हे शक्य नाही?
हे शक्य नाही?
कासव आणि ससा गप्पा मारत बसले होते. खूप जुन्या जुन्या गोष्टी एकमेकांना सांगत होते. त्या गोष्टी ऐकून दोघांनांही खूप गंमत वाटत होती. गप्पा मारता मारता कासव ससोबास म्हणाले,
ससोबा, माझा
कोणतातरी पूर्वज तुझ्या कोणत्यातरी पूर्वजाला धावण्याच्या शर्यतीत जिंकला होता,असं
माझ्या कानावर आलंय.
माझ्याही कानावर आलय ते. ससोबानं प्रत्युत्तर दिलं.
पण माझा काही यावर विश्वासच बसत नाही.कासव
म्हणाले.
अरे यात विश्वास न बसण्यासारखं काय?
मला यात भानगड दिसते.
कसली?
तो जादुचा कासव असला पाहिजे.कासव म्हणाला. यावर
ससोबा काहीच बोलला नाही.तो विचार करु लागला की खरच तो जादुचा कासव असावा का?
पण तो जादुचा कासव असल्याचं आपणास कसं बंर कळणार?
त्यात न कळण्यासारखं काय?
अरे, ससोबा तुम्ही इतक्या वेगाने पळता ना की
तुम्ही आमच्या सोबत चाळीस वेळा शर्यत जिंकली असती, इतक्या हळुवार आपण चालतो? कासव म्हणाले.
पण त्या आमच्या पूर्वजास मध्येच झोप लागली ना! म्हणून तो कासव शर्यत जिंकला.ससा म्हणाला.
ही पण भानगडच वाटते?
कशी?
त्याच दिवशी या सशाला अशीकशी झोप आली?
कां बर? कुणाला कधीही झोप
येऊ शकते ना!
अरे कासवोबा, तुला इतक्या शंका कां बरं पडताहेत.तुमच्या कासव
जमातीसाठी किती गौरवाची गोष्ट आहे ना ही.अजूनही त्यासाठी तुमचं कौतुक होतं.ससोबा
म्हणाला.
तेच तर दु:ख आहे.अरे,असं खोटं कौतुक काय कामाचं?
तू कमाल करतोस बाँ!
आपल्या पूर्वजांच्या कामगिरीच्या अभिमान वाटला
पाहिजे.
अरे पण तशी कामगिरीपण झाली पाहिजे.
म्हणजे तुझ्या पूर्वजावर शंका आहे की काय?
होय शंकाच आहे.अरे,त्याच्यानंतर इतक्या वर्षात
एकदा तरी दुसरा कासव शर्यत जिंकला का?तशी कुणी हिम्मतही
केली नाही.कासव म्हणाला.
आता यावर काय बोलावं हे काही ससोबास कळेना. याचा पूर्वज जिंकला याचं याला दु:ख.आपला हरला
याचं आपल्याला दु:ख! ससोबा मनात म्हणाला.हा तिढा काही सुटणार नाही हे त्याच्या
लक्षात आलं.त्यामुळे त्याने तिथून हळूच पलायन केले.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment