शामची आई
शामची आई
वाव,राम म्हणाला,
त्याच दिवशी आजिने
त्याच्यासाठी शामची आई हे पुस्तक
आणलं.त्यावर काय प्रतिक्रिया
द्यावी हे रामला कळल
नाही.
हॅरी पॉटर आणि
शामची आई हे दोन्ही
पुस्तकं त्यानं टेबलावर ठेवलं.कधी
या पुस्तकाकडे तो बघायचा
तर कधी त्या बघायचा.कोणत्या
पुस्तकाने वाचायला सुरुवात करायचं,या गोंधळात
पडला.त्यामुळे दोन
दिवस त्याने कोणत्याच पुस्तकाला
हात लावला नाही.ही गमंत
आजोबांच्या लक्षात आली.
किती वाचून झालं
पुस्तकं रे बाळा,आजोबांनी
विचारलं.
कसलं काय नि कसलं
काय,हे पुस्तक वाचाव
की तेच मला कळत
नाही हो आजोबा.
आधी शामची आई वाचना..त्या
दोघांच्या संभाषणात भाग
घेत आजी म्हणाली.
नको,आधी हॅरी
पॉटर वाच..आजीचं बोलणं
ऐकून आई म्हणाली.
अगं शामच्या आईतं
संस्काराचे मोती आहेत.आजी
म्हणाली.
हॅरी पॉटर मध्ये
साहस ,बुध्दीचातुर्य,स्मार्टनेसचं
सोनं आहे.आई उत्तरली.तुम्हा
दोघिचं तू तू मै मै सुरु
झालं वाटतं पुन्हा..दोघींचा
आवाज ऐकून बाबाही या संभाषणात
सहभागी झाले.
तुम्ही गप्प बसा
हो..मी म्हणते ही रामची
आई जिवंत असताना शामची
आई कशाला हवी बरं
संस्कार करायला..आई बाबांना
किंचित घुश्यात म्हणाली.
बरं बाई,मी माझं
म्हणणं मागे घेते.त्याला
हॅरी पॉटरच वाचू दे.आजी
समजुतीच्या स्वरात म्हणाली.
नको नको,मीसुध्दा
माझं म्हणंनं मागे घेते,त्याला
आधी शामची आईच वाचू
दे..
वा.वा दोघीही
दोन घर मागे गेलात
ते बरं झालं..आता
आपण यावरचा छान उपाय
काढू या..आजोबा उत्तरले.
म्हणजे हो काय
पप्पा..बाबा म्हणाले.
अरे गोविंदा,पुस्तकांची
छान मजा असते रे..ती रामूला
घेऊ द्याना.एक तर एकाच
वेळी एकच पुस्तक वाचायला
द्या.नाहीतर वाचायलाच देऊ
नका.म्हणजे गोंधळ नको
ना..अभ्यासाची पुस्तकं
वाचता वाचता कधी वेळ
काढणार तो .विचार करा.मला
वाटतं त्यानं आधी सक्षम
मनाचा शाम समजून घ्यावा
नि मग समर्थ हॅरीला
भेटावं.कसा काय वाटतो
तोडगा..
छानच आहे की..
जमलं तर शामची आई पाठवून देऊ या ना त्या जादूच्या शाळेतील मुलांना वाचण्यासाठी.त्यांच्यावरही छान संस्कार होतील..जादूचा उपयोग मग ते फक्त चांगल्याच कार्यासाठी करतील. आजोबा म्हणाले.
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment