बाप्पांची चिंता
बाप्पांची चिंता बाप्पा जरा चिंतेत दिसले. तेजोमयीनं ते ओळखलं. बाप्पा कसली काळजी करता तुम्ही , तेजोमयीनं विचारलं. तुला काहीच काळजी वाटत नाही. कशाची बाप्पा. तेजोमयीनं उलट प्रश्न केला. मी काल टीव्हीत बघितलं. काय ते.. अगं पाण्याचं.. पाण्याचं काय , आपल्यासाठी जे नळातून पाणी येतय ना. . त्या तलावात यंदा खूप कमी पाणी शिल्लक उरलय.. मग.. त्यामुळे आपल्याला कमी पाणी मिळणार.. हो का.. अगं असं टीव्हीवाल्यानं सांगितलय ना.. मला माहीतच नाही हो बाप्पा... म्हणूनच मला चिंता वाटतेय..अगं आता पुढचा पावसाळा येईपर्यंत पाणी असचं मिळत राहणार. त्यामुळे पाण्याचा वापर सुध्दा काळजीपूर्वक करावा लागणार.. आपल्या घरी पाण्याचा मुक्त वापर दिसतो मला. सकाळी उठल्यावर चूळ भरायची म्हंटल तरी फूल्ल नळ लावतो नि दोन मिनटं तसच पाणी वाहून जातं..बरोबर की नाही.. होय बाप्पा.. तुझे बाबा तर दाढी करण्याच्...