कराटे गर्ल
कराटे
गर्ल
सकाळी
उठल्या उठल्या तेजोमयीचं, दिवाणखाण्यातील भिंतीकडे बघून कराटे खेळात जसे हूँ हाँ
करत हातवारे केलं जातं, तसं सुरु झालं. अलेक्झांडर(द डॉगी)
तिच्याकडे आश्चर्यानं बघून मध्येच दचकू लागला. आपल्या अंगावर
ही येते की काय या भीतिनं काही वेळाने तो तिच्यापासून दूर जाऊन बसला.
सकाळी
सकाळी तेजोमयीचं हे असं हातवारं करुन पाय उंचावणं, आई-बाबांना जरा चमत्कारीच
वाटलं.
"हे काय नवं खुळ? आईनं विचारलं.
"अगं, हे खुळ नाही. याला कराटे म्हणतात."
तेजोमयीनं उत्तर दिलं.
"तुला कां बरं आजच कराटेवर प्रेम आलय बुवा",
बाबांनी कौतुकानं विचारलं.
"बाबा, मी कराटे शिकावं असं तुम्हाला आजपर्यंत कां वाटलं नाही?" बाबांनाच तेजोमयीनं उलट प्रश्न केला. या अनपेक्षित प्रश्नानं बाबा
भांबावले.
"अगं, तुला कधी याची आवड दिसली नाही." बाबा
म्हणाले.
"तू कधी बोलली पण नाहीस ना." बाबांची बाजू घेत
आई म्हणाली. "होय ना रे ठोंब्या?" आईने अलेक्झांडरची साक्ष काढली. "आता हे काय
भलतच, असा प्रश्नांकित चेहरा करत अलेक्झांडर हळूच आईजवळ आला.
"हा घाबरला की काय तुझ्या, हा हू हातवारे आणि उडी
मारण्याला?" बाबांनी आश्चर्यचकित होऊन विचारलं.
"काय म्हणता बाबा, असं जर असेल तर मग मला कराटे शिकायलाच हवं." माझं रक्षण मीच करु शकेन ना मग."
तेजोमयीचं
हे म्हणणं खरच होतं.अभ्यासाशिवाय मुलांना स्वरंक्षणाचे धडे देण्याची गरज आपल्याजा आजपर्यंत
कां लक्षात आली नाही. असं आई-बाबांना वाटलं. मात्र तेजोमयीस आजच कां
कराटे शिकावं वाटलं याचं,दोघांचही आश्चर्य काही शमलं नव्हतं.
"बाळ, तुला नक्कीच मी चांगल्या कराटे गुरुकडे शिकवायला पाठवीन. पण तुला आजच
अचानक असं हे…"
बाबांचं
वाक्य पूर्ण होण्याचा आधीच तेजोमयीनं बाबांच्या पुढे पेपर ठेवला. एका दहा वर्षाच्या मुलाने पाण्यात बुडत चाललेल्या गाडीतून त्याच्या बाबा-आईला
आणि लहान भावाला कसं वाचवलं याची बातमी तिने आईबाबांना दाखवली. या मुलाच्या
वडिलांची गाडी पुरात सापडली. पाण्यामुळे दरवाजे बंद झाले. ते काही
उघडेना. तेव्हा प्रसांगवधानी मुलाने आपल्या कराटे कौशल्याने
गाडीचा मागील काच फोडला. त्यातून आईबाबा आणि भावास बाहेर
काढलं.
"वाSव"बाबा उत्सुर्फतपणे
म्हणाले.
"हे मी वाचलं नि ठरवलं की आपणही कराटे शिकायचं."
"हा तुझा निर्धार आजच्या पुरता नाहीना तेजो. आजचा उत्साह उद्या फुस्स!
असं नको व्हायला."
"काय गं आई, तू प्रोत्साहन द्यायचं सोडून माझा पाय कां मागे ओढतेस." नाराज होत तेजोमयी म्हणाली.
"अगं सोने, कराटे म्हण की कोणताही खेळ म्हण तो शिकण्यासाठी चिकाटी लागते.
सतत सराव करावा लागतो. त्यासाठी वेळ काढावाच लागतो. कारणं सांगत बसायची नसतात.
खाण्यापिण्याचे लाड करायचे नसतात. तशी मनाची तयारी करावी लागते. हे सर्व तू करु
शकशील ना." म्हणून मी म्हणाले.
"करु शकेन ना रे अलेक्झू, मी हे सारं," त्याच्याकडे बघून हातवाऱ्यांसह उडी मारत तेजोमयी म्हणाली. अलेक्झांडरलाही
मजा वाटून त्यानेही उडी मारली.
"चला म्हणजे आता या दोघांनाही आपण कराटे क्लास मध्ये टाकायला हरकत नाही." बाबा म्हणाले. आईच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment