Posts

Showing posts from March, 2023

लाल यादी

Image
  लाल यादी बऱ्याच दिवसांनी कॉलनीतल्या टोळीतील तेजोमयी,कल्याणी,वैष्णवी,प्रदीप,टिंकू,चिंकू,श्रीकांतही मंडळी मारुतीरायाच्या मंदिरात गोळा झाली. या टोळीला मारुतीराया नेहमीच हसतमूख वाटायचे. अरे या या,तुम्ही आलात ते बरं झालं खूप आनंद झाला, वगैरे ते बोलण्याचा आणि गदा हलवून आशीर्वाद देण्याचा भास तेजोमयीला व्हायचा. हा भास खरच असल्याच सगळया टोळीचं एकमत होतं. त्यामुळे मारुतीरायांनी गदा हलवून आशीर्वाद दिला असं तेजोमयीनं सांगितलं की टोळी मग मंदिरातल्या बाकांवर बसून गप्पा-टप्पा करायला मोकळी. पण आज मारुतीरायांसमोर एक मिनिटे उभे राहूनही, त्यांची गदा हलण्याचा भास तेजोमयीस झाला नाही.त्यामुळे ती काहीच बोलेना. त्यामुळे टोळीसही हालता येईना. अगं काय झालं ? मारुतीरायांनी आशीर्वाद दिला नाही का ? कल्याणीनं विचारलं. तेजोमयीनं नकारार्थी मान हलवली.म्हणजे ते रागावले की काय ? प्रदीप म्हणाला. पण,ते आपल्यावर कशासाठी रागावतील बॉ,आपण तर काहीच केलं नाही ? टिल्लू म्हणाला. काय हो मारुतीराया तुम्ही आमच्यावर रागावलात की काय ? श्रीकांतच्या तोंडून निघूनच गेलं. सर्वांनी आधी त्याच्याकडे आणि नंतर मारुतीरायां...

ताप...

Image
  ताप... सार्थक आणि अवनीश या दोघांनांही आईसक्रीम खूप आवडतं. इतर कोणताही हट्ट पुरवता येत नसेल तर सार्थक आणि अवनीशचे बाबा त्या दोघांनांही आईसक्रीम पार्लरमध्ये घेऊन जाणार, त्यांच्या आवडीचे आईसक्रीम घेऊन देणार..दोघांचंही समाधान झालच म्हणून समजा. सार्थक आणि अनिकेत हे दोघे चुलत भाऊ. सार्थक वरच्या मजल्यावर राहतो तर अनिकेत खालच्या मजल्यावर. त्यांच्या घरी पाहुणे आले की सकाळची न्याहरी सार्थककडे तर दुपारचे भोजन अवनीशकडे, अशी विभागणी व्हायची. त्यावेळी वरचे आणि खालचे एकत्रच पाहुण्यांसोबत जेवायला बसत असत. पाहुणे आले की सार्थक आणि अवनीशची चंगळ. पाहुण्यांसाठी गोडधोड, आईसक्रीम असं सारं काही होत असे. त्यामुळे घरी पाहुणे येतात कधी, याची ते दोघेही कायम वाट बघायचे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे त्यांच्याकडे कुणी आल नव्हतं. हळूहळू करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं दिसल्यावर डिसेंबरमध्ये सार्थक आणि अवनीशकडे मुंबईचे पाहुणे आले. पाहुणे म्हणजे सार्थक आणि अवनीशची आत्या. आत्या येताना दोघांसाठी वेगवेगळी खेळणी आणि खूप सारा खाऊ घेऊन यायची, त्यामुळे सार्थक आणि अवनीश आत्यावर खुष असत. आत्या आल्य...

गाणारा ससोबा

Image
  गाणारा ससोबा बाबांनी आणलेला ससा रोहितला खूप आवडला. हा ससा खराखुरा नव्हता तर ते होतं एक खेळणं. मात्र हा ससा अगदी खऱ्या सारखाच दिसायचा. गुबगुबित. इकडून तिकडे हळूवार कधी उड्या मारत तर कधी तुरुतुरु चालत जाणारा. त्याच्याकडे आणखी एक गंमत होती. ती म्हणजे त्याला कोणत्याही संकटाच्या वेळी गाणं म्हणता येत असे. कृत्रिम बुध्दीमत्तेने म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्यानं त्याच्या पोटातली ही जादू शक्य झाली होती. तर, एकदा राहूल या ससोबाशी खेळत बसला असताना त्याला डुलकी आली. त्याचवेळी तिथे बाजूच्या काकांचा, टोनी द डॉगी, आला. या ससोबाला बघून ही मस्त मेजवाणी मिळालीय आयतीच, याचा त्याला खूप आनंद झाला. इकडेतिकडे कुणीनाही हे बघत त्याने ससोबास तोंडात पकडलं आणि धूम ठोकली. टोनी रस्त्यावर येताच अचानक ससोबा गाऊ लागला, चोरा रे चोरा, पळतोस कशाला ! मुंगी बनशील शाप देतो तुला !! हे गाणं कानावर पडताच टोनी घाबरला. त्याने पटकन ससोबास रस्त्यावर सोडून दिलं आणि धूम ठोकली. रस्त्यावर पडलेल्या या सशाकडे आकाशात उडत असणाऱ्या गरुड पक्षाचं लक्ष गेलं. झरदिशी खाली येऊन त्याने ससोबास चोचीत पकडलं आणि तो ...

अनाठायी भीती

Image
  अनाठायी भीती वननगरीच्या खूप आतमध्ये गोड्या पाण्याचा एक तलाव होता. त्याच्या अवतीभवती सुंदर फुले झाडे होती. गोड आणि मधूर फळांची झाडे होती. पण तिकडे जाण्याची हिम्मत हरणांना होईना. कारण त्यांच्या कानावर आलं होतं की, तिथे गेलं की तिथे दडून बसलेले कोल्हा, अस्वल, कुत्रे हल्ले करुन हरणांना खाऊन टाकतात. तिथे म्हणे फक्त भूतच जाऊ शकतात. तिथे दुसरे कुणी गेलं तर ती भूतं त्या प्राण्याला उचलून नेतात आणि तलावाच्या पाण्यात ढकलून देतात. तिथे फक्त वननगरीच्या महाराजांनाच जाण्याची परवानगी आहे. दुसरं कुणी गेलं, तर वनदेवता नाराज होऊन त्याला शाप देते. अशी ती वेगवेगळी कारणं होती. पण आई, एका पाडसाने एकदा आईला विचारलं, हे कधी प्रत्यक्ष घडल्याचं आपल्या हरण काका-काकू-मामा-मामी-दादा-ताई-आजी-आजोबा यांनी प्रत्यक्ष बघितलंय का ? याचं उत्तर काही हरण आईस देता आलं नाही. यावर ते पाडस म्हणाले, आपण जाऊन यायचं का गं,तिथे ? म्हणजे खरं काय ते कळेल ना. अरे बाबा, नको नको.. कशाला सुखाचा जीव संकटात टाकायचा म्हणते मी, आई पाडसाला म्हणाली. अगं कशाला घाबरतेस तू ? आपल्या पायात किती शक्ती आहे. आपल्या इतक्या वेगाने कुणी...