Posts

Showing posts from December, 2022

स्वागत करा पहाटे..पहाटे..

Image
  स्वागत करा पहाटे..पहाटे.. बघता बघता जुनं वर्ष संपलं. तेजोमयी बाप्पांना म्हणाली.        बाळ असच असतं. काळ वेगानं धावत असतो. आपल्याला वाटतं खूप वेळ आहे , आजचं काम उद्या केलं तरी चालू शकतं. खरय ना. बाप्पा म्हणाले.        हो ना .        मग त्यामुळे आपण टाइमपास करायला जातो. आपल्याला पटतच नाही की हा टाइमपास म्हणजे वेळ वाया घालवणं .खरय ना.       हो हो   बाप्पा.       वेळ भूर्रकन निघून जाते नि आपण आहो तिथेच राहतो. ठरवलेल्या गोष्टी होत नाही. प्रगतीला खिळ बसते.        खरय ना.        खरय बाप्पा. पण हेच तुम्ही मला गेल्या वर्षी पण सांगितलं होतं.       होतं ना ! नवीन वर्ष आलं की त्याची पुन्हा उजळणी केली की बरं असतं.        पण हे ऐकून कान विटले हो बाप्पा.        उत्तम. मी माझं काम केलं.आता तुला त्यातून काय बोध घ्यायचा ह...

अलेक्झांडरचा विमा

Image
  अलेक्झांडरचा विमा परवा तेजोमयीच्या घरी पहिल्यांदाच एक अनोळखी गृहस्थ आले. बाबा त्यांना ओळखत असावे. पण आई, तेजोमयी आणि अलेक्झांडर- द-डॉगीने त्यांना बघण्याचा प्रश्नच नव्हता. पहिल्यांद्याच घरी आलेल्या या व्यक्तिचे, अलेक्झांडरने त्याच्या पध्दतीने स्वागत केले. मात्र बाबांनी त्याला समजावून सांगितल्यावर त्याचं गुरगुरणं कमी झालं. बाबांनी त्याला आत पाठवून आईला हॉलमध्ये घेऊन येण्यास सांगितलं. घरी आलेल्या गृहस्थांचं नाव होतं, अजित पांडे. ते आरोग्य विमा एजंट होते. बाबांनी त्यांची आईला ओळख करुन दिली. आईने त्यांना नमस्कार केला आणि चहा आणते म्हणून आत गेली. थोड्यावेळाने आई चहा घेऊन खोलित आली. आई एखाद्याला चहापाणी स्वत: देते म्हणजे,त्या व्यक्तीवर गुरगारयचं नाही, भुंकायचं नाही, हे  अलेक्झांडरला बरोबर कळलं होतं. त्यामुळे तो आईसोबत हॉलमध्ये आला. पांडे काका यांच्या पायाभोवती घुटमळून पुन्हा आत निघून गेला. प्रारंभी किंचित दचकलेले पांडे काका, अलेक्झांडरच्या प्रेमळ बघण्याने विरघळून गेला. फारच गोड आहे हो तुमचा कुत्रा...असं ते बोलून गेले. कुत्रा नाही,अलेक्झांडर...बाबा म्हणाले. आमचा लेक. तेजोम...

तोतया वाघोबा?

Image
  तोतया वाघोबा ? एकदा वननगरीत वाघोबा आणि त्यांची दोन मुलं रमतगमत चालली होती. फिरता फिरता त्यांना एक तलाव लागला. तलावातील वनस्पतींना सुंदर सुंदर फुलं लागली होती. तलावात बदक आणि दुसरे पक्षी छान विहार करत होते. तलावाच्या भोवती असणारी झाडे फुलं-फळांनी लदबदून गेली होती. त्यांचा मोहक सुगंध सर्वत्र दरवळत होता. त्या झाडांवर माकडं इकडून तिकडे उड्या मारत खेळत होती. वेगवेगळे पक्षी झाडांवर निवांत बसले होते. काही पक्षी डुलक्या घेत होते, काही फळं-फुलं खाण्यात मग्न होते. काही पक्षी गात होते. असे ते प्रसन्न वातावरण बघून वाघोबास तिथे काही क्षण थांबण्याची इच्छा झाली. त्याने दोन्ही बछड्यांना तसं बोलून दाखवलं.त्यांनाही तहान लागलीच होती.ते लगेच हो म्हणाले. तिघांनीही आधी तलावाचं चवदार पाणी प्राशन केलं. ते गोड पाणी पिऊन तिघांची तहान शांत झाली. पाणी प्याल्यानंतर तिघेही एका मोठ्या डेरेदार वृक्षाच्या सावलीत येऊन बसले. त्या सावलीत वाघोबांना थोड्यावेळाने झोप आली. वाघोबा झोपल्याचं बघून दोन्ही बछडे खेळू लागले. त्या झाडावर काही माकडं आणि त्यांची पिल्लं दंगामस्ती करत होती. वाघोबांची पिल्लं बघून माकडांच्या...

मैत्री वेळापत्रकाशी

Image
  मैत्री वेळापत्रकाशी   मुलांच्या मासिकात आलेल्या महिन्याच्या प्लॅनरकडे बोट दाखवत तेजोमयीनं बाबांना विचारलं , बाबा , हे मासिक प्रत्येक महिन्याला कां बरं असं प्लॅनर देतं ?            अगं,प्लॅनर म्हणजे नियोजन करुन  ठेवण्याचं वेळापत्रक !            पण त्याचा काय उपयोग ? तेजोमयीनं विचारलं.            त्याचा खूप उपयोग होतो. आपणास एखादं कार्य कधी पूर्ण करायचय ? एखादं पुस्तक वाचून कधी पूर्ण करायचय ? गणिताची सूत्रं पाठ करायची असेल तर ती कधीपर्यंत करायची ? मित्र मैत्रिणींचे वाढदिवस कधी आहेत आणि त्यांच्यासाठी भेट वस्तू कधी घ्यायच्या ? अशा छोट्या मोठ्या गोष्टी महिन्याच्या सुरुवातीला लिहून ठेवल्या नि प्रत्येक आठवडयात या प्लॅनरवर नजर टाकली की ठरवलेल्या किती गोष्टी झाल्या नि किती करायच्या राहिल्या हे कळतं. तसं मग आपल्याला वेळंच व्यवस्थापन करता येतं. महत्चाच्या गोष्टींना किती वेळ द्यायचा हेही कळतं. शिस्त लागते. म्हणून या प्लॅनरच महत्व ! तू पण ...

भुताटकीचा धडा

Image
  भुताटकीचा धडा गावाकडच्या घरी एका सावकाराकडे असलेल्या कोंबडेरावांचा थाट काही और होता. उंचापुरा, डौलदार आणि त्याचा तो भरदार तुर्रा ! तो चालायचा तेव्हा जणू एखाद्या राजाची स्वारी निघाल्यासारखी वाटे. सावकाराच्या घरातील इतर कोंबडे, कोंबड्या, बदकं, कुत्रे, मांजरी, गाढवं या कोंबडेरावाला जरा वचकून असत.   हे कोंबडेराव सावकारांचे फार आवडते. कुणीही पाहुणे त्यांच्याकडे आले की सावकार कोंबडेरावांची विशेष ओळख करुन देत. येणारा प्रत्येक पाहुणा कोंबडेरावांचं मनसोक्त कौतुक करायचा. त्याच्या जागी दुसरं कुणी असतं तर या अशा कौतुकानं शेफारुनच गेला असता. त्याला गर्वही झाला असता. पण कोंबडेरावांचं तसं काही झालं नाही. त्याचे पाय जमिनीवरच राहिले. तो सावकारांचा आवडता असल्याने त्याला इतर प्राण्यांपेक्षा, ते त्याला चांगलं खाऊ पिऊ घालत. काजू-बदाम देत. आपल्या सोबत्यांसोबत खान्यापिन्याचा बाबत सावकार भेदभाव करतात हे बघून कोंबडेरावांना वाईट वाटे. यातून त्याने आपल्या बुध्दीने एक मार्ग काढला. तो सावकारांची नजर चुकवून त्याला मिळालेले काजू-बदाम आलटून पालटून घरातील इतर कोंबड्या, बदकं, कुत्रा,गाढव आणि मांजरी...

दंतकथा

Image
  दंतकथा एकदा कोंबडे आजोबा आपल्या नातवंडांना घेऊन फिरायला निघाले. थोडं फिरुन झाल्यावर नातवंडं थकली. त्यामुळे आजोबा एका झाडाच्या सावलीत बसले. त्यांच्या अवतीभवती नातवंडं बसली. त्यातील काही जण आजोबांच्या पाठीवर बसून खेळू लागली. तर काही नातवंडं त्यांच्या तु-याशी खेळू लागली. नातवडांच्या या खेळात आजोबा रममाण होऊन गेले. खेळता खेळता एका नातवानं त्यांना अचानक विचारलं, आजोबा आजोबा, आपण सकाळी आरवतो म्हणून सूर्य उगवतो कां हो ? या प्रश्नावर आजोबा हसले. आजोबा हसता कशाला ? नातवाने रुसून विचारलं. सूर्य महाराज आपल्या आरवण्यामुळे उगवतात असं तुला कुणी सांगितलं ? आजोबांनी विचारलं. कुणी कशाला सांगायला हवं. लहानपणापासून तेच तर कानावर पडतय ना ! म्हणजे तू मोठ्ठा झालास वाटतं, त्या पिल्लूकडे बघून हसत आजोबा म्हणाले. आजोबा, हे काही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. बाळा, आपल्या बाबतीतली ही दंतकथा. म्हणजे याने त्याला सांगितली,त्याने याला सांगितली, असं करत करत ती तुमच्यापर्यंत पोहचली. अहो आजोबा, आपण आरवलो की सकाळ झाली असं सगळं जग समजतं. अगदी बरोबर. पण, सूर्यमहाराज उगवल्यावर सकाळ होते ना. ...