पाल येता घरी…


 

पाल येता घरी…

तेजोमयीच्या घरी अधूनमधून कुठून तरी एक पाल येत असे. या भिंतीवरुन त्या भिंतीवर जाणारी पाल कधीकधी झर्रदिशी सोफ्यावर यायची. त्यावेळी तेजोमयीची तारांबळ उडे. मग तिची आरडओरड सुरु होई. आई किंवा बाबा जवळपास असले की ते हॅटहूट करुन या पालिला हाकलून लावत.

एवढ्याशा पिटुकल्या  जीवाला तेजोमयी कां घाबरत असावी, याचं कोडं अलेक्झांडर-द-डॉगीला पडायचं. सोफ्यावर किंवा फरशीवर पाल पडलेली असताना तेजोमयीची उडणारी तारांबळ बघून अलेक्झांडरला मजा यायची. उडी मारुन तो आपला आनंद व्यक्त करायचा.

एकदा असचं घडलं नि याचा तेजोमयीस राग आला.पाल झरदिशी येऊन चटदिशी तिचं खाद्य जिभेनं मटकावून निघून गेल्यावर तेजोमयीनं अलेक्झांडरकडे रागानं बघितलं.

बेट्या, तू मजा घेतोस नाही माझी. एक ना दिवस तू बघ, तुझ्या अंगावर पडेल. मग कशी सजा मिळते ते!” बाजूला असलेल्या बाबांनी ते ऐकलं.

कोणाला मिळणार सजा?” बाबांनी विचारलं.

ते आता नाही सांगणार बाबा.प्रत्यक्षच बघा ना.

तसा प्रसंग खरोखरच एके दिवशी आला. अलेक्झांडर हॉलमध्ये भिंतीला रेलून बसला असताना त्याच्या अंगावर पाल पडली. अचानक पडलेल्या त्या पालिमुळे अलेक्झांडर ताडदिशी उठून त्याने आळोखेपिळोखे दिले. एव्हाना पाल कधीचीच भिंतीवर निघून गेली होती.तेजोमयीने टाळ्या वाजवल्या.

आता बघा बाबा गंमत.

कोणती गंमत?”

अहो बाबा, आता या अलेक्झांडरची मुंगी होणार.ही मुंगी खाण्यासाठी पाल पुन्हा खाली येणार.”

अगं, पण तुला कुणी सांगितलं हे.”बाबांनी आश्चर्यानं विचारलं.

पाल अंगावर पडणं अशूभ असतं, आपलं नुकसान होतं. असं एकदा आजी म्हणाली होती. आता बघाच मज्जा तुम्ही.”तेजोमयी बाबांना म्हणाली..

काही तरी घडेल घडेल, असं वाटत पाच मिनिटे गेली. पण अलेक्झांडरची मुंगी काही झाली नाही.आणखी पाच मिनिटे गेली. पण अलेक्झांडर जैसे थे.तेजोमयीची अस्वस्थता वाढली.बाबांच्या ते लक्षात आलं. त्यांना हसूही येत होतं. ते कसंबसं दाबत ते तेजोमयीला म्हणाले…

अगं बाई,अशी अस्वस्थ होऊ नकोस.अलेक्झांडरचं काहीच होणार नाही. पाल अंगावर पडल्यावर कुणाचच काही वाईट होत नाही.

मग, आजी खोटी बोलली का?”

तसं नाही गं, आपल्याकडे काही गैरसमजुती असतात.त्या अशाच एका वक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात असतात. आजीलाही कुणीतरी सांगितलं असेल.तिने तुला सांगितलं.भविष्यात तुही कुणाला तरी सांगशील.

आईलासुध्दा, पाल आवडत नाही ना बाबा.

तिलासुध्दा तिच्या आजीने असचं काहीस सांगितलं असणार या पिटुकल्या जीवाविषयी.

पिटुकला!”तेजोयमी मोठ्ठा आँ करुन म्हणाली..

अहो बाबा, हा पिटुकला जीव अशूभ असतो म्हणे.हा पिटुकुला-चिटुकला अंगावर पडला तर अपघात होतो म्हणे, संकट येतात म्हणे.हो ना गं आई.तेजोमयी जोरात म्हणाली.तिच्या आवाजाने आत काम करत बसलेली आई दिवाणखान्यात आली..

काय झालं गं ओरडायला?”

पालीचं घरी येणं.भिंतीवर चालणं, अंगावर पडणं हे अशूभ असतं ना गं आई.

कां काय झालं?”आईनं विचारलं.

असं तू एकदा म्हणाली होतीस.

हो गं, पण आपलं काय अशूभ झालं.काहीच नाही ना.पाल घरी येते तेव्हा जमेल तेव्हेढे किटक खाऊन जाते.म्हणजे ती आपल्या घरासाठी किटकनाशकाचं काम करते की.

आँ!” तेजोमयी आणि बाबा एकाच वेळी म्हणाले.

यात काय आँ फाँ करण्यासारखं.

याचा अर्थ अलेक्झांडरच काहीच होणार नाही.असं तेजोमयी म्हणाली.तिने अलेक्झांडरकडे बघितलं.स्वारी मजेत झोपेचा आनंद घेत होता.

तेजोमयीनं भिंतीकडे बघितलं, पालिला एक किटक दिसला असावा.तिने त्याच्याकडे झेप घेतली. त्याला मटकावून मेजवाणीचा आनंद घे लागली….

सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!