Posts

Showing posts from November, 2021
Image
  कोल्हा फसला.. एकदा, एका बिळात राहणाऱ्या सशाकडे कोल्ह्याचे लक्ष गेले. हा आपल्या तावडीत सापडला तर त्याच्या मऊ मऊ मासावर मस्त मेजवाणी झोडता येईल, असे कोल्ह्यास वाटले. आता ससा कधी बिळाच्या बाहेर पडतो, याची तो बराच वेळ वाट बघत बसला. अधूनमधून तो बिळाच्या समोर येराझा-या मारायचा. त्याची सावली बिळात पडायची. ते बघून सशाने हळूच मान बाहेर काढून बघितले. कोल्ह्याला बघून त्याची गाळण उडाली. आता आपले काही खरे नसल्याची त्याने खूणगाठ बांधली. मात्र, असे घाबरुन चालणार कसे ना..त्याने स्वत:लाच प्रश्न केला. फेऱ्या मारुन मारुन कोल्हा थकून झोपला की आपण बिळातून बाहेर पडून धूम ठोकायची असं त्याने मनात ठरवलं. कोल्ह्याचे, बिळापुढे फेऱ्या मारणे चालूच होतं. ससा आता बाहेर पडेल,मग पडेल,तो किती वेळ असा दडून बसेल असं कोल्ह्यास वाटत होते. कोल्ह्याचे हे वाटणे खरेही होते. कारण खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी सशाला बाहेर पडणे भागच होते. फेऱ्या घालून घालून कोल्हा खरोखरच थकला. त्याचे पायही खूप दुखू लागले. आता त्याच्याच्याने चालवेना. तो मटदिशी खाली बसला. त्याच्या डोळ्यासमोर ग्लानी आली. हे सर्व ससा बिळातून बघत ...

मिशन एक्स

Image
  मिशन एक्स खरं तर तेजोमयीचा पहाटेच्या स्वप्नांवर फारसा विश्वास नाही. ती विज्ञानाची विद्यार्थीनी. त्यातही गणितात विशेष आवड. त्यामुळे कोणत्याही आभासी गोष्टींमध्ये तिला रस वाटत नसे. विज्ञानाचा पाया गणित असल्यानं आणि ते सिध्द करावं लागत असल्यानं तिला स्वप्न बिप्न भाकड कथाच वाटायच्या. म्हणे, पहाटेची स्वप्नं साकार होतात. समजा पहाटे स्वप्न पडलं की मी, १० वीत पहिली मेरिट येईल ? तर हे स्वप्न काय आपोआपच साकार व्हायचं ? नाही ना. त्यासाठी मला अभ्यासच करावा लागेल. हॅागवर्ट येथील जादुच्या शाळेत शिकणाऱ्या हरमॉयनीला सुध्दा खूप अभ्यास केल्यामुळेच हॅरी ( पॉटर ) , त्याचे मित्र मंडळी आणि वर्गातील इतर विद्यार्थ्यांपेक्षा सर्वाधिक गुण मिळायचेत ना. असं तिने एकदा स्वप्ना विषयीच्या एका निबंधात आपलं मत नोंदवलं होतं.   त्यामुळे झोपेत पहाटे पडणाऱ्या स्वप्नांविषयी ती कधी बोलायची नाही किंवा घरच्या किंवा बाहेरच्या मंडळींमध्ये अशा स्वप्नांची चर्चा सुरु झाली तर   त्यात सहभागी व्हायची नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करायची. मात्र, परवा तिला झोपेत एक असं स्वप्न पडलं की, त्यामुळे तिची झोप खरोखरच उडा...