Posts

बैलौबा कां भितो?

Image
  बैलौबा कां भितो ? जाधवपुरच्या महाराजांनी उभारलेल्या सुंदर अशा बागेत, वानरांची टोळी खेळत बागडत होती. या टोळीमधील ज्येष्ठ सदस्य वेगवेगळया झाडांवर शांतपणे फळे खात बसली होती. पिल्लू वानर मंडळी मात्र दंगामस्तीत रंगली होती. या झाडावरुन त्या झाडावर उड्या मार. या फांदीला लटक, त्या फांदिला लटक. मध्येच आईला जाऊन बिलग. मध्येच जमिनीवर येऊन बागेतल्या नळाच्या तोटीवर जाऊन बस. थोडक्यात सर्वांची धम्माल सुरु होती. त्यांच्या या धम्मालीकडे आईबाबा कौतुकाने बघत होते. ही मौजमस्ती सुरु असताना या बागेत एक बैलोबा कुठून तरी आला. ज्या ठिकाणी पिल्लू वानरांची धम्माल सुरु होती, तिथून तो जाऊ लागताच सर्व वानरांमध्ये हलचल माजली. ते पटापट पटापट इकडे तिकडे पळाले. त्या वानरांना पळताना बघून तो बैलोबाही पळू लागला.. या सर्व घटनाक्रमाकडे एक पिल्लू वानर न घाबरता, लक्ष ठेऊन होतं. बैलोबा निघून गेल्यावर त्याने आपल्या आईबाबांना विचारलं, बैलोबा दिसताच तुम्ही काका काकू काकू, मामा-मामी, आत्या, ताई, दादा, आजी आजोबा, माझे मित्र कां बरे पळालात ? अरे, तो बैलोबा, बघितलास ना, कसा आडदांड होता. त्याने त्याची शेपटी फिरवली तरी...

मंत्र्यांच्या विरोधात गेलेली मुलगी

Image
  मंत्र्यांच्या विरोधात गेलेली मुलगी आपल्याच देशातील सर्व शक्तीमान अशा मंत्र्यांच्या विरोधात थेट न्यायालयात खटला भरण्याचं तिचं धाडस, तिच्या समवयस्क मित्र मैत्रिणींना तोंडात बोट घालवणारं आणि मी मी म्हणवणाऱ्या मोठ्यांची बोलती बंद करणारं ठरलं. ही गोष्ट घडली ऑस्ट्रेलियात. या देशाच्या पर्यावरण मंत्री सुसान ले यांनी व्हाईटवेन नावाच्या एका फार मोठ्या कोळसाखाण उद्योग कंपनीला कोळसा खाणींचा विस्तार करण्याची परवानगी दिली. त्यानुसार ही कंपनी न्यू साऊथ वेल्स परिसरात सापडणाऱ्या कोळशाचं पुढील २५ वर्षे उत्खणन करु शकत होती. एका अंदाजानुसार १६८ दशलक्ष टन कोळसा या काळात पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडला असता. या कोळशाच्या निर्यातीमधून कंपनीला मोठा नफा मिळणार होता. ऑस्ट्रेलियाच्या सरकारलाही त्यापोठी बरीच रक्कम मिळणार होती. आर्थिक संपन्नता वाढवण्यासाठी व्हाईटवेन कंपनीचा हा कोळसा उद्योग चांगलाच फायदेशीर ठरणार होता. मात्र, तुम्ही फक्त आर्थिक संपन्नताच बघणार की पर्यावरणाचं नुकसान सुध्दा, असा थेट सवाल या मुलिने केला. २५ वर्षे या कंपनीची ही खाण सुरु राहिली तर त्यातून ३७० दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईड पृथ्व...

दहा रुपयात इतिहास?

Image
  दहा रुपयात इतिहास ? गेल्याच आठवड्यात तेजोमयी आणि तिचे आई-बाबा त्यांच्या मित्रांसमवेत, राजस्थानच्या सहलीला गेले होते. वेगवेगळ्या गड-किल्ल्यांना भेटी देत ते उदयपूर जवळील कुंभलगड या किल्ल्यावर पोहचले. हा किल्ला सात पर्वतरांगांच्या आड दडलेला असल्याने तो शत्रूपासून बराच काळ सुरक्षित राहिला. महाराणा प्रताप यांचे वडील राणा उदयसिंग यांनी राणा प्रताप यांना बाळपणी शत्रूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी या किल्ल्यात लपवून ठेवले होते. या किल्ल्याच्या भवती ३६   किलोमीटर लांबीची भिंत संरक्षणासाठी बांधलीय. ग्रेट वाल ऑफ चायना नंतरची दुसऱ्या क्रमांकाची ही भिंत. अद्यापही उत्तमरितीने शाबूत असलेली. सध्याच्या किल्ल्याचे बांधकाम हे राणा उदयसिंग यांनी केले असले तरी या किल्ल्यास प्राचीन असा इतिहास आहे. असा इतिहास जाणून घेतला तरच कोणत्याही किल्ल्याची सफर जिवंत होते. हा इतिहास सांगून किल्ला दाखवणारे गाइड सोबतीला घेतलं की ते आपणास बरोबर महत्वाच्या बाबी दाखवतात. त्यांच्या ओघवत्या भाषेत इतिहास जिवंत करतात. तेजोमयीच्या बाबांनी किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी गाइडबद्दल विचारणा केली. पण सर्व गाइड पर्यटकांना घ...

सिंह महाराज आणि मच्छर

Image
  सिंह महाराज आणि मच्छर सिंह महाराजांनी एकदा, आपल्या राज्यात मच्छरांना विशेष अतिथीचा दर्जा दिला. ही बाब दरबारातील अनेक प्राण्यांना रुचली नाही. या इवलाशा किटकाने महाराजांवर कोणती जादू केली कुणास ठाऊक ? वाघोबा, कोल्होबांना विचारते झाले. मला तर यात काहीच जादू बिदू वाटत नाही. आपल्या महाराजांना वेडेपणाचा झटका आला असला पाहिजे. कोल्होबांनी उत्तर दिलं. आपणास खिजवण्यासाठी सुध्दा त्यांनी ही कृती केली असली पाहिजे. गेंडोबा म्हणाला.. तसं असेल तर आपण महाराजांना जाब विचारायला हवा, लांडगोबांचं म्हणण पडलं.. मी तर म्हणतो, जाब कसला विचारता, हाकलूनच लावा ना असले, वेडे चाळे करणाऱ्या सिंहाला, आपल्या राज्याच्या बाहेर..अस्वलाने मत मांडलं. महाराजांच्या वागण्याबद्दल असचं वेडंवाकडं काहीबाही प्राणी बोलत राहिले. या प्राण्यांच्या आसपास असणाऱ्या पण त्यांच्या नजरेत न येणाऱ्या काही मच्छरांनी ते स्पष्टपणे ऐकलं नि त्यांनी महाराजांना सारं काही सांगितलं. सिंह महाराजांनी लगेच दरबार भरवला आणि आपल्या बद्दल कोण काय काय बोलत होतं. हे त्यांनी भर दरबारात सांगितलं. अरे, यांना कळलं तरी कसं हे. वाघोबांनी गेंड...

हरवलेलं बाळ

Image
  हरवलेलं बाळ तेजोमयीची बहीण कल्याणी नुकतीच परदेशी शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. तिला पोहचवायला आई बाबांसमवेतच तेजोमयीही विमानतळावर गेली. विमानतळाच्या आतमध्ये जाण्यासाठी काही कालावधी असल्याने चौघेही जण विमानतळाला   लागून असलेल्या एका बागेतील बाकावर गप्पा मारत बसले. त्यांच्या गप्पा सुरु असतानात तिथे एक गोंडस असा डॉगी आला. तो त्यांच्या भोवती घुटमळू लागला. हा डॉगी श्रीमंताच्या घरच्या दिसत होता. कारण त्याला छान सजवण्यात आलं होतं. त्याच्या पायात सुबक डॉगी बूट होते. मानेवरच्या केसाची सुंदर वेणी केली होती. तो डॉगी बघून चौघांनाही आनंद झाला. कल्याणीने त्यास जवळ बोलावले. तो चटदिशी तिच्या कुशीत शिरला. तो भेदरलेला दिसत होता. सारखा इकडे तिकडे बघत होता. एखाद्या जत्रेतील गर्दीत लहान मूल आईबाबांपासून हरवल्यावर त्याची जशी स्थिती होत असावी, तशी त्या डॉगीची झाली होती. आईने पाणी प्यायला दिले तर त्याने त्यास तोंडही लावले नाही. त्याचा चेहरा मलूल झाला होता. नक्कीच हा त्याच्या मालकीन आई किंवा बाबांपासून हरवला असला पाहिजे. बाबा म्हणाले. लोकांची पण कमाल आहे. मी म्हणते, इतक्या गर्दीत आणायचं तरी ...

बाळाचा चांदोबा...

Image
  बाळाचा चांदोबा... बाळास चांदोबा फार आवडतो. संध्याकाळी किंवा रात्री तो आभाळात दिसायला लागला की बाळाची कळी खुलते. गॅलरीतल्या खिडकीत जाऊन तो न्याहळत बसतो. चांदोबाकडे बघत बघत छान जेवणही करतो. कधी कधी चांदोबाच्या समोरुन ढग जातात. त्यावेळी चांदोबाचं दर्शन होत नाही. अशावेळी बाळ जेवत असेल तर, तो रडायला लागतो. त्याला समजावयाचं कसं हा प्रश्न प्रत्येक वेळी आई-बाबांना पडतो. मग जे सुचेल ते कारण बाळास सांगतात. आज असचं छान निरभ्र आकाश होतं. चांदोबा पूर्णपणे उगवल्याने गॅलरीतून पूर्णपणे दिसू लागला. त्याला बघून बाळाचा आनंद व्दिगुणित झाला. त्याला मनासारखं भरवायची ही संधी आई कशी सोडणार ? . आई, त्याच्यासाठी खायला घेऊन आली.त्याला पहिला घास भरवला. दुसरा घास भरवला. तिसरा घास भरवणार तोच आकाशात ढगांची अचानक गर्दी झाली. चांदोबा ढगाआड अदृष्य झाला. चांदोबाचं दर्शन होत नसल्यानं बाळ रडायला लागलं. त्याचं रडणं काही थांबेना. त्याने घास गिळायलाही नकार दिला.. आता काय बरं करायचं, आईपुढे प्रश्न निर्माण झाला. चांदोबा अद्ष्य होण्याची अनेक कारणं आईने आतापावेतो सांगितलं होती. आताशा ही कारणं काही बाळास पटत...

लहान तोंडी...

Image
  लहान तोंडी... सध्याच्या वननगरितील सिंह महाराजांचे चिरंजीव म्हणजेच  युवराज फार भित्रे होते. त्यांना कशाचीही भीती वाटायची. एकदा ते न्याहरी करुन विश्रांती करत असताना, चार उंदिर त्यांच्या अवतीभवती गोळा झाले नि खेळू लागले. उंदरांच्या आरडओरडीमुळे युवराजांना जाग आली. समोर उंदिर बघून ते जोराने दचकले. ततपप करु लागले. युवराज जागे झालेले बघून उंदिर घाबरुन पळून जाण्याच्या बेतात असताना,त्यांच्या लक्षात आलं की,युवराज आपल्यापेक्षा जास्त घाबरले आहेत. त्यामुळे उंदरांनी पळून जाण्याचा बेत रहित केला. त्या चारांपैकी एक अधिक धीट उंदिर युवराजांच्या समोर जाऊन उभा ठाकला आणि त्याने आपले तीक्ष्ण दात त्यांना दाखवले. ते बघून युवराज अर्धमेले झाले. त्यांनी डोळे मिटून घेतले... त्यांनी मनातल्या मनात वनदेवतेचा धावा सुरु केला. ते बघून दुसरा उंदिर युवराजांच्या अंगावर चढला नि त्यांना गुदगुल्या करु लागला. युवराजांची भीती आणखीच वाढली. त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले. आपल्याला राक्षसांनी पकडले असून आता आपणास कुणीही वाचवू शकत नाही, याची त्यांना खात्री पटली.त्यांच्या घशाला कोरड पडली.त्यांना मदतीसाठी डरकाळी सुध...