अलेक्झांडरची वर्षा खरेदी !
अलेक्झांडरची वर्षा खरेदी !
देशपांडे
काकूंनी दारात पाऊल टाकताच अलेक्झांडरने नाराजीचा सूर आवळला. आईने त्याच्याकडे
डोळे वटारुन बघताच तो शेपटी हलवत आतल्या खोलित निघून गेला. तसं तर आईलाही अशा
अवचित वेळी न सांगता देशपांडे काकूंचं येणं आवडलं नव्हतं. त्यांची बाहेर जाण्याची
लगबग सुरु होती. काकूंच्या ते लक्षात आलं असावं.
काय
हो, कुठे चाललात अशा लगबगीने?
आई
काही बोलायचा आधीच तेजोमयी उत्तरली, डॉक्टरांकडे काकू.
अगो
बाई, कुणाला काय झालं?काळजीयुक्त स्वरात
काकूंनी विचारलं.
अहो
काकू, तसं काही नाही. आम्ही अलेक्झांडरच्या डॉक्टरकडे चाललोत जरा. बाबा म्हणाले.
त्याला
काही झालं का? काकूंनी विचारलं.
नाही
हो, तो अगदी ठणठणित आहे. आई म्हणाली.
मग?
तेव्हढयात
शेपूट हलवत आतल्या खोलितून अलेक्झांडर बाहेर आला. देशपांडे काकू अजून इथेच बघून
त्याने त्यांच्याकडे रागाने बघितले. कधी जाता तुम्ही? अशा आशयाचे भाव त्याच्या डोळयात तरळले.
देशपांडे काकू त्याला कधीच आवडायच्या नाहीत. कारण
त्या सतत त्याला हाटहूट करत. नावबोटं ठेवतं. आईने वारंवार बजावूनही, संधी मिळाली
की त्याला कधी कुत्रा तर कधी ठोंब्या म्हणत. हे अजिबात अलेक्झांडरला आवडत नसे. आपण
कसं आईबाबा आणि तेजोमयीनं सांगितलेलं सगळं ऐकतो, तसं या बाई, आईचं सांगणं कां ऐकत
नसतील असा प्रश्न त्याला नेहमी पडे. प्रत्येक वेळी आई, त्यांना असं काही
अलेक्झांडरविषयी त्याच्या समोर आणि मागेही बोलू नका असं सांगत पण देशपांडे
काकूंचं, येरे माझ्या मागल्या. त्यामुळेच त्या अलेक्झांडरच्या नावडत्या होत्या. आईच्या
भीतिमुळे तो देशपांडे काकूंना काही करायचा नाही. अन्यथा त्या आल्या की त्याला
त्यांना खाऊ की गिळू असे त्याला व्हायचे.
काकूंनी
पुन्हा विचारलं, मग कशासाठी जात आहात डॉक्टरांकडे.
या
कशासाठी फुकट चौकशा करतात, असे तेजोमयीला वाटून तिच्याही चेहऱ्यावर नापसंतीचे भाव
उतरले.
अहो,
अलेक्झांडरला रेनकोट, पावसाचे बूट, पावासपासून संरक्षण करणारी टोपी घ्यायचीय.
काय
सांगता? आईने दिलेले सरबत पितापिता देशपांडे काकूंना ठसका
लागला. तुमचं नेहमीच काहीतरी विचित्र असतं, असं त्यांना म्हणावसं वाटलं.
वा
वा ! पण काय हो, त्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज काय?
देशपांडे काकूंच्या चौकशा काही थांबवण्याचं नाव घेईना.
आम्ही
डॉक्टरांकडे जाऊ नाही तर नाव्ह्याकडे जाऊ, तुम्हाला कशाला नसत्या चौकशा? असं उत्तर द्यावं असं तेजोमयीला वाटलं. ही आता काहीतरी बोलणार असं लक्षात
येताच आईने तिच्याकडेही डोळे मोठे करुन बघितलं. त्यामुळे तेजोमयीला गप्प राहावं
लागलं.
अहो
काकू, अलेक्झांडरची त्वचा संवदेशनशील आहे.
त्याला कोणत्या प्रकारचा रेनकोट चालू शकतो किंवा सहन होऊ शकतो, हे त्याच्या डॉक्टरांकडून
समजून घेतलं की बरं ना! बाबांनी सांगितलं.
म्हणजे
असं पण असतं? भलं मोठं आश्चर्य व्यक्त करत
काकू उद्गारल्या.
हो
ना, फॅन्सी रेनकोट घेऊन अलेक्झांडरला मिरवायचं नाहीय नि रॅम्प वॉकही करायचा नाही. पाण्यापासून
संरक्षण व्हावं. त्याला सर्दीपडसं होऊ नये, त्याच्या त्वचेला नि त्याचा पायांना
जखम होऊ नये, त्याच्या हालचालीवर नियंत्रण येऊ नये, असंच साहित्य खरेदी करायला हवं
ना? आई म्हणाली.
आँ! पण तेजोच्या आई, हे जरा जास्तच नाही वाटत तुम्हाला. अहो, आपण आपल्या
मुलांसाठी सुध्दा इतकी काळजी घेत नाही. तुमचं काहीतरी जगावेगळच असतं बाँ? अखेर देशपांडे काकूंनी बोलूनच टाकलं.
काकू,
तुम्हाला कितीदा सांगायचय, अलेक्झांडर हा आमचा लेक आहे. त्याची काळजी कशी घ्यायची
हे आम्हाला ठरवू द्या ना. त्याला आम्ही काहीही घेऊन दिलं नि त्याला त्याचा त्रास
झाला तर? बिचाऱ्याला सांगता येणार आहे का? म्हणून आम्ही सुरुवातीलाच काळजी घेतो हो. आई, काकूंना म्हणाली. तिच्या
बोलण्यात नाराजीचा सूर स्पष्टपणे जाणवत होता. अलेक्झांडरला तर ते पटकनच कळतं. देशपांडे
काकूंना आपल्यावरुनच आईने नाराजी व्यक्त केल्याचं त्याला कळलं. तो चुळबूळ करु
लागला. यावेळी आईने त्याच्याकडे अजिबात बघितलं नाही. हे देशपांडे काकूंच्या लक्षात
आलं असावं. त्यांनी आईने दिलेलं सरबत गटागटा पिलं नि तिथून लगेच काढता पाय घेतला.
त्या
गेल्याबरोबर अलेक्झांडरने स्वत:भोवती गिरकी घेऊन आनंद व्यक्त केला. तेजोमयीने उडी
मारली. दोन्ही मुलांसारखा असा आनंद व्यक्त करता येत नाही, असे वाटून आईबाबांनी एकमेकांकडे हसून
बघितलं...मुलांचा आनंद तोच आपला आनंद असं समजून त्यांनी एकमेकांना टाळी दिली.
सुरेश
वांदिले

Comments
Post a Comment