Posts

Showing posts from December, 2021

त्या तिथे,ते दोघे

Image
  त्या तिथे,ते दोघे सध्या ते दोघेच तिथे आहेत. परवा-परवा पर्यंत त्या दोघांनाही याची तिळमात्र कल्पना नव्हती. तो वेगळयाच ठिकाणी आपलं काम करत होता. तर हा दुसऱ्याच ठिकाणी. मात्र एके दिवशी लाल धुळीचं प्रचंड वादळ आलं. अशा अतिवेगवान वादळांचा सामना करण्याचं तंत्र आणि कौशल्य दोघानांकडेही होतं. पण त्या दिवशी या दोघांचही तंत्र आणि कौशल्य तोकडं पडलं. ते दोघे ज्या ठिकाणी काम करत होते, त्या ठिकाणाहून त्या प्रचंड वादळवाऱ्यामुळे वर उडाले. दोघांचीही दिशा हरवली. वादळाच्या त्या फेऱ्यात ते कुठे निघाले, याचा थांगपत्ता दोघांनाही लावता येईना. काही क्षणानंतर त्या दोघांनी आपलं, आता काही खरं नाही, असं स्वत:ला सांगून, डोळे मिटून घेतले. खूप वेळ ते दोघेही त्या प्रचंड वादळात चक्राकार फिरत राहिले. काही वेळाने   वादळाचा वेग मंदावला. वादळ शांत होताच ते दोघेही खाली आदळणार तोच दोघांनी डोळे उघडले. आपलं काही खरं नाही, असं आतापावेतो वाटणाऱ्या त्यांच्या लक्षात आलं की, अरे आपलं अजूनही खरं आहे. त्यामुळे ते क्षणात सावध झाले. स्वत:ला सावरुन खाली आदळण्याच्या आधी त्यांनी सुरक्षित खाली उतरवलं. दोघांची एकमेकांना टक्कर...

पुस्तक परीक्षणाचा धसका..

Image
  पुस्तक परीक्षणाचा धसका.. तेजोमयीस रविवारच्या पेपरमधील, विशेष पुरवणी चाळण्याची चांगली सवय लागली होती. पाच मिनिटापासून तर कधी   साडे सात मिनिटात पुरवणी ९९ टक्के बघून   आणि १ टक्के वाचून व्हायची.   त्यानंतर ही पुरवणी ती बाजूला ठेऊन द्यायची. हळूहळू वाचू लागेल, अशी बाबांना आशा होती. त्यामुळे तेजोमयी सध्या पुरवणी हातात धरुन त्यावर नजर टाकते, यावर बाबा खूष होते. तेजोमयीनं पुरवणी हाती घेतली की, उत्सुकतेनं अलेक्झांडर ( द डॉगी ) ही त्यात डोकावून जायचा. या डोकावण्यामुळे तीन-चार वेळा पुरवणी फाटली. त्यामुळे तेजोमयी त्याला रागावली. तेव्हा त्याने आपली उत्सुकता पुन्हा कधी दर्शवली नाही. तेजोमयीने पुरवणी हाती घेतली की तो फक्त आईच्या अवतीभवती घुटमळायचा. तुला वाचता आलं असतं तर..असं आई त्याला एकदा बोलून गेली.. आँ, हे क्का S य अशा आशयाचे भाव आणत त्याने मान वर केली..तेव्हा आईने तेजोमयीकडे बोट दाखवलं.. यातलं काहीही न कळल्यानं अलेक्झांडरने गॅलरी गाठून मस्तपैकी ताणून दिली.. तर पाच मिनिटात पुरवणी दर्शन संपवणारी तेजोमयी आज २० मिनिटे झाले तरी पुरवणी खाली ठेवेना, याचं बाबांना कु...

काळी पांढरी जादू

Image
  काळी पांढरी जादू बादशाहा अकबरांच्या दरबारात नव रत्ने होती. त्यामध्ये बिरबल हा त्याचा आवडता होता. कोणतीही समस्या उद्भवली की आधी अकबर बिरबलांचा सल्ला घेत असे. बिरबलाचे सल्ले ऐकून, अकबराने घेतलेले निर्णय चुकत नसत. त्यामुळे बिरबल हा अकबराच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्यामुळे अकबराच्या दरबारातील इतर सरदार आणि मनसबदार हे बिरबलास पाण्यात पाहत असत.   बिरबल, अकबराच्या मनातून कसा उतरेल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना काही यश मिळत नसे. दिवसेंदिवस बिरबलाचं महत्व आणखीनच वाढत गेलं. त्यामुळे दरबाऱ्यांचा जळफळाटही वाढला. संधी मिळाली की इतर सरदार-मनसबदार अकबराचे कान भरु लागले. बिरबल हा स्वत:ला प्रति सम्राट समाजायला लागलाय असही एका सरदारानं अकबरास एकदा सांगितलं. तेव्हा अकबर आधी फार गंभीर झाले आणि नंतर खो खो हसायला लागले.. ते बघून तो सरदार, घाबरला..आपण जे सांगितलं, त्यामुळे अकबराच्या मनावर परिणाम होऊन तो वेडा तर झाला नाही ना, अशी एक शंका त्याच्या मनात आली. आपण हे काय करुन बसलो,याचं दु:ख वाटून त्याने स्वत:च्याच हाताने स्वत:च्या कानशीलात लगावली. हे बघून बाद...