घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार (भाग एक)
घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार ( भाग एक ) 1 पिंकू गाढवाने सिंहमहाराजांकडे ढिंकू घोड्याची तक्रार केली . तक्रारीचा विषय होता , पिंकूवर ढिंकूने केलेला आरोप . आरोपात काय होतं , तर ढिंकू परवा चावडीवर सर्वांदेखत सांगता झाला की , पिंक्यास गुळची चव कळूच शकत नाही . त्याच्या बापजाद्यांना ही चव कळली नव्हती , यालाही कळली नाही आणि पुढच्या गाढवांनाही कळणार नाही . हे प्रकरण हातघाईवर आलं . पिंकूने लाथही उचलली . ढिंकूही मागे हटायला तयार नव्हता . कसेतरी हे प्रकरण सिंकू हत्तीने मिटवलं . पण तेव्हढ्यापुरतच . तीनचार दिवसांनी पुन्हा हाच प्रकार घडला . तेव्हा पिंकूचा राग अनावर झाला . त्याने यावेळी लाथा हाणल्या नाहीत की वादविवादही केला नाही . त्याने थेट सिंह महाराजांकडे तक्रारच केली . महाराजांकडे तक्रार आल्यावर आधी तर ते हसले . पिंक्याला काही अक्कल नाही , असं प्रधानजी वाघोबा म्हणाले . ही तक्रार फाडून फेकून द्या , असा आदेश ते देणा...