Posts

Showing posts from August, 2022

नवा धडा

Image
  नवा धडा   तेजोमयीच्या घरी बाप्पांचं आगमन झालं. बाप्पांना मखरात बसवलं गेलं. सजावटीसाठी बाबांनी खूप फुलं आणली होती. तिघांनीही मिळून छान सजावट केली. मखरात बसलेला   कुणीतरी खासा असल्याचं अलेक्झांडर   ला कळलं होतं. त्यामुळे तोही कौतुकानं तिघांच्या सजावटीकडे बघत होता. हे तिघेही काम करताहेत नि आपणास काहीच करता येत नाही, याची खंत अलेक्झांडरला वाटली असावी म्हणून मग त्याने फुलांची पिशवी उचलली नि इकडून तिकडे फिरवून आणली. पुन्हा तो तिघांकडे आणि नंतर बाप्पांकडे उत्सुकतेने बघू लागला. थोड्याच वेळात पुन्हा अस्वस्थ झाला. त्याने पुन्हा फुलांची पिशवी उचलली आणि इकडून तिकडे फिरवून आणली. अरे, तुझं चाललय तरी काय, जरा शांत बसना, तेजोमयी अलेक्झांडरकडे बघत म्हणाली. आई सांगना याला, तिने आईकडे तक्रार केली. काय रे ठोंब्या, कां असा अस्वस्थ झालास तू..जरा शांत बसना जरा. .आईने त्याला समजावलं. आईचं   समजावणं अलेक्झांडरला बरोबर कळतं. त्यामुळे तो काही वेळ, मान जमिनीस टेकवून शांतपणे बसला. पण पुन्हा अस्वस्थ झाला. यावेळी त्याने फुलांची पिशवी घेतली आणि तिला उपडी केली. सर्व फुलं ख...

गर्वाचे घर खाली

Image
  गर्वाचे घर खाली एका कुंभाराकडे एक घोडा आणि एक गाढव होतं. घोड्याचा उपयोग हा कुंभार जाण्या-येण्यासाठी करायचा. गाढवाचा उपयोग ओझे वाहण्यासाठी. घोड्यावरुन जाणं-येणं होत असल्याने त्याची विशेष सरबराई केली जाई. त्याला वेगळं खाऊ-पिऊ घातलं जात असे. सकाळी-सकाळी कुंभार आधी त्याच्याकडे येऊन त्याची पाठ थोपटायचा. पाठीवरुन हात फिरवायचा. मात्र तो गाढवाकडे ढुंकूनही बघत नसे. यामुळे आपणच कुंभाराचे आवडते म्हणजे विशेष असल्याचा गर्व घोड्याला झाला. तो गाढवाशी तुच्छतेने वागू लागला. कुंभाराच्या घरातील कुत्रे, म्हैस, गाय यांच्याशीही तो तुसडेपणाने वागू लागला. आपण सर्वश्रेष्ठ असल्याचा दर्प त्यांच्या वागणुकीतून दिसून येऊ लागला.. हा घोडा गाढवाला सतत हिणवत राहायचा. गाढव बिचारा त्यावर काही उत्तर देत नसे. तो निपूटपणे आपलं काम करत राही. कुंभार त्याच्याकडे सकाळी कधीच लक्ष देत नसला तरी रात्री मात्र गाढवाच्या पाठीवरुन हात फिरवूनच झोपायला जायचा, हे काही घोड्याला ठाऊक नव्हते. आपण सर्वश्रेष्ठ असल्याचा दर्प झालेला घोडा कधीकधी कुंभाराशीही आढ्यतेने वागायचा. मात्र त्याच्यावरुन जाणं येणं करावं लागत असल्यानं कुंभार ...

चिरकूट

Image
  चिरकूट तेजोमयीच्या घरी तिचे बाबा अधून मधून घर झाडायचे. आईला तितकीच मदत, अशी यात त्यांची भावना. घर झाडताना कधी झुरळं, मुंग्या, माकोडे यांच्यावरुन झाडू फिरायचा. मध्येच कधीतरी चपळतेने इकडे तिकडे भटकू पाहणारी अळी दिसायची. अळी दिसली की तिला थेट यमराजांच्या घरीच पोहचवायचे अशी आईची सक्त ताकिद होती. मात्र, अशी अळी दिसली की बाबांचे हात गळपटायला लागायचे. त्या गडगबडित ती अळी इकडे-तिकडे निसटायची. यावरुन मग आई बाबांना चार- दोन गोष्टी सुणावणार. आज बाबा घर झाडत असताना एक हिरवट रंगांची अळी वळवळत झाडू समोर आली. अळीला पकडण्यासाठी बाबांची झटापट सुरु झाली. क्षणात इथे तर क्षणात तिथे असं तिचं वळवळणं असल्यानं, ती काही गवसत नव्हती. बाबांची ही फजिती बघून तेजोमयीस हसू येत होतं. अलेक्झांडर तिच्याकडे टक लावून बघत होता. या पिटुकल्या अळीच्या पाठीमागे कां बरं बाबा लागले असावेत असा मोठा प्रश्न अलेक्झांडरच्या चेहऱ्यावर उमटला. बाबांना मदत करावी म्हणून त्याने अळीवर भुंकून बघितलं. पण शून्य परिणाम. आपल्या भुंकण्याला भले भले कापतात, या चिरकुटास काहीच कशी भीती वाटत नाही ब्बॉ, असं अलेक्झांडरला वाटलं असावं कारण त्...

पालवी आणि फुलपाखरु

Image
  पालवी आणि फुलपाखरु तेजोमयीच्या कॉलनितल्या तिच्या सदनिकेसमोर असलेलं झाड प्रचंड पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे कोसळलं. खूप जुनं असलेलं हे झाड कोसळल्यानं आई - बाबा- तेजोयमी आणि कॉलनितल्या सर्वांना खूप दु:ख झालं. सर्वांनी हळहळ व्यक्त केली. दोन- तीन दिवस ते झाड तसंच अस्ताव्यस्त पडून होतं. एके दिवशी सकाळी सकाळी महापालिकेची एक गाडी आली. त्यातून पाच सहा माणसं उतरली. त्यांच्याकडे मोठ मोठी अवजारे होती. त्या अवजारांच्या सहाय्यानं त्या व्यक्तींनी झाडाच्या फांद्या कापायला सुरुवात केली. त्या यंत्राच्या आवाजामुळे आईबाबा आणि तेजोयमीस जाग आली. अलेक्झांडर जोरजोरात भुंकू लागला. आईबाबांनी गॅलरित येऊन बघितलं. झाडं कापण्याचं काम लयित सुरु होतं. यंत्रांनी कापल्या फांद्यांकडे बघून आईबाबास भरुन आलं. तेजोयमीस कससचं वाटलं.अलेक्झांडर गॅलरीच्या खिडकीवर चढून   भुंकू लागला. बाबांनी त्याला चूप केलं. बराच वेळ फांद्यांची कापाकापी सुरु होती. फांद्या कापणारी माणसं वेगळी होती आणि कापलेली लाकडं गोळा करुन व्यवस्थितपणे ट्रकमध्ये ठेवणारी माणसं वेगळी होती. दोन दिवस हे काम सुरु होतं. बुंध्यापर्यंत झाड कापून झालं हो...

भुताई जादू

Image
  भुताई जादू       वननगरीत वाघोबांची अरेरावी दिवसेंदिवस वाढतच चालली होती . आपणच या वननगरीचे मालक असल्याची त्यांची समजूत होती . त्यामुळे इतर सर्व प्राण्यांनी आपल्याच आज्ञेत राहायला हवं . आपली हांजी हांजी करायला हवी असं त्यांना वाटत असे .    शुल्लक शुल्लक गोष्टींवरुन इतर प्राण्यांना त्रास द्यायला त्यांना फार आवडे . एखाद्या प्राण्याची छेड केली नाही तर त्यांचा दिवस चांगला जात नसे आणि त्यांना रात्री झोप येत नसे . त्यांच्या अरेरावीमुळे आणि दुष्टपणामुळे सारे प्राणी त्रस्त झाले होते . त्यांच्या जाचाला कंटाळून काही प्राण्यांनी वननगरीला रामराम ठोकण्याचा विचार सुरु केला होता . पण जाणार कुठं , हा प्रश्नच होता . या प्रश्नाचं उत्तर काही कुणाला सापडलं नाही . आहे त्या परिस्थितीत आपल्याच वननगरीत राहण्याचा निर्णय प्राण्यांनी घेतला . वाघोबांच्या जाचाला सहन करीत ते आला दिवस काढू लागले ..     हत्तीदादा , अस्वलराव या बलाढ्य प्राण्यांनी वाघोबांना समज...