शेपटीच्या शोधात...
शेपटीच्या शोधात... आज दरबाराज गजराजाचं मन काही लागत नव्हतं. सगळा वेळ ते शून्यात बघत होते. अखेर प्रधानजींनी त्यांना भीत भीत विचारलं. महाराज आज आपली तब्येत बरी नाही का ? अं नाही, हो म्हणजे नाही, हो काही नाही...असं काही तरी गजराज म्हणाले. तेव्हा प्रधानजींसोबत दरबारातील इतरांच्याही लक्षात आलं की महाराजांचं मन काही आज थाऱ्यावर नाही. प्रधानजी हिम्मत करुन गजराजांच्या जवळ गेले आणि त्यांनी गजराजांच्या कानात फुंकर मारली. तेव्हा कुठे गजराज खडबडून उठले. समोर प्रधानजी बघून त्यांना आश्चर्य वाटलं. प्रधानजी तुम्ही आमच्या इतक्या नजिक कसे कां आलात ? महाराज आपली ख्याली-खुशाली व्यक्त करण्यासाठी आलो. आज आपले लक्ष थाऱ्यावर दिसत नाही. आम्ही आणि दरबाऱ्यांनी विचारपूस केली तरी तुम्ही अनाकलनीय बोलतात, म्हणून तुमच्याजवळ यावं लागलं. क्षमा असावी महाराज.तुम्हास नेमकं काय झालं, ते सांगाल तर आम्हा सर्वांचा जीव भांड्यात पडेल... गजराजांनी प्रधानजींना त्यांच्या जागी आसनस्थ व्हायला सांगितलं. प्रधानजी आसनस्थ झाल्यावर गजराज बोलू लागले, काल पासून माझ्यासमोर एक प्रश्न निर्माण झालाय. जो तो उठतो आणि म्हणतो...