Posts

Showing posts from December, 2023

धडा!

Image
  धडा! चंद्रयान तीनचा प्रवासी प्रज्ञान, चंद्राच्या दक्षीण ध्रुवावर अलगद उतरला. त्यादिवशी तेजोमयीच्या घरी आईने रात्री शिरा केला. भजी केली. अशा छोट्या पार्टीने हा आनंद साजरा केला. रोव्हर चंद्रावर अलगद उतरले तेव्हा बाबा, तेजोमयी आणि आईने टाळ्या वाजवल्या. म्हणजे याचा अर्थ काहीतरी आनंददायी घडलयं याची खात्री पटून अलेक्झांडरने सोफ्यावरुन खाली उडी मारत नि पुन्हा सोफ्याकडे झेपावत आपला आनंद व्यक्त केला. बाबा किती सोप्प असतं ना आनंद व्यक्त करणं? तेजोमयीने अलेक्झांडरकडे बघत बाबांना विचारलं. म्हणजे गं काय? आईला तिच्या प्रश्नाचा रोख न कळल्यामुळे विचारलं. चंद्रयान ३ ची स्वारी यशस्वी करण्यासाठी किती कठीण परिस्थितीचा सामना शास्त्रज्ञांना करावा लागला,असं मला म्हणायचं होतं. हो मग? कोणतीही अशक्यप्राय गोष्ट साध्य करण्यासाठी अशा कठीण परिस्थितीचा सामना करावाच लागतो. बाबा उत्तरले. काय हो बाबा, या चांद्रयान-३ गोष्टीचे तात्पर्य काय समजायचं आपण? तेजोमयीनं विचारलं. अगं, वेडाबाई ही काही गोष्ट नाही. सत्य आहे. आई हसत म्हणाली. बरं बाई, सत्य तर सत्य! मग या सत्याचं तात्पर्य काय? तेजोयमीने आपला मुद...

चिरकूट

Image
  चिरकूट तेजोमयीच्या घरी तिचे बाबा अधून मधून घर झाडायचे. आईला तितकीच मदत, अशी यात त्यांची भावना. घर झाडताना कधी झुरळं, मुंग्या, माकोडे यांच्यावरुन झाडू फिरायचा. मध्येच कधीतरी चपळतेने इकडे तिकडे भटकू पाहणारी अळी दिसायची. अळी दिसली की तिला थेट यमराजांच्या घरीच पोहचवायचे अशी आईची सक्त ताकिद होती. मात्र, अशी अळी दिसली की बाबांचे हात गळपटायला लागायचे. त्या गडगबडित ती अळी इकडे-तिकडे निसटायची. यावरुन मग आई बाबांना चार- दोन गोष्टी सुणावणार. आज बाबा घर झाडत असताना एक हिरवट रंगांची अळी वळवळत झाडू समोर आली. अळीला पकडण्यासाठी बाबांची झटापट सुरु झाली. क्षणात इथे तर क्षणात तिथे असं तिचं वळवळणं असल्यानं, ती काही गवसत नव्हती. बाबांची ही फजिती बघून तेजोमयीस हसू येत होतं. अलेक्झांडर तिच्याकडे टक लावून बघत होता. या पिटुकल्या अळीच्या पाठीमागे कां बरं बाबा लागले असावेत असा मोठा प्रश्न अलेक्झांडरच्या चेहऱ्यावर उमटला. बाबांना मदत करावी म्हणून त्याने अळीवर भुंकून बघितलं. पण शून्य परिणाम. आपल्या भुंकण्याला भले भले कापतात, या चिरकुटास काहीच कशी भीती वाटत नाही ब्बॉ, असं अलेक्झांडरला वाटलं असावं कारण त्या...

शोधण्याचा आनंद

Image
  शोधण्याचा आनंद तेजोमयीच्या बाबांनी परवा "विश्वस्त", नावाचं पुस्तक आणलं. सहज म्हणून तिने वाचायला घेतलं. काही क्षणातच ती या पुस्तकात इतकी रमून गेली की तिच्याच्याने पुस्तक सोडवेना. खवळलेल्या समुद्रात व्दारकानगरी बुडत असतानाच श्रीकृष्णाने व्दारकेतील अलोट संपत्ती सात जहाजांमध्ये वेगवेगळया दिशने पाठवली. त्यातील एक जहाज भारताकडे निघालं. ही संपत्ती कुठे ना कुठे खऱ्या वारसदाराकडे सुरक्षितपणे पोहचेल हा त्यामागचा हेतू. ही संपत्ती घेऊन भारताकडे निघालेलं जहाज प्रचंड वादळात सापडतं. त्यात ते बुडतं. त्याचं पुढं काय होतं? कुणाच्या हाती ते लागतं? या जहाजातील संपत्ती कुठे जाते? याचा शोध घेण्यासाठी इतिहासात रस असणाऱ्या आणि रममाण होणाऱ्या पुण्यातील मुलांनी केलेल्या प्रयत्नांची रहस्यमय कथा या पुस्तकात आहे. या पुस्तकातील चित्तथरारक घटना, प्रसंग आणि रहस्याने तेजोमयीस खिळवून ठेवलं. एखाद्या पुस्तकात इतका वेळ तेजोमयी डोके खुपसून बसल्याचं अलेक्झांडर(द डॉगी)ने कधी बघितलं नव्हतं. सगळया गोष्टींबद्दल त्याला फार उत्सुकता वाटत असे. त्यातून त्याचं निरक्षण सुरु असायचं. या निरिक्षणातूनच त्याला कळलं होतं की, ते...