Posts

पुसीची भ्रमंती

Image
  पुसीची भ्रमंती आज सकाळपासूनच पुसी कॅटची लगबग सुरु होती. बाहेर जाण्यासाठी तिने छान तयारी केली. अगं, तू इतकी नटूनथटून चाललीस तरी कुठे, रोनाल्डो डॉगीने तिला विचारलं. चक्कर मारुन येत जरा.. अगं, तू दररोजच चक्कर मारायला जातेस. घरी आईबाबा येतात तो वेळ साधून येतेस बरोबर.. तुला कां बरं वाईट वाटतय..तू घरकोंबडा आहेस म्हणून मी सुध्दा घरकोंबडी व्हावं असं तुला वाटत का ? अगं बाई, मी घरकोंबडा असलो म्हणून काय झालं, घराच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावरच टाकून आईबाबा बाहेर जातात ना....मग मी त्यांच्या विश्वासाला तडा जाईल, असं कसं वागणार ? बरं बाबा,तू राहा घरी,मी मात्र निघाले... हो हो.. जा जा..मी कुठे थांबवलय तुला..पण आज जरा जास्तच नटलीस नि सजलीस म्हणून विचारलं.. सांगेन की मी बाहेरुन आल्यावर..असं बोलून पुसी कॅटने हळूच खिडकीतून बाहेर उडी घेतली. बाहेरचं मोकळं आभाळ आणि मस्त सुटलेली हवा यांनी ती एकदम ताजीतवाणी झाली. बाहेर पडण्याची मौज रोंडीला कधीच कळायची नाही, असं खिडकीजवळ उभा असलेल्या रोनाल्डोसाठी मनातच म्हणत, पुसीने शेपूट उंच केली आणि थाटात पुढे चालू लागली. चालत चालत ती माहिमच्या म...

आईचा स्पर्ष

Image
आईचा स्पर्ष तेजोमयी तिच्या आईबाबांसमवेत काही दिवसांपूर्वी एका अभायरण्यात मुक्कामास गेली होती. या ठिकाणचे वनाधिकारी देशपांडे बाबांचे मित्र होते. बऱ्याच दिवसांपासून ते बाबांना अभयारण्य पाहण्यासाठी बोलवत होते. पण या ना त्या कारणांमुळे बाबांचं काही जाणं झालं नव्हतं. मात्र गेल्या आठवड्यात त्यांनी वेळ काढला आणि ते तिघेही अभयारण्यात आले. देशपांडे काकांना फार आनंद झाला. देशपांडे कांकाचा बंगला वनातच होता. बंगल्याच्या अवतीभवती ऐसपैस जागा होती. त्या ठिकाणी चारज्-पाच पिंजरे ठेवले होते. त्यातल्या एका पिंजऱ्याकडे तेजोमयीचं लक्ष गेलं. तिथे दोन पिल्लं दंगामस्ती करत होती. दुरुन तरी ती पिल्लं मांजरीची वाटली. त्यांची दंगामस्ती बघून तेजोमयीस मजा आल्याने ती तिकडे धावली. देशपांडे काकाही तिच्या मागोमाग गेले. खेळण्यात रंगून गेलेली ती पिल्लं मांजरीचं नसल्याचं तेजोमयीच्या लक्षात आलं. मग कुणाची असतील बरं ही पिल्लं, तिच्या मनात आलं. वाघाची तर नसतील ना..असं तिला वाटलं नि घाबरुन ती पिंजऱ्याच्या मागे आली. देशपांडे काका तिची ही गंमत बघत होते.. अगं तू घाबरतेस कशाला..ती पिल्लं काही तुला चावणार नाहीत.. तसं नाही हो काका....

सॉरी कंडक्टर काका

Image
  सॉरी कंडक्टर काका बऱ्याच दिवसांनी परवा, तेजोमयी आईबाबांसमवेत सिटी बसने ब्रांद्याला गेली होती. बस मध्ये तीन-चारच प्रवासी होते. त्यामुळे कंडक्टर ( वाहक ) काकांनी तिकिटे दिल्यावर ते   एका आजोबांच्या बाजूला येऊन बस मधील लोखंडी खांब्यास रेलून उभे राहिले आणि त्यांनी आजोबांशी थेट गप्पा सुरु केल्या. आजोबांनीही त्यांना प्रतिसाद दिला. तेजोमयी आणि आईबाबा त्या आजोबांच्या मागेपुढेच बसले असल्याने त्यांना हे संभाषण चांगलं ऐकू येत होतं. त्या संभाषणात खाजगी काहीच नव्हतं. कंडक्टर काकांनी बोलता बोलता आजोबांना त्यांचं वय विचारलं. त्यांनी वय सांगितलं तेव्हा कंडक्टर काका म्हणाले, विश्वासच बसत नाही हं आजोबा..तुम्हाला कुणी म्हातारे म्हणेल काय बरं..आजोबा हसले. काही क्षण शांततेत गेले. मग कंडक्टर काकाच बोलू लागले, अहो आजोबा, आपली तब्येत ना आपणच चांगली ठेऊ शकतो. व्यवस्थित खानपिणं आणि शांत झोप हवी. सकाळी व्यायाम हवा. खरं तर आपण दररोजचं वेळापत्रक तयार करायला हवं. त्यात प्रत्येक गोष्टीसाठी वेळ राखून ठेवला नि त्याप्रमाणे वागलो ना की मग तब्येत एकदम ठाँ राहते... कंडक्टर काकांचं असं संभाषण सुरु असता...

नेताजी जिवंत आहेत...

Image
  नेताजी जिवंत आहेत... तेजोमयीच्या घरी आज बऱ्याच दिवसांनी बाबांचे काही मित्र आले होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर, त्यांची चर्चा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे वळली. प्रत्येक जण नेताजींबद्दल भरभरुन बोलत होता. काका मंडळींना पाणी दे, चहा-बिस्किटं दे, ही कामं तेजोमयीच करत असल्याने ही चर्चा तेजामयीच्या कानावर पडत होती. आपण बैठकीच्या खोलित बसलो तर चालेल काय ? असं तिने बाबांना भीत भीत विचारलं. मोठ्यांच्या गप्पांमध्ये त्यांच्या परवानगीशिवाय सामील व्हायचं नाही, असं अनेकदा आईनं तिला सांगितलं होतं. अगं, तू अशी घाबरून कां विचारतेस, देसाई काकांनी तिला विचारलं. ज्यांच्यावर आम्ही आता बोलतोय ना ते नेताजी कशाला सुध्दा घाबरायचे नाहीत..बलाढय ब्रिटिश राज्यकर्तेच त्यांना घाबरायला लागले होते...रायकर काका म्हणाले.. तसं नाही हो..पण विचारुन घेतलेलं बर...तेजोमयी रायकर काकांकडे बघत म्हणाली. बाबा हसले आणि तेजोमयीस आपल्या बाजूला बसण्यास सांगितलं. बाबा आणि मित्रांच्या चर्चेची गाडी पुन्हा नेताजींकडे वळली. नेताजींची प्रखर बुध्दीमत्ता, त्यांचे शौर्य, त्यांची धडाडी, मातृभूमिवरचं त्याचं अलोट प्रे...

ताकापुरती आजी

Image
  ताकापुरती आजी परवा तेजोमयीने घरी हट्टच धरला. तिला ताकापुरती असलेली आजी हवी होती. पाहिजे म्हणजे पाहिजे, तिने निक्क्षूण सांगितलं. तिच्या या मागणिनं बाबा चक्रावले. आई रागावली. अशी काही आजी नसते, असं आईने तेजोमयीस सांगून बघितलं. अलेक्झांडर ( द डॉगी ) ने या वादाच्या वेळी आई-बाबा आणि तेजोमयी अशा तिघांकडे आळीपाळीनं बघितलं. मात्र कुणीही त्याला प्रतिसाद दिला नाही. तेव्हा प्रकरण गंभीर असल्याचं त्याच्या लक्षात आलं. अशावेळी लुडबडू बरी नसते, असं शहाणपण त्याच्याकडे असल्याने तो गॅलरीत जाऊन झोपला. खरेतर तो जागाच होता. आत काय चाललय याकडे त्याचे कान लक्ष ठेऊन होते. बाबांनी पुन्हा एकदा तिला समजावलं की अशी ताकापुरती आजीबिजी नसते म्हणून.. समजा अशी आजी मीच तुम्हाला दाखवली तर काय द्याल ? तेजामयीने बाबांना थेट विचारलं. ऑ..काहीबाही काय बोलतेस तेजो तू, अशी आजी कुठून शोधणार ? ..आईनं विचारलं.. आईचं म्हणणं बरोबर आहे..कुठे शोधणार तू अशा आजीला...बाबा म्हणाले. ते मी माझं ठरवणार....मी अशी आजी दाखवली तर मला काय देणार..तेजोमयीने पुन्हा विचारलं. भलताच हट्ट कशापायी करतेस..आई नाराजीचा सूर लावत म्हणाली...