खारुताईची सुटका
खारुताईची सुटका तेजोमयीच्या सदनिकेच्या सर्व गॅलरिंना नायलॉनची जाळी लावली आहे. कबुतर,उंदिर आणि पक्षी आत शिरु नये म्हणून ही खबरदारी.पण पक्षांना आणि उंदिरमामास त्याचं काय ? ते या जाळीतून आत येण्याचा प्रयत्नच करणार नाहीत, असं आईला वाटत होतं.बाबांचं यावर काहीच मत म्हणजे चितभी मेरी आणि पटभी मेरी. म्हणजे उंदिर-कबुतर-खारुताई-इतर पक्षी येऊही शकतात किंवा नाहीही शकतात. त्यांचं असच बऱ्याचदा अधेमध्ये असायचं. तुमचं काय ? तेजोमयीनं अलेक्झांडरला विचारलं. अलेक्झांडर हुषार आणि हिज मदर व्हाईस ना , त्यामुळे याप्रश्नावर त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. या जाळ्यांवर पक्षी आणि उंदिरमामास त्यातून आत येण्यास मनाई आहे,अशी पाटी लावली नव्हती. त्यामुळे जाळी लावल्यावर दोन तीन दिवसात पक्षांनी जाळीतून आत येण्याचा प्रयत्न सुरु केला.एका उंदिरमामाने या जाळीतली एक मोठी फट बरोबर शोधून काढून त्याने घरात प्रवेश केला.त्यावेळी त्याच्या दुर्देव्याने अलेक्झांडर समोरच होता.त्याला बघून उंदिरमामाची भीतिने गाळण उडाली.अलेक्झांडर त्याच्यावर झडप मारणार तोच उंदिरमामा शिताफीने आल्यापावली माघारी वळले आणि...