडवलं. मयंक पर्वत त्यास म्हणाला की, हनुमान, अरे तू इतक्या लांब उडत आला आहेस. थकला असशील. जरा माझ्या भूमिवर उतर. थोडावेळ विश्रांती घे. माझ्या...