गांधीजी, माकडं आणि असहकार...
गांधीजी, माकडं आणि असहकार... नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानात एकच हलकल्लोळ माजला. इतक्या वर्षात प्रथमच असं घडलं. या उद्यानात गांधीजींच्या तीन माकडांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. या तीन माकडांपैकी एक़ डोळयावर दोन्ही हात ठेऊन सांगत असतो की वाईट काही बघू नका. दुसरा माकड दोन्ही कानावर हात ठेऊन सांगत असतो की़, वाईट काही ऐकू नका. तिसरा माकड तोंडावर दोन्ही हात ठेऊन सांगतो की, काहीही वाईट बोलू नका. वर्षानुवर्षे पर्यटक येथे येतात आणि या माकडांना बघून खूष होतात. त्यांच्यासोबत छायाचित्र काढतात. आताशा सेल्फी काढायला लागले. गांधीजींची ही तिन्ही माकडं सर्वांना आनंद देणारीच होती. ००० आज मात्र विपरीत घडलं. पहिल्या माकडाने कानावरुन हात काढले. दुसऱ्याने तोंडावरुन तर तिसऱ्यानं डोळयावरुन. यामुळे त्यांचं वैशिष्ट्यच गेलं. हा कुणाचा तरी खोडसाळपणा असावा, असं तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यास वाटलं. पण तसं तर काही दिसत नव्हतं. कारण या मूर्तींची कुणी तोडफोड केली नव्हती. मग हे कसं झालं ? या परिसरात घनदाट जंगल आहे. या जंगलात राहणाऱ्या भूत आणि चेटकिणीने तर जादू केली नसेल ना ? असं या अधिकाऱ्यास वाटलं. मा...