यांना कसं कळतं?
यांना कसं कळतं?
तेजोमयी
राहत असलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या एका बाजूला एक नाला वाहतो.या नाल्याच्या आसपास
बरीच झाडं झुडपं उगवली आहेत.या झाडीमध्ये भटके कुत्रे ,मांजरी राहतात .झुडपांवर वेगवेगळे
पक्षी येऊनजाऊन असतात. या ठिकाणी असणारे भटके कुत्रे आपसात खेळत असतात. त्यांचा हा
खेळ अधूनमधून अलेक्झांडर टक लावून बघत असे. गेल्या काही दिवसांपासून मात्र या ठिकाणी
भटकी कुत्री दिसणं बंद झालं.झाडी मधून कुत्र्यांचा आवाज आयला लागला. तो भुंकण्याचा
नव्हता. तर, लहान मूल जसं रडतं तसा तो रडण्याचा होता.
सुरुवातीला
या रडण्याच्या आवाजाकडे आई-बाबा आणि तेजोमयीचं लक्षं गेलं नाही. पण दिवसभर आणि रात्रीसुध्दा
हा आवाज जेव्हा कानावर पडू लागला तेव्हा बाबा वैतागून गेले.आईलाही त्रास व्हायला लागला.
आईने तिच्या पध्दतीने त्या कुत्र्यांचा उध्दार केला.
हे
सगळं घडत असताना अलेक्झांडर खिडकीजवळ जावून हा आवाज ऐकत असल्याचं तेजोमयीच्या लक्षात
आलं. तिने जेव्हा त्याला जेवायला बोलावलं,तेव्हा तो नेहमीप्रमाणे उड्या मारत, धावत
आला नाही. तेजोमयीला आश्चर्य वाटलं. ती खिडकीजवळ गेली. अलेक्झांडर कान टवकारुन आवाज
ऐकत असून तो खूपच उदास झाल्याचं तिच्या लक्षात आलं. तेजोमयीनं त्याच्या पाठीवरुन हलकेच
हात फिरवला. काय झालं? असं विचारलं. पण अलेक्झांडरने काहीच प्रतिसाद दिला नाही. तिच्याकडे
त्याने बघितलं सुध्दा नाही. याला नक्कीच काहीतरी झाल्याचं तेजोमयीच्या लक्षात आलं.
ती लगेच आत गेली आणि तिने आई बाबांना हे सारं सांगितलं.आई-बाबा लगबगीने खिडकीजवळ आले.
काय
रे ठोंब्या, आज तुला भूक लागली नाही का? आई त्याच्या पाठिवरुन हात फिरवित म्हणाली.
बाबांनीही त्याला कुरवाळलं. यावेळी झुडपातून येणारा रडण्याचा आवाज थोडा कमी झाला होता.
पण लगेच जोराने रडण्याचा आवाज पुन्हा सुरु झाला. त्या कर्कश आवाजाने आई बाबा आणि तेजोमयीही
वैतागली. अलेक्झांडर मात्र पुन्हा कान टवकारुन ऐकू लागला. त्याचा चेहरा पडला. तो आणखी
उदास झाला.
काय
रे तुला काही दुखतय का?बाबांनी विचारलं. एरव्ही अशा प्रश्नावर शेपूट किंवा मान हलवून
प्रतिसाद देणाऱ्या अलेक्झांडरने बाबांकडे बघितलंसुध्दा नाही.
आईला
अलेक्झांडरमध्ये घडणारे बदल पटकन लक्षात येतात. तिने त्याला लगेच आपल्याजवळ घेतले.
आईने जवळ घेतलं की अलेक्झांडरला सर्वाधिक आनंद होतो. शेपटी जोरजोराने हलवून तो हा आनंद
व्यक्त करतो. पण आज तो अगदीच ढिम्म ! आईने त्याच्याकडे
लक्षपूर्वक बघितलं. तो अजूनही झाडीतून येणाऱ्या रडण्याचा आवाज एकाग्रचित्ताने ऐकत होता.
त्याला त्याचा त्रास होत असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं.
अहो,
याला काहीतरी सांगायचं असावं नि ते त्याला कळत नसावं. आई, बाबांना म्हणाली.
म्हणजे?
बाबा आणि तेजोमयीने एकाच वेळी आश्चर्यानं विचारलं.
तुम्ही
त्याच्याकडे काळजीपूर्वक बघा ना, तो, झाडीतून येणाऱ्या रडण्याचा आवाज एकाग्रचित्ताने
ऐकतोय. इतर कशाकडेही त्याचं लक्षं नाही. या रडण्याच्या आवाजामुळेच तो असा उदास झाला
असावा, असं मला वाटतं.
मग
आपण काय करावं असं वाटतं तुला?
आपण
त्या झाडीत जाऊन बघितलं तर...तेजोमयी बोलून गेली.हे बोल ऐकताच अलेक्झांडर गर्रकन वळला
नि त्याने बाबाकडे बघितलं. त्याने त्यांचं शर्ट तोडांत पकडून भुंकायला सुरुवात केली.
अहो,
याचा अर्थ त्यालासुध्दा तिकडे जायचय. तिथे नक्कीच काहीतरी घडलय. आपण जायला हवं.आई म्हणाली.
आईचे
हे बोल कानावर पडताच आतापावेतो उदास असलेल्या अलेक्झांडरची कळी किंचित खुलली.
हो
हो समजलं...तुझ्या मनासारखच होईल.आई त्याला कुरवाळत म्हणाली. बाबांची इच्छा नसताना
त्यांना यावं लागलं. हातात एक काठी घेऊन ते,तेजोमयी,आई आणि अलेक्झांडरसोबत झाडीजवळ
गेले.
झाडीच्या
खोलवर एका ठिकाणचे दृष्य बघून तेजोमयी घाबरली. तिथे एक भटका कुत्रा व्हिवळत होता. त्याचा
पाय तुटलेला दिसत होता. त्याच्या जखमेवर माशा ,मच्छर आणि किटक घोंघावत होते. या वेदना
असह्य होऊन तो कुत्रा रडत होता. ते बघून अलेक्झांडरही रडू लागला. यामुळे आईला अश्रू
कोसळलं. बाबांमधील भूतदया जागी झाली.
अशावेळी
नेमकं काय करायचं हे त्यांना चांगलं कळतं.ते लगेच झुडपाच्या बाहेर पडले. त्यांनी एक
ऑटोरिक्शा आणला. त्या ऑटोचालकाला प्रसंग सांगितला. तोही बाबांसोबत झुडपात आला. दोघांनी
मिळून त्या जखमी कुत्र्याला ऑटोत ठेवले. आई, तेजोमयी आणि अलेक्झांडर दुस-या रिक्शात
बसले. दोन्ही रिक्शे त्वरेने पशू दवाखान्याकडे निघाले. तिथे पोहचताच,बाबांनी दवाखान्याच्या
अटेंडंटच्या मदतीने जखमी कुत्र्याला भरती केले. डॉक्टरांनी त्याच्यावर लगेच उपचार सुरु
केले. त्याची जखम धुतली. मलमपट्टी केली. काहीतरी औषध दिलं. यामुळे थोड्यावेळाने त्याच्या
वेदना कमी झाल्या. तो रडायचा थांबला आणि झोपी गेला. त्याचं रडणं थांबल्यावर अलेक्झांडरचा
चेहरा खुलला. त्याने डॉक्टरांचा हात चाटायला सुरुवात केली. यांच्यामुळे त्या कुत्र्याचं
दु:खं कमी झाल्याचं अलेक्झांडरच्या लक्षात आलं होतं.
डॉक्टरांनी
प्रेमानं त्याला थोपटलं. या जखमी कुत्र्याला इथे आणण्यात आणखी काही उशिर झाला असता
तर जखम चिघळून त्यात त्याचा मृत्यूही झाला असता, डॉक्टर म्हणाले. हे ऐकून बाबांना धक्का
बसला, ते ताबडतोब अलेक्झांडरकडे वळून त्याला सॉरी म्हणाले.
डॉक्टरांना
आश्चर्य वाटलं. तेव्हा आतापर्यंतचा घटनाक्रम आईने त्यांना सांगितला.
हे
ऐकून डॉक्टरांनी अलेक्झांडरला प्रेमाने आपल्या जवळ घेतले.
याच्यामुळे
त्या कुत्र्याचे प्राण वाचले म्हणायचे. जे माणसांना कळू शकत नाही, ते या मुक्याप्राण्यांना
कळतं. ते अधिक संवेदनशील असतात. त्यांना आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मग बरेच अप्रिय
प्रसंग टळू शकतात .डॉक्टर म्हणाले.
डॉक्टरांनी
केलेल्या अलेक्झांडरच्या कौतुकाने आई सुखावली.
तिच्या डोळयातून अश्रू ओघळले. अलेक्झांडर आईच्या कुशित शिरला. त्याचेही डोळे पाणावले.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment