Posts

Showing posts from July, 2022

उंच उंच झोका

Image
  उंच उंच झोका उन्ह्याळ्यातच नव्हे तर कोणतीही मोठी सुटी आली की,बरेचदा तेजोमयी आईसोबत आजोळी जात असे.हे आजोळ म्हणजे तिच्या आईच्या बाबांचं घर. म्हणजे आईचं माहेर. त्याचवेळी तिची मावस बहीण कल्याणीही तिच्या आईसोबत येत असे. तेजोमयीला आजोबांचं घर खूप आवडायचं कारण, त्यांच्या घरातल्या एक दोन खोल्यात आणि घरासमोरच्या बागेत मस्त झोपाळे होते. त्यावर लटकून किंवा बसून उंच उंच झोका घ्यायला तिला फार आवडायचं. प्रवासातून आल्याबरोबर सुध्दा घरात शिरण्यापूर्वी ती बागेतल्या झोपाळयाकडे धावून आधी दोन तीन झोके घेऊनच मग आत जाई. याच्या उलट कल्याणीचं होतं.तिला अजिबातच झोपाळ्यावर बसून झोका घ्यायला आवडत नसे.आपण उंचावरुन पडू अशी भीती तिला वाटायची. पण असं काही घडत नाही.हे तेजोमयीनं, आजोबांनी,तिच्या आणि तेजोमयीच्या आईनं बरेचदा समजावून सांगितलं पण कल्याणी काही झोपाळ्यावर बसायला तयार होईना. नाही तर नाही.कशाला बिचारीला तिला आग्रह करता ? एखाद्याला नसते आवड झुलण्याची.आजी कल्याणीची बाजू घेत म्हणाली. अगं पण आज्जू, उंच उंच झोका घेण्याचा आंनद कल्लूस घेता येत नाही ना ! शिवाय आणखी एक गंमत आहेच की ? तेजोमयी आजील...

मारुतीरायांची चिंता

Image
  मारुतीरायांची चिंता बऱ्याच दिवसांनी कॉलनीतली टोळीतील तेजोमयी,कल्याणी,वैष्णवी,प्रदीप,टिंकू,चिंकू,श्रीकांतही मंडळी मारुतीरायाच्या मंदिरात गोळा झाले. या टोळीला मारुतीराया नेहमीच हसतमूख वाटायचे. अरे या या,तुम्ही आलात ते बरं झालं खूप आनंद झाला, वगैरे ते बोलण्याचा भास तेजोमयीस व्हायचा .गदा हलवून आशीर्वाद देण्याचा भास तिला व्हायचा. हा भास खरचं असल्याच सगळया टोळीचं एकमत होतं. त्यामुळे मारुतीरायांनी गदा हलवून आशीर्वाद दिला असं तेजोमयीनं सांगितलं की टोळी मग मंदिरातल्या बाकांवर बसून गप्पा-टप्पा करायला मोकळी. पण आज मारुतीरायांसमोर एक मिनिटे उभे राहूनही, त्यांची गदा हलण्याचा भास तेजोमयीस झाला नाही.त्यामुळे ती काहीच बोलेना. त्यामुळे टोळीसही हालता येईना. अगं काय झालं ? मारुतीरायांनी आशीर्वाद दिला नाही का ? कल्याणीनं विचारलं. तेजोमयीनं नकारार्थी मान हलवली.म्हणजे ते रागावले की काय ? प्रदीप म्हणाला. पण,ते आपल्यावर कशासाठी रागावतील बॉ,आपण तर काहीच केलं नाही ? टिल्लू म्हणाला. काय हो मारुतीराया तुम्ही आमच्यावर रागावलात की काय ? श्रीकांतच्या तोंडून निघूनच गेलं. सर्वांनी आधी त्याच्याक...

गजराजांची मैत्रीण

Image
  गजराजांची मैत्रीण सिंह महाराजांच्या दरबारात आज जरा विपरीत घडलं. दरबारात आल्या आल्या गजराज रडू लागले. ते बघून महाराजांना फार आश्चर्य वाटलं. गजराजांना रडताना बघून इतर दरबारी थक्क झाले. गजराज,अहो रडायला काय झालं ? तुमच्यावर काही संकट कोसळलं का ? महाराजांनी विचारलं. नाही महाराज,तसं काही नाही.कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी हा गजराज समर्थ आहे. मग तुम्ही कशासाठी रडता आहात ? महाराजांनी विचारलं. महाराज,माझी मैत्रीण मुंगीताई माझं ऐकतच नाही हो ? मुंगी आणि तुमची मैत्रीण ? कोल्होबांनी उपहासानं विचारलं. का ? ती माझी मैत्रीण राहू शकत नाही कां ? ती सुध्दा या जंगलाचा भाग आहे ना.हे जंगल काही केवळ सिंह-वाघ-हत्ती-कोल्ह्यांच नाही.हत्ती कोल्होंबाकडे वळून रागावून म्हणाले. अहो गजराज,मैत्री आपल्या बरोबरच्यांशी करायची असते. टिचुकली मुंगीशी मैत्री करुन तुम्हाला काय मिळणार बरं ? लांडगोबांनी विचारलं. लांडगोबा, तुमच्या सारख्या सतत दुसऱ्याला फसवून आपला कार्यभार साधणाऱ्यास नाही कळायची मैत्री म्हणजे काय ते ? गजराज,लांडगोबाकडे वळून म्हणाले. आपल्याला नाव बोट ठेवणाऱ्या गजराजाचा लांडगोबास...

हे शक्य नाही?

Image
  हे शक्य नाही ? कासव आणि ससा गप्पा मारत बसले होते. खूप जुन्या जुन्या गोष्टी एकमेकांना सांगत होते. त्या गोष्टी ऐकून दोघांनांही खूप गंमत वाटत होती. गप्पा मारता मारता कासव ससोबास म्हणाले, ससोबा, माझा कोणतातरी पूर्वज तुझ्या कोणत्यातरी पूर्वजाला धावण्याच्या शर्यतीत जिंकला होता,असं माझ्या कानावर आलंय. माझ्याही कानावर आलय ते. ससोबानं प्रत्युत्तर दिलं. पण माझा काही यावर विश्वासच बसत नाही.कासव म्हणाले. अरे यात विश्वास न बसण्यासारखं काय ? मला यात भानगड दिसते. कसली ? तो जादुचा कासव असला पाहिजे.कासव म्हणाला. यावर ससोबा काहीच बोलला नाही.तो विचार करु लागला की खरच तो जादुचा कासव असावा का ? पण तो जादुचा कासव असल्याचं आपणास कसं बंर कळणार ? त्यात न कळण्यासारखं काय ? अरे, ससोबा तुम्ही इतक्या वेगाने पळता ना की तुम्ही आमच्या सोबत चाळीस वेळा शर्यत जिंकली असती, इतक्या हळुवार आपण चालतो ? कासव म्हणाले. पण त्या आमच्या पूर्वजास मध्येच झोप लागली ना ! म्हणून तो कासव शर्यत जिंकला.ससा म्हणाला. ही पण भानगडच वाटते ? कशी ? त्याच दिवशी या सशाला अशीकशी झोप आली ? कां बर ? कुणाल...