Posts

Showing posts from May, 2022

खोटं खोटं खरं की खरं खरं खोटं?

Image
  खोटं खोटं खरं की खरं खरं खोटं ? कल्याणी, तेजोमयी, टिल्लू, पिल्लू, टिनी, प्रदीप ही टोळी परवा मारोतीरायाच्या मंदिरात जमली. मारुतीरांना नमन झालं त्यांनी गदा हलवून आशीर्वाद दिल्याची खात्री केल्यावर सर्व मंडळी मंदिरातील बाकड्यांवर जाऊन बसले. गदा हलवून आशीर्वादाची खात्री मारुतीराया स्वत: करत नसत. टोळीतल्या तेजोमयीस तसा प्रत्येक वेळी भास होतो, असं तिचं म्हणणं. तिने टोळीला सांगितलं की त्यांचं समाधान व्हायचं. मारुतीराया गदा हलवून आशीर्वाद देतात आणि तेजोमयी जे सांगत ते सत्यच यावर टोळीचा शंभर टक्के विश्वास असल्याने, कधी कुणी यावर प्रश्न ब्रिश्न विचारले नाहीत. तर, आज टोळी बाकड्यांवर बसल्यावर प्रदीप अचानक बोलून गेला, आपण खरोखरच खोटं बोलत नाही का राव, याचा शोध घेतला पाहिजे.. म्हणजे ? टोळितील इतर सदस्य एकमुखाने म्हणाले. पदोबा, तुझ्या डोक्यात काहीबाही येत बाँ.टिल्लू म्हणाला. काही येतं, पण बाही येत नाही.प्रदीप मख्ख चेहऱ्यानं म्हणाला. काहीही हं,पद्या. तेजेामयी म्हणाली. अरे, विनोद बाजूला ठेवा, पदोबा म्हणतो त्यावर विचार करायला का हरकत आहे. आपण खरच खोटं बोलत नाही का ? कल्याणी म्हणा...

आळस

Image
  आळस एका झाडावर कबुतरताई आणि खारुताई आनंदानं राहत. दोघांची चांगली मैत्री होती. एकदा दोघिंनाही बाळ झालं. दोघिंना फार आनंद झाला. दोघीही एकमेकांच्या बाळांना सांभाळायच्या. खारुताई बाहेर गेली की कबूतरताई तिच्या बाळाकडे लक्ष द्यायची. कबूतरताई बाहेर गेली खारुताई तिच्या बाळाकडे लक्ष द्याची. बाहेरुन आणलेला खाऊ एकमेकांच्या बाळांना दोघेही देत. असं छान आनंदात चाललं होतं. दोन्ही बाळं हळूहळू मोठी होऊ लागली. त्यांचं ते मोठं होणं खारुताई आणि कबुतर ताई डोळा भरुन बघत असत. दोन्ही बाळ सतत एकत्र रहात असल्यानं ते एकमेकांचे मित्र झाले. ते दोघेही एकत्र खेळत. दंगामस्ती करत. खारुताईचं बाळ आणखी मोठं झालं नि ते अधिक उत्साही झालं. या फांदीवरुन त्या फांदीवर नि त्या फांदीवरुन थेट जमिनीवर. जमिनीवरुन आणिखी दुसऱ्याच झाडावर. असं या बाळाचं पळणं, लपणं, सगळीकडे उत्सुकतेनं बघणं सुरु असायचं. मात्र, इतका उत्साह कबुतर ताईच्या बाळाकडे नव्हता. तो थोडाफार उडायचा नि परत येऊन झाडाच्या फांदिवर बसायचा. ज्या झाडावर ते राहत, त्या झाडाच्या सगळया फांद्या बघणं त्याला आवडायचं नाही. मात्र खारुताईच्या बाळाला, त्या झाडाची प्रत्...

अनोळखी आदर्श..

Image
  अनोळखी आदर्श.. तेजोमयीच्या वर्गात सरांनी तुमचे आदर्श कोण यावर निबंध लिहिण्याची स्पर्धा घेतली. सर्वांनी या स्पर्धेत हिरीरीने भाग घेतला. मुलांनी निंबध उत्तमच लिहिले होते. बहुतेक सर्वांच्या आदर्शात महात्मा गांधी, सचिन तेंडुलकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, महेंद्रसिंग धोनी, पंडित जवाहरलाल नेहरु, मेरी कॉम, पी.व्ही सिंधू, एपिजे अब्दूल कलाम अशासारख्या थोरामोठ्यांची नावे होती. मात्र, तेजोमयीने आपला आदर्श म्हणून ज्या व्यक्तिस निवडलं होतं, ते वाचून सर विचारातच पडले. कारण त्यांना सुध्दा ते नाव ठाऊक नव्हतं. त्यांच्या कानावरुन सुध्दा ते गेलं नव्हतं. सरांच्या पुढे पेच आणि प्रश्न पडला. या निबंधाचं काय करायचं ? किती गुण द्यायचे ? ते कशाच्या आधारावर द्यायचे ? त्यांना या विचाराने ताण आला. त्यामुळे त्यांनी तेजोमयीचा निंबध तपासला नाही. दुसऱ्या दिवशी निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करायचा होता. सर्वमुले सरांची उत्सुकतेने वाट बघत होते. सर वर्गात आले तेव्हा सर्वांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. ते, निकाल कधी जाहीर करतात यांची उत्सुकता सर्वांच्या चेह-यावरुन स्पष्ट दिसत होत...

शाळा मिळाली

Image
  शाळा मिळाली समीर त्याच्या भावंडामध्ये तिसरा.शेंडेफळ.त्यामुळे सर्वांचा लाडका.लहानपणी त्याचे खूप कोडकौतुक झाले.त्याच्या दोन्ही मोठ्या भावनां पुस्तकं वाचण्याचा छंद होता तर समीरला बाहेर भटकण्याचा. त्याचे दोन्ही भाऊ पुस्तकं घेऊन बसले की हा पठ्ठा तिथून पळालाच म्हणून समजा.पुस्तक वाचण्यातला आनंद वगैरे दोन्ही भावांनी त्याला समजावून सांगितलं पण ते काही समिरला पटलं नाही.त्यामुळे पुढे जेव्हा तिघेही शाळेत जाऊ लागली तेव्हा अभ्यासाची पुस्तकं वाचण्याचा जाम कंटाळा समीरला येउु लागला. त्याचे दोन्ही भाउु मात्र मनलावून अभ्यास करीत.त्यांना परीक्षेत चांगले गुणही मिळत.पण समीर मात्र अगदीच काठावर पास व्हायचा.एक दोन वर्षे त्याला या बद्दल फारसं काही बोललं नाही.शेंडेफळ असण्याचा फायदा त्याला मिळाला.आई-बाबांनी समजावलं.दोन्ही भावांनी समजावलं.पण समीरचं पुस्तकात लक्षच लागेना.त्यामुळे वर्गातही लक्ष लागेना.त्यामुळे एके दिवशी त्याने शाळेत जाणेच टाळले. आता जायचं कुठे ? हा प्रश्न त्याला पडला.त्याची निरर्थक भ्रमंती सुरु झाली.या गल्लीतून त्या गल्लित जात असताना,त्याला एके ठिकाणी एक कारागिर शाडूच्या मूर्ती तयार करत...