पैसै म्हणजे काय?
पैसै म्हणजे काय ? या सुटित तुम्ही मला पैसे समजवून सांगितलेच पाहिजे . पिंकी बाबांना म्हणाली . पैसे समजावून सांगणं म्हणजे गं काय ? शिवाय तू अजून लहान आहेस समजावून घ्यायला . बाबा म्हणाले . बाबा , पैसे समजावून घ्यायला लहान बिहान काही नसतं . किती दिवस तुम्ही मला असं म्हणत बसणार . तुमच्याकडे पैसे येतात कुठून हे मला माहीत नाही . ते पैसे आले की तुम्ही त्याचं करता काय ? बँकेत पैसे टाकता म्हणजे काय ? परवा तुमच्याकडे एक म्युचएल फंडचे काका येऊन गेल . या फंडात टाका , त्या फंडात टाका असं ते म्हणत होते . ही काय भानगड आहे . शेअर बाजार कोसळतो म्हणजे काय ? चढतो म्हणजे काय ? इतक्या छान छान एलआयसीच्या जाहिराती येतात . त्याचा काय अर्थ होतो . हे मला सारं काही समजून घ्यायचं आहे . पुन्हा म्हणून नका मी लहान आहे म्हणून ... बरोबर आहे तिचं . अहो ती लहान आहे म्हणून तिला समजावून सांगत नाही . माझं काय ? मला सुध्दा यातल...