दुसऱ्याचे महत्व,तिसऱ्याची हौस!
दुसऱ्याचे
महत्व,तिसऱ्याची हौस!
गणेशोत्सवाच्या
काळात दहा
दिवस वेगवेगळया
स्वादिष्ट मोदकांच्या खाण्याची चंगळ होती.
बाप्पांच्या दर्शनाला येणारे भाविक मूषकस्वामीलाही नमस्कार करत. त्यालाही हळद कुंकू
वाहत,फुले वाहत. बाप्पांसारखे महत्व मिळत असल्याने मूषकस्वामी बेहद्द खूश झाला.आपणही
बाप्पांसारखे देव झाल्याचा त्याला भास होऊ लागला. याचा त्याला अहंकारही
झाला.
एक भक्त बाप्पांची
पूजा केल्यावर मनात म्हणाला, बाप्पा माझी ईच्छा पूर्ण कर. बाप्पा काही बोलणार तोच मूषकस्वामीच
बोलून गेला, भक्ता तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
भक्ताने खाडदिशी
डोळे उघडले. मूषकस्वामी त्याच्याकडे बघून हसत होते. त्याला जास्वंदाचे
फूल देत पुन्हा म्हणाले, भक्ता तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. भक्त आश्चर्यचकित झाला.तो
मूषकस्वामीस म्हणाला, अरे उंदीरमामा, मी तुझा भक्त नाही. मी बाप्पांचा भक्त
आहे. मला त्याच्याकडून वर हवा. तुझ्याकडून नाही. उगाच मध्येमध्ये करु नकोस नाही तर
मंडळवाल्यांना सांगून तुला हाकलून लावीन. असं
बोलून मूषकस्वामीकडे रागारागाने बघत तो भक्त निघून गेला.
मूषकस्वामीचे
तोंड बारीक झाले. त्याला दु:खही आणि त्याला बाप्पांचा रागही आला.
तो बाप्पांना
रडवलेल्या स्वरात म्हणाला,बाप्पा माझं काय चुकलं हो? तुमच्या सारखंच हे मलाही फुलं-अक्षता वाहतात, नमस्कार
करतात .मग मी तुमच्यासारखाच देव नाही का? मग मी एखाद्या
भक्ताला वर दिला तर काय बिघडलं?तो भक्त मला अद्वातद्वा बोलला, पण तुम्ही काही रागावला
नाहीत त्याच्यावर.
मी त्याच्यावर
कां रागावयचं बाँ. त्याने मला वर मागितला होता ना. मी वर
देणार
तोच तू
मध्ये
तोंड चोंबडेपणा
केलास.
अहो पण मी देव....
कुणी सांगितलं
तुला देव झालास म्हणून? बाप्पा मूषकस्वामीला रागावत म्हणाले.
बाप्पा, मग
तुमच्यासोबत
भक्त माझी पूजा कां करतात?मला
शेंदूर अक्षता फुलं का वाहतात?
तुला
काय वाटतं तू देव आहेस म्हणून हे सगळं घडतं?
मग
आणखी काय पुरावा हवाय?
यावर
बाप्पा हसले नि ते तिथेच अंतर्धान पावले. येवढ्यात तिथे काही भक्त आले. बाप्पा जागेवर
नाही बघून ते जोराने ओरडले. ते बघून आणखी काही मंडळी धावत आली. सगळीकडे एकच गलका सुरु
झाला. बाप्पा गेले कुठे? गेले कुठे? जोतो ज्याला त्याला विचारु लागला. या सगळया धामधुमीत
मूषकस्वामीकडे कुणीच लक्षं दिलं नाही. त्याची दखलही कुणी घेतली नाही. अक्षता-फुलं वाहनं
तर दूर राहीलं.
बाप्पा
नाहीत म्हणून काय झालं, आपण तर आहोत ना. त्यांच्यासारखेच एक देव. मग? मूषकस्वामी मनात
म्हणाला. या भक्तांना चांगलाच धडा शिकवायला हवा असं त्याच्या अहंकारी मनाला वाटलं.
रात्र
झाली. बाप्पांचा शोध लागत नाही हे बघून मंडळी
पांगली. बाप्पा असताना ते प्रसाद बाप्पांपुढे ठेवायचे. मूषकस्वामीही त्यावर ताव मारायचा.
पण आजा कुणीही प्रसाद आणला नाही. त्यामुळे मूषकस्वामीला उपाशीच राहावं लागलं. त्याच्या
पोटात कावळे ओरडू लागले. आजूबाजूला काहीच खायला नव्हतं. त्यामुळे त्याला चक्कर येऊन
तो बेशुध्द पडला. शुध्दीवर आला तर त्याच्यासमोर बाप्पा हजर. त्याला आपल्या उपरण्याने
हवा घालत होते नि नाराळाचे पाणी पाजत होते.
काय
देवा, तुम्ही असे बेशुध्द कसे काय झालात मिश्किलपणे बाप्पांनी विचारलं.
अहो
बाप्पा काय करणार? एकाही भक्ताने प्रसाद दिला नाही ना.
देवाला
प्रसाद नाही म्हणजे, हद्दच झाली बाँ या उध्दटपणाची बाप्पा म्हणाले.बाप्पा तुम्ही खरच
बोलता, की माझी चेष्टा करता?
शिव
शिव, देवा मी तुमची चेष्टा कशी काय करु शकतो? बाप्पा मूषकस्वामीला उपरोधिकपणे म्हणाले.
बाप्पा
आणि मूषकस्वामींचा संवाद सुरु असताना,काही भक्त मंडपात आले. बाप्पांना पुन्हा जागेवर
बघून त्यांना अत्यानंद झाला. त्यांनी जोरात गणपतीबाप्पा मोरयाचा जयकार केला. बाप्पांची
आरती केली. फुलं अक्षता वाहिलं. समोर प्रसाद ठेवला.कुणाचं तरी मूषकस्वामीकडे लक्षं
गेलं. त्याने मूषकस्वामींनाही अक्षता आणि फुलं वाहिले. नमस्कारही केला.
भक्तांच्या
या दुप्पटी वागण्याने मूषकस्वामी थक्क होऊन गेला. पण लगेच त्याच्या लक्षात आलं. आपल्याला
महत्व आहे ते बाप्पांमुळे. तो नसेल तर कोण पुसतय आपल्याला! या विचाराने तो जरा खट्टूही
झाला. त्याने डोळे मिटून घेतले.
काय
देवा, प्रसाद खायचा नाही वाटतं. बाप्पांच्या या बोलण्याने तो भानावर आला नि त्याने
डोळे उघडले.
बाप्पा
बाप्पा, अहो आता चेष्टा बंद करा. चूक कळलीय माझी मला.
कळली
ना...ते बरं झालं. अरे, आपल्या अंगी काही कर्तृत्व नसेल तर त्याचा फुकाचा अभिमान बाळगणं
हे महामूर्खपणाचं लक्षण ठरतं. आपण नेमकं कोण आहोत, हे ज्याला कळतं त्याच्या वाटेला
ना चेष्टा येत ना त्याला उगाचच दु:ख करावं लागत.दुसऱ्याच्या मोठेपणाची हौस तिसऱ्याने
मिरवायची नसते, मूषकस्वामी.बाप्पा म्हणाले.
होय बाप्पा, हा धडा मी यापुढे
कायम लक्षात ठेवीन. मूषकस्वामी बाप्पांना नमस्कार करत म्हणाले. कुणीतरी जोरात उंदीर
मामाकी जय असं जोरात ओरडलं. पण त्यांचं कुठे लक्षं होते तिकडे .ते मोदक फस्त करण्यात
मग्न झाले होते.
०००

Comments
Post a Comment