ताकारपुरती आजी
ताकारपुरती आजी
परवा तेजोमयीने घरी हट्टच धरला.तिला ताकापुरती असलेली आजी हवी होती.पाहिजे म्हणजे पाहिजे,तिने निक्षूण सांगितलं.तिच्या या मागणिनं बाबा चक्रावले.आई रागावली.अशी काही आजी नसते,असं आईने तेजोमयीस सांगून बघितलं.अलेक्झांडर द डॉगी या वादाच्या वेळी आई-बाबा आणि तेजोमयी अशा तिघांकडे आळीपाळीनं बघितलं.मात्र कुणीही त्याला प्रतिसाद दिला नाही.तेव्हा प्रकरण गंभीर असल्याचं त्याच्या लक्षात आलं.अशावेळी फारशी लुडबडू बरी नाही,असं शहाणपण त्याच्याकडे असल्याने तो गॅलरीतून जाऊ झोपी गेला.खरे तर तो जागीच होता.आत काय चाललय याकडे त्याचे कान लक्ष ठेऊन होते.
बाबांनी पुन्हा एकदा तिला समजावलं की अशी ताकापुरती आजीबिजी काही नसते म्हणून..
समजा ही आजी मीच तुम्हाला दाखवली तर काय द्याल,तेजामयीने थेट विचारलं.
ऑ..काहीबाही काय बोलते तेजो तू,अशी आजी कुठून शोधणार तू..आईनं विचारल..
आईचं बरोबर आहे..कुठे शोधणार तू अशा आजीला.
ते मी माझं ठरवणार....मी अशी आजी दाखवली तर मला काय देणार..तेजोमयीने पुन्हा विचारलं.
अगं भलताच हट्ट कशापायी करतेस..आई नाराजीचा सूर लावत म्हणाली.
मी कुठे हट्ट करतेय..अशी आजी पाहिजेचा हट्ट मी मागे घेतला की नाही.आता मीच तुम्हाला अशी आजी दाखवते म्हणते तर त्यात कसला आलाय हट्ट..
बर बरं तू अशी आजी दाखव....तुला पाहिजे ते देऊ बाबां म्हणाले.
काहीतरी देऊ असं अलेक्झांडरच्या कानावर पडल्याने तो गॅलरीतून उठून बाबांजवळे येऊन त्याने बाबांकडे बघितलं..मला काय मिळणार,असे भाव त्याच्या डोळयात होते..
त्याला जवळ घेत,बाबांनी त्याचे कान उपटले..असं चोरुन लपून ऐकण बरं नव्हे हे त्यांनी अलेक्झांडरला सांगितलं.अलेक्झांडर चटदिशी आईकडे गेला.आईने त्याला लाडाने कुरवाळले आणि बाबांकडे रागाने बघितलं.त्याचे कान ओढल्याचे आईला आवडलं नव्हतं..
तुमच्या लाडामुळेच दोघेही हट्टी झाले..पुरवा त्यांचे हट्ट..बाबा आईला म्हणाले.
हे बघा एकतर ठोंब्याने काहीही हट्ट धरला नाही..दुसरं म्हणजे तेजोचा हट्ट तुम्ही पूर्ण करताहात मी नाही.ताकापुरती आजी दाखवते म्हणाली ती तर तम्ही हो म्हणालात नि त्यासाठी तिला हवं ते देण्याचं कबूलही केलं..
अरे तुम्ही भांडता कशाला...तेजोमयी म्हणाली.अलेक्झांडरनेही मान हलवली.
बरं बाई,ज्या ताकापुरत्या आजीवरुन भांडणापर्यंत प्रकरण आलं त्यातली आजी दाखवूनच दे ना.. म्हणजे मग संपलेच नं सारं..बाबा म्हणाले..
तेवढ्यात घरकाम असणारी आजी आल्याने,हा विषय तेजोमयीनं थांबवला.आज आल्या आल्या आईन आजिला चहा दिला.काहीतरी खायलाही दिलं.नेहमीपेक्षा अतिशय गोड ती कामवाल्या आजीशी बोलत होती.
भांड्यांच्या व्यतिरिक्त ज्या दिवशी आजीकडूनकाही जादा काम करुन घ्यायचं असेल त्या दिवशी आई अशी वागायची.हे तेजोयमीच्या लक्षात आलं होतं.एरव्ही चहाबिहा क्वचितच ती आजीला द्यायची.आजीच्या भांडे घासण्यालाही नाव बोटं ठेवायचं.हे डाग निघाले नाही,ते भांडे स्वच्छ झाले नाही.पावडरच राहिली.शितच चिटकून आहेत.तेलकटपणा गेला नाही,अशा प्रकारचे बोल आई आजीला ऐकवायची.मात्र जेव्हा जादाचे काम करुन घ्यायचे असेल तेव्हा मात्र आईसारखी प्रेमळ दुसरं कुणीही नसणार याची तेजोमयीस खात्री पटायची.एकदोनदा तिने आईला आजीशी नेहमीच म्हणजे दररोजच प्रेमाने कां वागत नाही.दररोज चहा कां देत नाही .असं विचारलं तेव्हा,तू अजून लहान आहेस,तुला यात कळणार नाही,असं बोलून आईने तेजामयीस चूप बसवलं..तेजोयमीने आजी प्रकरणाकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं असतानार,तिच्या वाचनात ताकापुरती आजीचा संदर्भ आला.तिने त्याचा अर्थ शोधून काढला.आपल्या घरकामासाठी येणारी महिला हीच ताकापुरती आजी असल्याचं तिच्या लक्षात आलं.तेव्हाच तिने आईची चूक लक्षात आणून देण्याचं ठरवलं.त्यातूनच तिने आधी ताकापुरती आजी दाखण्याचा हट्ट धरला आणि मग स्वत:च अशी आजी दाखवण्याची तयारी दर्शवली.
आज जेव्हा नेहमीच्या कामा सोबतच आजीकडून गोड बोलून आईने बरीच कामे करुन घेतली.आजी गेल्याबरोबर तेजोमयी बाबांजवळ जाऊन म्हणाली.आपल्या घरी जी कामवाली आजी येतेना तीच ताकापुरती आजी आहे बाबा..
आँ..बाबा आणि आई एकाच वेळेला म्हणाले.
सांगू का बाबा कसं ते..
हो हा सांग ना..बाबा म्हणाले.
तेजोमयी बाबांजवळ जाऊन बसली.तिने अलेक्झांडरलाही जवळ बोलावलं.तू सुध्दा ऐक रे असं त्याला म्हणाली..
आणि मी..आईने विचारलं..
तुला ऐकायचं असेल तर ऐक पण उगाच माझ्यावर ओरडू नकोस..तेजोमयी आईला म्हणाली.
अगं शहाणे..सांग की..
हे बघा आज कामवाल्या आजीला आईने चहा दिला..नाश्ता दिला.तिच्याशी गोडगोड बोलली..
मग..
अहो ती असं नेहमी करत नाही ना..
म्हणजे तू माझी हेरगिरी करतेस कां ग..आईने रागावून म्हणाली...
अगं तसं नाही..पण जाता येतं ते कळतं ना..तुला जेव्हा भांड्याशिवाय वेगळी काम करुन घ्यायची असतात तेव्हा तू आजीशी इतकी छान वागते.एरव्ही तुझं वागणं कोरडं असतं..
खरं की काय.बाबा आईकडे बघत म्हणाले.
अहो,हिच्याकडे काही लक्ष देऊ नका..व्यवहाराचा भाग झाला..
अगं पण काम असेल तेव्हा चांगलं चांगल वागायचं आणि एरव्ही नाही..याला काय अर्थ..तेजोयमीनं विचारलं..
अच्छा तर अशी भानगड आहे म्हणायची ताकापुरत्या आजीशी..बाबा हसत म्हणाले..
म्हणायचं काय तुम्हाला..आई नाराजीनं म्हणाली..
अहो,सोप्प आहे...काम असेल तर गोड बोला नाही तर हाटहूट करा..म्हणजे एखाद्याकडून ताक हवं असेल तरच चांगल वागा..असा त्याचा अर्थ..तुम्ही आपल्या घरी येणाऱ्या कामवाल्या आजीला ताकापुरतीच करुन टाकलं..तेजोच्या बरोबर लक्षात आलं ते..
चुकलं कां माझं काही..तेजोमयींन विचारलं..
नाही गं छबडे..मला वाटलं होतं मी वागतेय ते बरोबरच आहे.पण तू माझे डोळे उघडली.आपल्या घरी येणारी काम वाली आजी यापुढे कधीही तुला ताकापुरती वाटणार नाही..आई तेजोमयीला जवळ घेत म्हणाली. तेजोमयीच्या चेहऱ्यावर हसू आलं.बाबा तिला शाब्बास म्हणाले.अलेक्झांडरनेही आपला आनंद शेपूट हलवून व्यक्त केला.
.jpg)
Comments
Post a Comment