Posts

Showing posts from April, 2023

शेपटीच्या शोधात...

Image
  शेपटीच्या शोधात... आज दरबाराज गजराजाचं मन काही लागत नव्हतं. सगळा वेळ ते शून्यात बघत होते. अखेर प्रधानजींनी त्यांना भीत भीत विचारलं. महाराज आज आपली तब्येत बरी नाही का ? अं नाही, हो म्हणजे नाही, हो काही नाही...असं काही तरी गजराज म्हणाले. तेव्हा प्रधानजींसोबत दरबारातील इतरांच्याही लक्षात आलं की महाराजांचं मन काही आज थाऱ्यावर नाही. प्रधानजी हिम्मत करुन गजराजांच्या जवळ गेले आणि त्यांनी गजराजांच्या कानात फुंकर मारली. तेव्हा कुठे गजराज खडबडून उठले. समोर प्रधानजी बघून त्यांना आश्चर्य वाटलं. प्रधानजी तुम्ही आमच्या इतक्या नजिक कां आलात ? महाराज आपली ख्याली-खुशाली विचारसाठी आलो. आज आपले लक्ष थाऱ्यावर दिसत नाही. आम्ही आणि दरबाऱ्यांनी विचारपूस केली तरी तुम्ही अनाकलनीय बोलतात, म्हणून तुमच्याजवळ यावं लागलं. क्षमा असावी महाराज.तुम्हास नेमकं काय झालं, ते सांगाल तर आम्हा सर्वांचा जीव भांड्यात पडेल... गजराजांनी प्रधानजींना त्यांच्या जागी आसनस्थ व्हायला सांगितलं. प्रधानजी आसनस्थ झाल्यावर गजराज बोलू लागले, काल पासून माझ्यासमोर एक प्रश्न निर्माण झालाय. जो तो उठतो आणि म्हणतो, हत्ती गेला...

गुणी बाळ

Image
गुणी बाळ अलेक्झांडरचं घरातल्या प्रत्येक घडामोडीकडे बारीक लक्ष असतं. त्याचं निरीक्षण चांगलं असल्यानं घरी काय काय घडतं, कोण काय करतो, हे आता त्याच्या चांगलच लक्षात आलय. त्यामुळे आई-बाबा किंवा तेजोमयीकडून दररोज घडणारी गोष्ट घडली नाही तर तो बरोबर त्याच्या पध्दतीने तिघानांही आठवण करुन देतो. आईबाबत अशी वेळ फार कमी येते. मात्र बाबा आणि तेजोमयीच्या बाबत अशी वेळ बरेचदा येते. आता ही परवाची गोष्ट. गॅलरितील झाडांना पाणी टाकण्याचं काम बाबांचं. हे काम ते न चुकता करतात. परवा त्यांना सकाळीच एका दुसऱ्या कामासाठी बाहेर जावं लागलं. त्यामुळे त्यांनी सकाळी काही झाडांना पाणी टाकलं नाही. लवकर काम आटोपून परत येऊ व पाणी टाकू असे त्यांनी आईस सांगितलं. मात्र त्यांना यायला उशीर झाला. कामाच्या व्यापात झाडांना पाणी टाकायला आई विसरली. तेजोमयीने काही तिकडे लक्षच दिलं नाही. बाबा आले तेव्हा दुपारचे १२ वाजून गेले होते. जेवणाची वेळ झाली होती. त्यांनाही भूक लागली होती. त्यामुळे आईने जेवणाचं ताट लावलं. हात पाय स्वच्छ धुवून बाबा जेवणासाठी बसणार तोच अलेक्झांडर त्यांच्या खुर्चीवर जाउुन बसला. अरे ठोंब्या, बाबांना जेवा...

चालढकलीचा फटका

Image
  चालढकलीचा फटका तेजोमयीच्या आजोळी असणाऱ्या वाघमारे आजोबांचं तेजोमयीवर खूप प्रेम. ती आजोळी गेली की अर्धा दिवस वाघमारे आजोबांच्या घरीच तिचा मुक्काम असे. हे आजोबा तिला धम्माल गोष्टी सांगत. वेगवेगळे बैठे खेळ शिकवत. शिकवलेल्या खेळांसोबत तिच्याशी खेळत. सुट्यांमधील ही धम्माल तेजोमयीसाठी खास होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे काही तेजोमयीस आजोळी जाता आलं नाही. त्यामुळे प्रत्येक सण आला की, तेजोमयी वाघमारे आजोबांना आठवणीने फोन करुन शुभेच्छा देत असे. छानसा शुभसंदेश व्हॉटस्ॲप वरुन पाठवत असे. तिचा संदेश गेला की या आजोबांचा शुभेच्छा आणि आशीर्वाद देणारा संदेश लगेच येत असे. यंदा मात्र दिवाळीच्या दिवशी तेजोमयीने वाघमारे काकांना शुभेच्छा संदेश पाठवला तेव्हा, वाघमारे काकांनी, चक्क तुझा संदेश नको म्हणून, व्हॉटसॲपवर लिहून पाठवलं.ते बघून तेजोमयीस धक्का बसला. दु:खही झालं. तिला रडू कोसळत होतं. पण तिने स्वत:ला सावरलं. हिम्मत करुन वाघमारे आजोबांना, आपलं काही चुकलं का ? तसं असेल तर क्षमा मागते असा संदेश पाठवला. काही वेळाने वाघमारे आजोबांचं प्रत्युत्तर आलं. तेजोमीयने मोठ्या उत्सुकतेनं आणि...

ठोंब्या

Image
ठोंब्या बाबांनी एके दिवशी खेळणं आणलं. माझ्याकडे देत त्याने विचारलं, कसं आहे ? कसं आहे, म्हणजे काय राव . मला कळेना की, याचं उत्तर काय द्यावं बरं. मी चूप. ते बघून बाबाने परत विचारलं, कसं आहे रे खेळणं, ठोंब्या. आँ ,हे ठोंब्या काय बरं बाबा ?   असं विचारताच बाबाने सुध्दा आँ केला. माझाही आँ नि त्याचाही आँ. आहे की नाही गंमत. बाबाने ठोंब्या म्हणजे काय ते सांगितलच नाही. कदाचित ते त्यालाही ठाऊक नसावं. मी मनात म्हणालो. त्याने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नव्हतं. पण मला तर उत्तर द्यावं लागणारच होतं ना. बाबाचा प्रश्न असा होता की, त्याने आणलेलं खेळणं कसं आहे ? खेळण्यासारखं खेळणं असतं की. त्यात काय नवं बरं. पण त्याने असं विचारलं, याचा अर्थ हे खेळणं काहीतरी वेगळं असणार. हे वेगळंपणच त्याला माझ्याकडून ऐकून घ्यायचं असेल कदाचित. मग मी त्या खेळण्याचा डबा उघडला. त्यात होता एक बॅटिरवर चालणारा यंत्रमानव. काळं, पिवळं, लाल, हिरव्या रंगांच्या बटन असलेला. बाबा म्हणला, बटन दाब. त्याने काय होईल ? बाबा जसं सांगत होता तसं न करता, त्याला मी पुन्हा   प्रश्न विचारला. अरे, प्रश्न नंतर विच...

सिंह महाराज आणि मच्छर

Image
सिंह महाराज आणि मच्छर सिंह महाराजांनी एकदा, आपल्या राज्यात मच्छरांना विशेष अतिथीचा दर्जा दिला. ही बाब दरबारातील अनेक प्राण्यांना रुचली नाही. या इवलाशा किटकाने महाराजांवर कोणती जादू केली कुणास ठाऊक ? वाघोबा, कोल्होबांना विचारते झाले. मला तर यात काहीच जादू बिदू वाटत नाही. आपल्या महाराजांना वेडेपणाचा झटका आला असला पाहिजे. कोल्होबांनी उत्तर दिलं. आपणास खिजवण्यासाठी सुध्दा त्यांनी ही कृती केली असली पाहिजे. गेंडोबा म्हणाला.. तसं असेल तर आपण महाराजांना जाब विचारायला हवा, लांडगोबांचं म्हणण पडलं.. मी तर म्हणतो, जाब कसला विचारता, हाकलूनच लावा ना असले, वेडे चाळे करणाऱ्या सिंहाला, आपल्या राज्याच्या बाहेर..अस्वलाने मत मांडलं. महाराजांच्या वागण्याबद्दल असचं वेडंवाकडं काहीबाही प्राणी बोलत राहिले. या प्राण्यांच्या आसपास असणाऱ्या पण त्यांच्या नजरेत न येणाऱ्या काही मच्छरांनी ते स्पष्टपणे ऐकलं नि त्यांनी महाराजांना सारं काही सांगितलं. सिंह महाराजांनी लगेच दरबार भरवला आणि आपल्या बद्दल कोण काय काय बोलत होतं. हे त्यांनी भर दरबारात सांगितलं. अरे, यांना कळलं तरी कसं हे. वाघोबांनी गेंडोबाकडे आश्चर्यानं बघत इश...

पुस्तकाच्या शोधात...

Image
  पुस्तकाच्या शोधात... आजची मुलं कुठे पुस्तक वाचतात हो, रवीचे बाबा नेहमी म्हणत. त्यामुळे ते रवीसाठी पुस्तकं क्वचितच आणत. त्याला अजिबात्तच आवड नाही. असं कौतुकानं सांगत. पण खरच त्याला आवड नव्हती का ? की बाबांनीच आपलं मत बनवलं होतं, इतराचं ऐकून ? हा प्रश्न तेजोमयीच्या बाबांना काल पडला. कारण रवी त्यांच्या घरी अचानक रात्री १० वाजता आला. त्याची सदनिका तेजोमयीच्याच बाजूला असल्याने, असं कधीही जाणं येणं सहज शक्य होतं. मात्र याआधी तो असा एकटा रात्री दहा वाजता आला नव्हता. त्याने बेल वाजवल्यावर बाबांनी दरवाजा उघडला तेव्हा, तो समोर बघून त्यांना आश्चर्य वाटलं, कायरे आई बाबा बरे आहेत ना ? त्यांनी विचारलं. होय काका बरे आहेत. मग. अहो त्याला आत तर येऊ द्या ना. आई बाबांना म्हणाली. आपण मोठ्यांना जसं वागवतो, तसं लहानांना कां वागवत नाही असा सवाल बाजूला उभी असलेल्या तेजोमयीस पडला. तिने तिच्या अवतीभवती घुटमळत असलेल्या अलेक्झांडरकडे बघितलं. त्यानेही होकारार्थी मान आणि शेपूट हलवली. अरे, हो हो सॉरी ! बाबा ओशाळून म्हणाले आणि त्यांनी रवीला आत बोलावलं. आईने त्याला बसायला सांगितलं. काय...