खरा निसर्गशास्त्रज्ञ !
खरा निसर्गशास्त्रज्ञ ! माझीच गोष्ट कशी सांगायची हा माझ्यापुढचा खरा प्रश्न ! पण प्रश्न पडला की त्याचं उत्तर शोधलं पाहिजे, असं नाही का, आपले एडिसन काका, आईनस्टाईन आजोबा नेहमी सांगत. तुम्हाला ते ठाऊक असणारच. नसेल तर शाळेच्या विज्ञान शिक्षकांना विचारा बरं का ? लगेच उद्याच्या उद्या. कारण काही गोष्टी जेव्हाच्या तेव्हा केल्या की डोक्याला ताप आणि ताण राहत नाही. मी तर बुवा, हेच तत्व अंगिकारते. म्हणूनच आज ठरवूनच टाकलं, माझी कथा तुम्हाला सांगून सांगून मोकळं व्हायचं. खरतर मी म्हणजे तुमच्यासाठी एक इटुकला पिटुकला प्राणी. इकडून तिकडे आणि तिकडून इकडे, पळ-पळ पळणारा. माझी झुपकेदार शेपटी तशी सर्वांना मोहात पाडणारी. आणि ते समोर आलेले दात. जाऊ द्या. ज्या मुलांचे दात समोर आलेले असतात त्यांना इतर मुलं हसतात. माझ्यावरही इतर प्राणी हसतात. मी म्हणते, बेटेहो हसा हसा. जे हसतात त्यांचे पिवळे पिवळे आणि कीड लागलेले दात दिसतात. त्यांचच खरं तर हसू होतं. त्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष करते. तसच ज्यांचे दात समोर आले असेल ना, त्यांनी हसणाऱ्यांकडे लक्षच द्यायचं नाही. लक्ष दातांकडे नाही तर अभ्यासाकडे असावं. म्हणजे...