नव्या दुर्गेचा जन्म
नव्या दुर्गेचा जन्म शाळेत एक मुलगी दररोज दुपारच्या सुटित मुलांना काहीतरी वाटत असते, असं शिपायानं मुख्याध्यापकांना सांगितलं. काय वाटतं हे बघितलसं का ? असं मुख्यधापकांनी विचारलं तेव्हा त्याने नाही म्हणून सांगितलं. नसत्या उचापती करतोस कशाला मग. अरे, मुलं दुपारी खेळतात. बागडतात. एकमेकांना चॉकलेट किंवा बिस्किटं खायला देतात,त्यात काय नवल ? असं मुख्याध्यापक शिपायास म्हणाले. सर, ही मुलगी खेळत नाही बागडत नाही, खाऊ तर देत नाहीच नाही. एक बिल्ला मुलांना देते ..शिपाई म्हणाला. मुख्याध्यापकांची उत्सुकता ताणली गेली. आज दुपारच्या सुटित ही मुलगी नेमका कशाचा बिल्ला वाटप करते हे प्रत्यक्ष बघायच असं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे ते दुपारच्या सुटित शाळेच्या पटांगणात आले. ही मुलगी मुलांना शर्टावर लावता येईल असा एक बिल्ला देत होती. मुख्याधापक उत्सुकतने तिच्याकडे गेले. त्यांना बघताच इतर मुले बाजुला सरली. या मुलीने मुख्याध्यापकांना नमस्कार केला. त्यांनाही हा बिल्ला दिला. त्यांनी तो बिला बघितला. त्यावर लिहिलं होतं, पृथ्वीला वाचवा..ते बघून मुख्याध्यापकांना फार आश्चर्य वाटलं. ती मुलगी त्यांच्य...