ठोंब्याचा ठोंबोबा
ठोंब्याचा ठोंबोबा आजिला जेव्हा पहिल्यांदा बाबांनी गावावरुन घरी आणलं तेव्हा, अलेक्झांडरने तिच्याकडे गुर्रावून बघितलं. पण बाबा तिची खातरदारी करताहेत, आई, आल्या आल्या आजीच्या पाया पडलीय, तेजोमयी आल्या आल्या आजिला बिलगली हे बघताच चाणाक्ष अलेक्झांडर (द डॉगी) च्या लक्षात आलं की घरी आलेली आसामी खास आहे म्हणून. त्याने क्षणात आपला पवित्रा बदलला. आजीपाशी गोंडा घालू लागला. शहाणा दिसतोय गं हा तुमचा कुत्रा..असं आजी आईला म्हणताच, अलेक्झांडरने आजिकडे रागाने बघितलं. अगं, हा मेला असा का बघतोय माझ्याकडे, आजी किंचित रागावून म्हणाली. पुढे आणखी काही घडू नये म्हणून बाबांनी आजिला आतल्या खोलित नेलं. तुम्ही इतके भिता या मेल्याला..आत जाता जाता आजी म्हणालीच. हे शब्द कानावर जाताच अलेक्झांडर फुरफुर करु लागला. एरव्ही त्याने भुंकायला किंवा संबंधित व्यक्तिच्या अंगावर उडीच मारली असती. पण घरी आलेली व्यक्ती खासा असल्याचं लक्षात आल्यानं आपण काही करु शकत नाही, हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे मागचे दोन्ही पाय टाइल्सला जोरजोराने घासण्यावाचून तो काहीच करु शकत नव्हता. आईला अलेक्झांडरची तगमग लक्षात आली असावी. त्याम...