Posts

वाढदिवस

Image
  वाढदिवस कवैल्याचा दहावा वाढदिवस जोरात साजरा झाला.   त्याच्या आईबाबांनी हा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरीच छान पार्टी ठेवली. सगळं घर फुग्यांनी आणि फुलांनी सकाळी सकाळीच सजवलं. कैवल्यच्या सर्व मित्रांना त्याने वाढदिवस पार्टीसाठी बोलावलं. पार्टी दणक्यात झाली. दोन प्रकारचे केक, दोन प्रकारचे आईसक्रिम आणि गरम गरम समोसे, अहाहा ! असा सारा थाट! कैवल्य, कधी केक कापतो नि आपल्याला कधी या पदार्थावर ताव मारायला मिळते याची मुलं वाटच बघत होती. एकदाचं हॅप्पी बर्थ डे, झालं. कैवल्यने त्याच्या नावासह असलेलं एक गाणं युट्यूबर शोधून ठेवलं होतं. ते वाजवलं. याला बुवा हे फार मस्त जमतं, असं कौतुक जमलेल्या सर्वांनी केलं. कैवल्यच्या आईबाबांच्या डोळ्यातून कौतुक ओसंडून वाहू लागलं. आजीने त्याची लगेच नजर   काढली. आजोबा म्हणाले, असा हुषार मुलगा मी बघितलाच नाही आमच्या नात्यांमध्ये. या कौतुकाने कैवल्यची छाती फुगली. खाणंपिणं दणक्यात झालं. मुलं खेळण्यात दंग झाली. ज्याला हवं ते, ते खेळू लागली. त्यांच्या खेळाच्या भाषेत बोलू लागली. मुलं त्यांच्या राज्यात रममाण झाल्यावर त्यांचे आईबाबा कैवल्याच्या ...

यांना कसं कळतं?

Image
  यांना कसं कळतं?           तेजोमयी राहत असलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या एका बाजूला एक नाला वाहतो.या नाल्याच्या आसपास बरीच झाडं झुडपं उगवली आहेत.या झाडीमध्ये भटके कुत्रे ,मांजरी राहतात .झुडपांवर वेगवेगळे पक्षी येऊनजाऊन असतात. या ठिकाणी असणारे भटके कुत्रे आपसात खेळत असतात. त्यांचा हा खेळ अधूनमधून अलेक्झांडर टक लावून बघत असे. गेल्या काही दिवसांपासून मात्र या ठिकाणी भटकी कुत्री दिसणं बंद झालं.झाडी मधून कुत्र्यांचा आवाज आयला लागला. तो भुंकण्याचा नव्हता. तर, लहान मूल जसं रडतं तसा तो रडण्याचा होता. सुरुवातीला या रडण्याच्या आवाजाकडे आई-बाबा आणि तेजोमयीचं लक्षं गेलं नाही. पण दिवसभर आणि रात्रीसुध्दा हा आवाज जेव्हा कानावर पडू लागला तेव्हा बाबा वैतागून गेले.आईलाही त्रास व्हायला लागला. आईने तिच्या पध्दतीने त्या कुत्र्यांचा उध्दार केला. हे सगळं घडत असताना अलेक्झांडर खिडकीजवळ जावून हा आवाज ऐकत असल्याचं तेजोमयीच्या लक्षात आलं. तिने जेव्हा त्याला जेवायला बोलावलं,तेव्हा तो नेहमीप्रमाणे उड्या मारत, धावत आला नाही. तेजोमयीला आश्चर्य वाटलं. ती खिडकीजवळ गेली....

टिल्लू रागावला

Image
  टिल्लू रागावला आई ग,दारात पाऊल ठेवताच टिल्लू ओरडला. काय रे काय झालं ? आइने विचारलं. अगं मी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन येतो. टिल्लू म्हणाला. एकटाच ? असं काय अर्जंट काम आलय रे.आईनं विचारलं. मी आल्यावर सांगेन.एव्हढं बोलून टिल्लू पळालासुध्दा. त्याने दफ्तर तसंच टाकलं.शाळेचा गणवेश सुध्दा बदलला नाही.टिल्लू वांद्रेच्या शासकीय वसाहतीत राहायचा.त्याच्या घरासमोरच हनुमानजींच मंदिर होतं.कधी कधी पप्पांसोबत तो मंदिरात जाई. पण असं स्वत:हून जायचं म्हंटल्यावर आईस आश्चर्य वाटलं. टिल्लू काय करतो म्हणून आई दारातून बघू लागली.टिल्लू मंदिरात गेला,त्यावेळेस तिथे कुणीच नव्हतं. पुजारीही यायचा होता.टिल्लूने भक्तिभावाने हात जोडले.नंतर तो हनुमानजींना काहीतरी समजावून सांगण्यासाठी हातवारे करु लागला. आईला गंमत वाटली. पाच मिनिटांनी टिल्लू घरी परत आला. काय मिस्टर टिल्लू, हनुमानजींशी एवढं काय महत्वाचं काम होतं ? त्याला विनंती करायला गेला होतो कशाची रे ? रितेश सरंगीबद्दल. कोण हा रितेश ? तुझा मित्र आहे का ? त्याच्याबद्दल काय सांगायचय तुला ? अगं मला कपडे तर काढू देशील ना. भूक पण लागलीय.माझं दू...

शेखचिल्लीची स्वप्नपूर्ती

Image
  शेखचिल्लीची स्वप्नपूर्ती                     हे ऐकून किंवा वाचून तुम्ही नक्कीच उडाल किंवा आँ तरी म्हणालच. त्याचं कारण आम्ही. तुम्हाला ठाऊक नसेल म्हणून सांगतो की आमच्या प्रजातींची संख्या आहे चार लाख ! तुमच्या आमच्या किंवा आमच्या तुमच्या पृथ्वीचा ८० टक्के बायोमास किंवा जैविक भाग आमच्यामुळे बनलाय. तुम्हाला फारसं न आवडणाऱ्या नि ज्यांच्यासाठी तुम्ही सतत नावबोटं ठेवत असता अशा सूक्ष्म जीवाणू ( बॅक्टेरिआ ) यांचा वाटा आहे १५ टक्क्यांचा आणि तुम्हा मानवांचा   वाटा आहे अवघा ०.०१ टक्के ! निघाला ना तुमच्या तोंडून भला मोठा आँ!                             खरंतर आम्ही या पृथ्वीचे अनभिषिक्त सम्राटच आहोत. हे आमचं साम्राज्य जवळपास ५०० मिलियन (लक्ष) वर्षापासूनचं! आमच्यापुढे तुम्ही कुक्कुले बाळच. तुम्ही म्हणाल काहीतरी थापा हाणतोस ? छे छे थापा कशाला ? तुमचा जन्म झालाय...

बगळ्याचे रहस्य?

Image
  बगळ्याचे रहस्य? एका तलावाच्या काठी असलेल्या झाडाच्या आडोशाला अनेक पक्षी येत.दिवसभर त्यांची दंगामस्ती चाले.इकडून तिकडे उड्या मारायला या पक्षांना खूप आवडायचं. एकही पक्षी फार काळ एखाद्या ठिकाणी स्वस्थ बसत नसे.एका फांदीवरुन दुसऱ्या आणि दुसरीवरुन तिसऱ्या आणि मग लगेच पंख फैलावून आकाशात सूर मारणार!सभोवताली चक्कर मारली की पुन्हा झाडांच्या फांद्यावर येऊन बसणार.पुन्हा काही वेळाने हाच खेळ नव्याने सुरु. अशा या तलावाच्या ठिकाणी काही बगळेही येत.ते उडत उडत येत   आणि तलावातली बसण्यासारखी एखादी जागा ते बघत. त्यावर तासनतास बसून राहत. क्वचितच ते या जागेवरुन त्या जागेवर जात किंवा काही अंतर उडून पुन्हा येऊन बसत. इतर पक्षांसारखं मात्र सारखं उडणे -बसणे - पुन्हा उडणे असे काही ते करत नसत. इतर पक्षांना याचं फार आश्चर्य वाटायचं. एकदा पक्षांची सभा भरली .त्यात कावळा,पोपट,चिमणी,टिटवी,कोकीळ,कोकिळा,कबुतर,निळकंठ इत्यादी पक्षी होते.ते सर्वजण तलावतील एका जागेवर बसनाऱ्या बगळयाबद्दल चर्चा करु लागले. हा बगळा असा तासनतास एकाच ठिकाणी कसा काय बसू शकतो रे ? पोपट कावळ्यास म्हणाला. अरे, पण कुणी काय करावं...

नाव मोठे, दर्शन खोटे!

Image
  नाव मोठे , दर्शन खोटे ! म्हणे   मी देवमासा ! नाव मोठं नि दर्शन खोटं ! तुम्ही म्हणाल, हे काय, स्वत:लाच असं कुणी दूषणं देत कां ? तुमचं म्हणणं अगदी बरोबर असलं तरी हे दूषण मी स्वत:ला का देतोय, हे माझी गोष्ट ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला हे न क्की च ठाऊक असणार की तुमच्या-माझ्या पृथ्वीवरुन प्रचंड मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइड ( सीओटू ) हा वायू वातावरणात सोडला जातो. तो आकाशात गेल्यावर सूर्याच्या उष्णतेला शोषूण घेण्याचं काम करतो. त्याला हे काम कुणी सांगितलय, हे बुवा मला काही ठाऊक नाही. पण आपल्याला काय त्याचं ? असतं की बऱ्याच जणांना हे करुन बघ, ते करुन बघण्याचा छंद ! तसचं या कार्बन डायऑक्साइडचं असावं. तसा हा छंद म्हणा की टाइमपास म्हणा, आपल्यासाठी लाभाचा ठरतोय. कारण हा " सीओटू " सूर्याची उष्णता शोषतो नि इकडे पृथ्वीचं सरासरी वातावरण १३ ते १४ अंश सेल्शियस राखण्यास मदत होते. हा झाला माझ्या कथेतला एक भाग. दुसरा भागसुध्दा या " सीओटू " शी संबंधित आहे. तुम्हा मानवांनी १९ व्या नि २० शतकात मोठ्ठीच मोठ्ठी औद्योगिक प्रगती केली. इथे हा कारखाना उघडला, तिकडे ...

"सूपरहिरो"

Image
  "सूपरहिरो"   हॅलो,हाय,नमस्कार,रामराम वगैरे वगैरे,मी अमूक-ढमूक-तमूक अशी आपण एकमेकांना ओळख करुन देतो ना! म्हंटलं मी सुध्दा स्वत:ची ओळख करुन देण्यापूर्वी असं अभिवादन केललं बरं.याचा अर्थ मी किती सुसंस्कृत आहे,हे तुमच्या लक्षात आलच असणार. तर मी कोण? हे तुम्हाला सांगण्यापूर्वी,माझी एक गंमत गोष्ट सांगतो.तर त्याचं असं झालं की,इस्त्रायल नावाचा जो देश आहे ना,त्यांनी काही वर्षापूर्वी त्याचं बेरशीट नावाचं अवकाशयान चंद्रावर स्वारी करण्यासाठी पाठवलं.त्यात आम्हीसुध्दा होतो. चंद्र जवळ आला. काही क्षणातच हे यान चंद्रावर उतरलं नि,त्याचा स्फोट झाला नि मग पुढचं सारं फुस्स झालं.तुमच्या मनात प्रश्र निर्माण झाला असेल की आमचं काय झालं?आमचं नक्कीच काहीतरी झालं,हे सांगणे न लगे.तुम्हाला असं अद्यापही वाटतं की आम्ही मात्र जिवंतच आहोत. आता हे असं तुम्हाला कां वाटतं?याचं उत्तर माझ्या गोष्टीच्या पुढच्या भागात तुम्हाला मिळेल.तुम्ही मानव आम्हापेक्षा डोक्यानं म्हणजेच बुध्दीने लाखोपट समोर ना.त्यामुळे आम्ही तुम्हाला पहिल्यांदा दिसलो,तेव्हा   ते म्हणजेच तुमच्यातले काही जण आमचाच अभ्यास एके अभ्यास रात्...