Posts

Showing posts from February, 2023

हत्तीशी मैत्री

Image
  हत्तीशी मैत्री कावळोबा सकाळपासून अस्वस्थ होता. त्याने सकाळची न्याहरीही केली नाही . सारखा कधी वर बघायचा तर कधी खाली. बराच वेळ तो डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. त्याच्या आईने त्याची ही अस्वस्थता बरोबर हेरली आणि त्याला विचारलं... कावळोबा सकाळपासून बघतेय, तुझं चित्त काही थाऱ्यावर दिसत नाही. कसला विचार करतोस इतका ? कावळोबाने बराच वेळ काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा आई त्याला रागावून म्हणाली ... कावळोबा तू मला सांगितलं नाही तर तुला आज जेवायलाच मिळणार नाही. जेवणाचं नाव आईच्या तोंडातून बाहेर पडल्यावर कावळोबांना भुकेची जाणीव झाली. सकाळपासून त्याने काहीही खाल्लं नव्हतं. त्यामुळे आईचे बोल कानावर पडताच पोटात कावळे ओरडायला लागल्याची त्याला जाणीव झाली. कावळोबाने लगबगीने डोळे उघडले आणि तो आई जवळ जाऊन बसला. काय झालं माझ्या राज्या ? सांगना मला.मी तुझी मदत करु शकेन की . आई कावळोबास म्हणाली. अगं आई, तसं काही खास कारण नाही पण. .. कावळोबा म्हणाला. पण काय ? मला सकाळपासून सारखं वाटतय की आपण हत्तीशी मैत्री करावी. तुझ्या स्वप्नात हत्ती आला होता की काय ? नाही गं आई.तसं काही झालं नाही.म...

आई रागावते तेव्हा...

Image
  आई रागावते तेव्हा... वाघीणकाकूस आपल्या दोन्ही बाळांचा फार अभिमान होता. त्यातले कुमार वाघोबा हे चपळ होते. वाघीण काकुंची मुलगी सुस्त होती. पण हळूहळू तीसुध्दा आपल्यासारखी शूर आणि कोणत्याही संकटाला न भिणारी होईल याची खात्री काकुंना होती. ती दररोज दोघांना, जंगलात कसं वागायचं ? कसं फिरायचं ? शिकार कशी करायची ? संकटाची चाहूल कशी ओळखायची ? संकटं आलं तरी न घाबरता स्वत:ची सुटका कशी करुन घ्यायची ? इतर प्राण्यांवर कसा वचक ठेवायचा ? अशा कित्येक गोष्टी समजावून सांगायची. कुमार वाघोबांना या गोष्टी भराभर जमू लागल्या. पण काकुंची मुलगी मात्र मागे पडू लागली. कधी प्रेमानं तर कधी रागावून वाघीण काकू तिला धडे द्यायची. आई आणि दादा असताना आपणास कुणाची भीती कां वाटावी ? असं या मुलीला वाटायचं. कुमार वाघोबाची प्रगती होत असताना, मुलीचं अडखळणं सुरुच होतं.त्यामुळे काकुंना काळजीच वाटू लागली. एकदा, कुमार वाघोबा आणि काकूंची मुलगी जरा निवांत झोपले होते. ते दोघे सुरक्षित आहेत असं बघून काकू शिकारीसाठी बाहेर पडल्या. त्यावेळी तिथे दुसऱ्या क्षेत्रातला वाघोबा कसा कोण जाणे आला. कुमार वाघोबा आणि काकूंच्या झोपलेल्या...

वाघोबाच्या कुशीत

Image
  वाघोबाच्या कुशीत     बाळ , तुला पुढे काय व्हायला आवडेल ,असं आजोबांनी पिंकीला विचारलं.   अहो बाबा ती डॉक्टरच होणार , हो की नाही गं रश्मी. पिंकीच्या बाबांनी तिच्या आईला म्हणजेच रश्मीला विचारलं.   मी तुम्हाला कुठे विचारलय , मी पिंकीला विचारलं ना..   तिला काय कळत त्यातलं.   तू तिच्याएवढा होतास , तेव्हा तुला काय कळत होतं. आजोबा बाबांकडे कटाक्ष टाकत म्हणाले. यावर बाबा निरुत्तर झाले.   0000   पिंकी आठवीत गेल्यापासून , ती पुढे काय होणार याची चर्चा तिच्या घरी सुरु झाली आणि ती डॉक्टरच होणार यावर शिक्कामोर्तब होऊन थांबली. तिचे बाबा डॉक्टर होते , त्यामुळे त्यांना ती डॉक्टरच व्हावी असं वाटायचं. आई बाबाचीच री ओढायची.   सध्या आपल्याला खूप खेळायचं आहे. पुस्तक वाचायची आहेत , फिरायचं आहे किंवा मस्त झोपायचच   आहे , अशाच विचारात गुंतलेल्या पिंकीस आपणास पुढे काय व्हायचंय , याची अजिबात चिंता नव्हती वा पुढे काय करायचय याचा विचारही तिच्या मनात अद्याप आला नव्हता.   डॉक्टर होण्याची चर्चा घरी सुरु झाली की ती , डोळे उघडे ठेऊन कान बंद ...

रस्तेवाले जोशी! (भाग दोन)

Image
रस्तेवाले जोशी ! ( भाग दोन ) ( पूर्वसूत्र - पोलाद निर्मितीतून निर्माण होणाऱ्या कचऱ्यातून ऑस्ट्रेलियाच्या विमानताळाची धावपट्टी बांधण्याचे कार्य स्वत:च्या बळावर रस्तेवाले जोशी यांनी घ्यावे व त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनीच उचलावी,अशी अट कंपनीने घातली...ही अट श्री जोशींनी मान्य केली का ? पुढे काय झालं ?) भाग दोन जोशींना हायसं वाटलं.कारण गुहा अलिबाबाचीच असणार हे त्यांना पक्क ठाऊक होतं. त्यांनी कंपनीचे आभार माणून स्लॅगपासून धावपट्टी बांधण्याच्या कामास सुरुवात केली.ठरलेल्या वेळेत धावपट्टी तयार झाली. विमानतळ अधिकाऱ्यांनी आता नवा प्रश्न त्यांच्या समोर टाकला. ही धावपट्टी टिकावू असल्याचं हे तूच सिध्द कर ? जोशींचा आत्मविश्वास इतका दांडगा की ते संबंधित अधिकाऱ्यास म्हणाले, सर, तुमही जगातील कोणत्याही यंत्रणेला आणा आणि धावपट्टीच परीक्षण करा. उगाच तुम्हाला शंका नको नि पुढे डोकेदुखी नको. या गृहस्थाचा हा आत्मविश्वास आत्मघातकी तर ठरणार नाही ना, असं त्या अधिकाऱ्यांना वाटलं. मात्र त्याने अमेरिकेतील धावपट्टी परीक्षण आणि निरीक्षणात तज्ज्ञ आणि सर्वोत्कृष्ठ कंपनीला पाचारण केलं. कंपनीने अनेक पध्द...

रस्तेवाले जोशी! (भाग एक)

Image
रस्तेवाले जोशी ! ( भाग एक ) अरे, ते रस्तेवाले जोशी का ? असं त्याने संबंधितांना विचारलं. होय सर, संबंधित म्हणाला. ते ऐकताच तो तडक जागेवरुन उठला आणि स्वत:हून त्यांना अदबिने भेटला. आजूबाजूचे सारेच, हे बघून चकित झाले. कोण हे, रस्तेवाले जोशी ? सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. बहुतेकांना वडेलाले जोशी माहीत ! . पण रस्तेवाले वाले जोशी, हे जरा वेगळचं प्रकरण होतं. ज्याने रस्तेवाले जोशी का ? असं विचारलं ] तो काही लहानसहान असामी नव्हता. त्याला भारतात बरेच जण क्रिकेटचा देव मानतात तर ऑस्ट्रेलियात, डॉन ब्रॅडमेन नंतरचा श्रेष्ठ फलंदाज ! म्हणजेच आपला सचिन तेंडूलकर. त्याला ऑस्ट्रेलियन सरकारने, ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने सन्मानित केलेय. हा आपल्या देशातील भारतरत्न सारखा ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. तो सचिन शिवाय फक्त दुसऱ्या एका भारतीयास आणि त्यातही मराठी मानसास मिळालाय. तो मराठी माणूस म्हणजे डॉ.विजय जोशी अर्थात रस्तेवाले जोशी. सचिनच्या बरोबरीने ज्यास सर्वोच्च पुरस्कार मिळतो, याचा अर्थ तो सुध्दा तोलामोलाचा आणि त्याने काहीतरी भव्य दिव्य केलं असणारच ना ? नक्कीच...रस्...

मूर्ख ससा

Image
  मूर्ख ससा सशाच्या कोणत्यातरी पूर्वजाने म्हणे सिंह महाराजांना युक्तिने चित केलं होतं . ही कथा या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत सशाच्या कुटुंबात सांगितली जायची . खूप खूप वर्षापूर्वी , सध्याच्या सिंह महारांजाच्या पणजोबांचे पंजोबा खूप दुष्ट होते . वननगरीत त्यांची फार दहशत होती . त्यांच्या मनात आले की , ते कुणालाही महाली बोलवत नि त्याचा फडशा पाडत . त्यामुळे सगळे नागरिक त्रस्त झाले होते . या दुष्ट महाराजांना कसे वठणीवर आणायचं नि त्यांचा कसा बंदोबस्त करायचा हे कुणालाच कळेना . अशा दहशतीखाली वननगरीचं जीवन किती दिवस चालायचं , असा प्रत्येकाला प्रश्न पडायचा . पण कुणीही काहीच करु शकत नव्हतं . आला दिवस कसा तरी पुढं ढकलणं हेच प्रत्येकजण करु लागला . मात्र एके दिवशी सध्याच्या ससोबाच्या पणजोबाच्या पणजोबास वाटलं की आपण काही तरी केलं पाहिजे . सिंह महाराजांना धडा शिकवला पाहिजे . तसं त्याने आपल्या बाबांना सांगितलं . मित्रांना सांगितलं . हत्तीरावांनाही सांगितलं . बाबा घाबरले . मित्र हसले . ...