पैसै म्हणजे काय?
पैसै म्हणजे काय?
या सुटित तुम्ही
मला पैसे समजवून सांगितलेच
पाहिजे.पिंकी बाबांना म्हणाली.
पैसे समजावून सांगणं
म्हणजे गं काय?शिवाय
तू अजून लहान आहेस
समजावून घ्यायला.बाबा
म्हणाले.
बाबा,पैसे समजावून
घ्यायला लहान बिहान काही
नसतं.किती दिवस तुम्ही
मला असं म्हणत बसणार.तुमच्याकडे
पैसे येतात कुठून हे मला
माहीत नाही.ते पैसे
आले की तुम्ही त्याचं
करता काय?बँकेत पैसे
टाकता म्हणजे काय?परवा
तुमच्याकडे एक म्युचएल फंडचे
काका येऊन गेल.या फंडात
टाका,त्या फंडात टाका
असं ते म्हणत होते.ही काय
भानगड आहे.शेअर बाजार
कोसळतो म्हणजे काय? चढतो
म्हणजे काय?इतक्या छान
छान एलआयसीच्या जाहिराती
येतात.त्याचा काय अर्थ
होतो.हे मला सारं
काही समजून घ्यायचं आहे.पुन्हा
म्हणून नका मी लहान
आहे म्हणून...
बरोबर आहे तिचं.अहो
ती लहान आहे म्हणून
तिला समजावून सांगत नाही.
माझं काय ?मला सुध्दा
यातलं काहीच माहीत नाही.आई म्हणाली.
पैसे म्हणजे काय
आम्हाला कळलच पाहिजे आई आणि
पिकंी दोघीही एकसुरात म्हणाल्या.
खरच की आपण
याधीच हे सांगायला हवं
होतं बाबा मनात म्हणाले.
सुरेश वांदिले
000

Comments
Post a Comment