सुको तारजा


 सुको तारजा

नवेगाव बांध अभयारण्य बघायला गेलेल्या टिल्लू आणि टप्पूला दाते काकांनी झोपायला जाण्याआधी रात्रीच सांगतिलं होतं की पहाटे पहाटे जंगल भ्रमंतीला निघायचं.कारण पहाटेच्या समयी जगंलात बरंच काही बघता येतं .दाते काका हे तिथले ऑफिसर होते आणि टप्पू म्हणजेच टिल्लूच्या बाबांचे मित्र होते.त्यांच्या निमंत्रणावरुच ते दोघे नवेगाव बांध अभयारण्य बघायला आले होते.
पहाटेच स्वत:दाते काकांनी टिल्लू आणि टप्पूंना उठवलं.ते सर्व तयारीनिशी आले होते.त्यांच्या जवळ दुर्बिण होती.टार्च होता.त्यांनी स्वेटर घातला होता.टिल्लू आणि टप्पूला त्यांनी स्वेटर घालायला लावलं.कारण बाहेर थंडी होती.जंगलात आणखी थंडी वाजली असती.
सगळयांनी गमबूट घातले.बुटाशिवाय जंगलात फिरायचं नसतं.दाते काकांसोबत रामराव पाटील आणि त्यांच्या ऑफिसची दोन तीन माणसं सोबत होती.
थंडगार वारा वाहत होता.अद्याप सर्वत्र अंधार होता.नवेगावबांधच्या जलाशयाचं पाणी शांत,स्थिर आणि चमचम करीत होतं.झाडांच्या पानाची सळसळ सुरु होती.वेगवेगळया पक्षांचे आवाज कानावर येत होते.
चालता चालता दातेकाकांनी टिल्लूला आकाशात बघायला लावलं.वर एक टपोरा तारा दिसत होता. त्याचे तेज बघून टिल्लू हरखला.एव्हढा तेजस्वी तारा त्याने कधी बघितला नव्हता.
"शुक्राची चांदणी आहे ही.."दाते काका म्हणाले.
"किती तेजस्वी...किती प्रखर..किती सुंदर..मुंबईत कधी दिसत नाही.."टिल्लू म्हणाला.
"आपण त्याला चांदणी म्हणतो, कुणी त्याला तारा म्हणतात.पण तो आपल्या पृथ्वीसारखाच एक ग्रह आहे. दर 12 वार्षांनी शुक्र पृथ्वीच्या जवळ येतो.सध्या तो तसा आलाय म्हणून एव्हढा प्रखर आणि तेजस्वी दिसतो.इथं राहणारे स्थानिक लोक त्याला सुको तारजा म्हणतात.."
या सुको तारजाशी मैत्री करावी असं टिल्लूला वाटलं.शुक्राच्या चांदणी पुढे बाकीचे तारे अगदीच फिके वाटत होते.थेाडा वेळ शुक्राकडे बघून मंडळी पुढे निघाली. एका पक्षाचा आवाज विशिष्ट आवाज आला.दाते काका काही क्षण थंाबले..त्यांनी अदमास घेतला.
तो भृंगराज पक्षी होता.त्यांनी दुर्बिणीतून बघितलं. तो जवळच्या झाडावर बसला होता.त्याचा रंग काळसर आणि शेपटी व्ही आकाराची होती.हा पक्षी इतर अनेक पक्षांचे आवाज काढू शकतो.असं दाते काकांनी सांगितलं.
"भृंगराज हा हुषार पक्षी.त्याला शिकवता येतं."दाते काका म्हणाले.
"काय शिकू शकतो तो.."टिल्लूने विचारले.
"तो चोरी करु शकतो."दाते काकांनी सांगितलं.हे एैकताच टिल्लूने चमकून झाडावर बसलेल्या भृंगराजकडे बघितले.चोर मचाए शोर म्हणतात.त्याप्रमाणे हा चोर जंगलात आवाज काढून शोर करत असावा असं त्याला वाटलं.
दाते काकानी सांगितलं की ,"तुमच्या मुंबईच्याजवळ असलेल्या डहाणू भागात या पक्षास मिरची चोरायला शिकवतात..हा दुसऱ्यांच्या शेतातून मिरच्या आणतो.तसच नवीन मानसाला हा पक्षी घरी येउ देत नाही.."
"अरे वा,वॉच डॉग बद्यल एैकलं होतं.वॉच बर्ड पहिल्यंादाच बघतोय.."
000

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!