बँकेशी गट्टी
बँकेशी
गट्टी
परवा, तेजोयमीचा मामा खूप वर्षांनी घरी आला.
दिवसभर
धम्माल झाली. घरी आलेल्या पाहुण्याचे वारेमाप लाड
होत असल्याचं बघून आलेली व्यक्ती खासा असामी असल्याचं अलेक्झांडरला लगेच लक्षात आलं.
त्यानेही
मामाशी लाडीगोडी सुरु केली. त्याच्याकडून
कौतुक करवून घेतलं.
दोन दिवसानंतर
परत जाताना त्याने तेजोमयीला हजार रुपये दिले.
या हजार रुपयाच
काय करायचं गं, तेजोमयीनं आईला विचारलं.
अगं,
तुझ्या
पिगी बँकेमध्ये टाकना..
यापुढे पिगी
बँक नाही..बाबा एकदम म्हणाले.
ते ऐकून आई
आणि तेजोमयी इतक्या जोरात आँ म्हणाल्या की, अलेक्झांडरने
दचकून बाबांकडे बघितलं. बाबांना त्याच्याही
चेहऱ्यावर मोठ्ठा आँ उमटल्यासारखा वाटला.
बापरे,
काही
गडबड झालीय की घरात डायनोसॉर शिरलाय, बाबांनी या
आँवर अशी प्रतिक्रिया दिली.
बाबा,
पैशाची
बचत करण्यासाठी तुम्हीच मला पिगीबँक दिली ना...
तेजोमयी म्हणाली.
खाऊचे पैसे
त्यातच टाका, खर्च करु नका,
असच
सारखं सांगताना. आता हे मध्येच काय नवं खूळ..आईने
विचारलं..
अहो,
आता
पिगीबँक सोडून खऱ्या बँकेचा विचार केला पाहिजे..
म्हणजे हो
काय बाबा..
तेजो,
आता
मी, बँकेत तुझं खातं उघडणार.
मग
तिथे तू पैसे जमा करायचे..
वाव,
तेजोमयी
आनंदानं म्हणाली.
वाव काय वाव,
बँकेत
जाऊन पैसे कोण भरणार..तुम्ही कामात मग्न.
मग
माझ्याच पाठीमागे लागणार ही नवी कटकट..आई त्राग्यानं
म्हणाली.आईचा असा त्रागा म्हणजे आपल्या कानावर
संक्रात हे आता अलेक्झांडरला पक्क ठाऊक झाल्यानं तिच्या कान पिरगळण्यापासून सुटका मिळण्यासाठी
तो हळूच दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन,तिघांचं संभाषण
ऐकू लागला.
अगं,
काहीतरीच
काय बोलतेस, तेजोमयी जाईल ना बँकेत..
तिला काय
कळतं त्यातलं. आई बोलून गेली.
याचा
तेजोमयीला राग आला. पण ती गप्प राहिली.
बाबांच्या
नजरेतून ते सुटलं नाही. तिला जवळ
घेऊन म्हणाले,
मी शिकवीन
तिला सारं काही. बँकेचे व्यवहार आतापासूनच मुलांना
कळायला हवेत ना..
आईनं त्यावर
नापसंती दर्शवली. पण तिकडे दुर्लक्ष करुन बाबा
तेजोमयीस, दुपारी जवळच्या बँकेत घेऊन गेले.मॅनेजर
काकांशी ओळख करुन दिली.येण्याचं
कारण सांगितलं.काकांना आनंद झाला.त्यांनी
बँकेत खाते उघडण्याचा अर्ज दिला.बाबांनी तो
तेजोमयीलाच भरायला लावला.जिथे अडचण
आली.तिथे तिला मदत केली.अर्जासोबत
बाबांनी तेजोमयीचा फोटोही काकांना दिला. त्यांनी दुसऱ्या
दिवशी पासबूक घेण्यासाठी बोलावलं.
बाबा आणि
तेजोमयी दुसऱ्या दिवशी पुन्हा बँकेत गेले. मॅनेजर
काकांनी पासबूक तेजोमयीच्या हातात दिलं.आपला फोटो
आणि नावाचे पासबूक बघून तेजोमयी आनंदली. काकांनी तिला
बँकेत पैसे कसे भरायचं हे सांगितलं.
तेजोमयीने
मामानं दिलेले हजार रुपये बँकेत जमा केले. काकांनी
पासबूक मध्ये त्याची नोंद करुन दिली. आपल्या पासबूक
मध्ये लगेच पैसे जमा झाल्याचं बघून तेजोमयी हरखून गेली.
तिने काकांना
थँक्यू म्हंटलं. जाता जाता तिने विचारलं,
काका
बँकेत पैसे कशासाठी ठेवायचे हो..
छान प्रश्न
आहे हा बाळ,पिगी बँकेत पैसे ठेवले तर ते तसेच
पडून राहतात. त्यात वाढ होत नाही.पण
बँकेत पैसे ठेवले तर त्यात आमची बँक तुमच्या रक्कमेवर व्याज देतं.
याचा
अर्थ दर महिन्याला तुम्ही भरलेले पैसे आणि बँकेने दिलेलं व्याज यामुळे तुमच्या खात्यावरचा
पैसा वाढतो आणि थेंबे थेंबे तळे साचे ही म्हणही सिध्द करतो..
काकांचं बोलण
एकून तेजोमयी हरखून गेली.आता पिगी
बँकेला सुट्टी आणि खऱ्या बॅकेशी गट्टी असं मनात ठरवून तिने काकांचा निरोप घेतला.
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment