वाघाची मावशी
वाघाची मावशी वाघाची मावशी, वाघाची मावशी असं सारखं सारखं आपणास म्हणून आपला अपमान कां केला जातो असा प्रश्न मांजरीला पडला. ही मांजर राहायची मुंबइतल्या एका मोठ्या सदनिकेत. तिची मालकीनबाई तिचा फार लाड करायची. लाडानं तिला टिटू म्हणायची. आपली टिटू ही इतरांच्या घरी असलेल्या मांजरींपेक्षा अधिक स्मार्ट आणि हुषार व्हावी असं त्यांना वाटायचं. त्यामुळे त्या टिटूला जगातल्या सगळया गोष्टी सांगत. टिटूसुध्दा त्यावर मान डोलवायची. याचा अर्थ तिला सारं काही कळतं असं मालकीनबाईंना वाटायचं. आपली ही स्मार्ट टिटू डॅशिंग व्हावी. कुणालाही भिऊ नये अशी त्यांची इच्छा होती.. त्यामुळे त्यांनी तिला स्वरक्षणाच्या आणि इतरांवर आक्रमण करण्याच्या काही गोष्टी शिकवायचा प्रयत्न केला. या प्रकारानं टिटू कंटाळली. त्यामुळे तिने पळून जाण्याचाही विचार केला. पण पळून गेल्यावर आपणास असं छान छान गुबगुबित अंथरुणावर झोपायला मिळणार नाही. खायचेप्यायचे लाड होणार नाहीत. मालिकीनबाईच्या गाडीतून फिरायला मिळणार नाही. नटायला मिळणार नाही. सजायला मिळणार नाही हे तिच्या लक्षात आलं. त्यामुळे तिने पळून जाण्याचा बेत बदलला. मालकीनबाई जे काही प्...