Posts

Showing posts from May, 2023

प्रश्नांच्या उत्तरात टोळी (भाग एक)

Image
  प्रश्नांच्या उत्तरात टोळी (भाग एक) तेजोमयी, कल्याणी, बंटी , अरुण बबलू, सोनू, सुरेश, विनय, श्रीकांत या टोळीला नेहमी खूप प्रश्न पडत असत. प्रश्न पडायलाच हवेत, असं एकदा त्यांना, विज्ञानाच्या सरांनी सांगितलं होतं. प्रश्न जेव्हा पडतात, तेव्हा त्याची उत्तरं शोधण्याची प्रेरणा मिळते, उर्जा मिळते, असंही ते म्हणाले. विज्ञानसरांचे लाडके विद्यार्थी असल्याने या सर्वांनी, ठरवलं की यापुढे आपणास, हा प्रश्न नाही तर तो प्रश्न असे, सतत प्रश्न पडू द्यायचे. ज्या दिवशी प्रश्न पडला नाही, त्यादिवशी समजायचं की, कुछ तो गडबड है. असं काहीसं तेजोमयी कल्याणीला म्हणाली. अगं, पण दररोज प्रश्न पडायला आपण काही सफरचंदाचं झाड नाही ना. की हलवलं नि पडला सफरचंद खाली. कल्याणी म्हणाली. सफरचंद जर पडला नसता तर, न्युटन सरांना प्रश्न पडला असता का ? सफरचंद झाडावरुन पडला, पण तो वर नाही गेला, तो खाली आला. तो तसा कां आला ? यावर न्युटन सर डोके खाजवत बसले. म्हणून त्यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. तेजोमयी, रवीकडे बघत म्हणाली. याचा अर्थ असा की, जसं तुम्ही हसायलाच पाहिजे, तसच तुम्हाला प्रश्न सुध्दा पडायला पाहिजे. ...

टंकलू आणि छंकू

Image
  टंकलू आणि छंकू   टंकलूच्या पाळीव कुत्र्याचं नाव होतं छंकू . त्याचं फारच असायचं भुंकू भुंकू .. छंकूला आपल्या भुंकण्याचा जरा अभिमानच होता . आपलं भुंकणं क्लास असल्याचं त्याला वाटायचं .. टंकलू आणि छंकूचं तसं चांगलं जमायचं नाही .. मात्र बाबांच्या आग्रहापोटी टंकलू त्याला दररोज मैदानात खेळायला न्यायचा .. छंकूला वाटायचं आपणच टंकलूला मैदानात नेतो .. पण त्याला प्रश्न पडायचा की आपल्या गळयात साखळी कां बरं .. साखळी तर टंकलूच्या गळयात असायला हवी ... या प्रश्नाचं उत्तर मिळविण्यासाठी त्याने कितिदा अंग खाजवलं . आपली शेपूट नळीत घातली तरी ती वाकडीच कां राहते या प्रश्नाचं उत्तर ज्याप्रमाणं मिळत नाही . तसाच हाही प्रश्न गहन असावा . म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर मिळत नसावं असं स्वत : च समाधान छंकूनं करुन घेतलं ..     रस्त्यावरुन जाताना स्मार्टनेस दाखवण्याची एकही संधी छंकू दवडत नसे .. टंकलूला मात्र हा ओव्हरस्मार्टनेस वाटायचा . तो छंकूला चूप बसवायचा प्रयत्न करु लागल...