जीएंचा त्रास आणि ताप! (भाग दोन)
जीएंचा त्रास आणि ताप! (भाग दोन)
(पूर्वसूत्र-आपल्या घरी जीए कुलकर्णी यांची पुस्तकं कां
नाहीत,या तेजोमयीच्या प्रश्नानं तिचे बाबा गडबडून गेले.यावर त्यांनी काय उपाय शोधून
काढला?यातून नवा काही गुंता निर्माण झाला का?वाचा पुढे..)
तेजोमयी झोपल्यावर रात्री बाबा आईस
म्हणाले,
तेजोयमी गेल्याकाही दिवसात डोक्यावर वगैरे
पडली होती का? असं
पडल्यावर मेंदुला जखम होते आणि मग अशी व्यक्ती काहीबाही करु लागते.
अहो, तुम्हीच मला पडल्यासारखे वाटता? जीए कुलकर्णी यांचं
पुस्तक तिने मागितलं तर यात कुठे आलय, तिचं पडणं? आईने
नाराजी व्यक्त केली.
तसं नाही. माझ्यासारखी मोठी मोठी माणसंच
जी.एंची पुस्तकं वाचायला धजत नाही तर आपली ही लहानगी म्हणते त्यांचं पुस्तकं
पाहिजे. यात तुला गंभीर वाटत नाही का?
चुलीत गेलं तुमचं गंभीरबिंभीर होणं? तिला जीएंची पुस्तकं घेऊन
द्यायचं असेल तर द्या. नाहीतर मीच कुठूनतरी शोधून आणते. झोपा आता. आई बाबांना
किंचित रागावून म्हणाली आणि झोपी गेली.
०००
त्या रात्री बाबांना काही झोप येईना. जी.ए.कुलकर्णीं
यांची पुस्तकं आपली झोप उडवतील अशी त्यांनी कल्पनाही केली नव्हती. या कडावरुन
त्याकडावर होत त्यांनी कशीतरी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी ते ऑफिसला न जाता, थेट
तेजोमयीच्या शाळेत गेले. तिच्या वर्गशिक्षकांना भेटले. आपली शंका बोलून दाखवली.
म्हणजे तुम्हाला तेजोमयीस वेड लागलं असं
म्हणायचय का? वर्गशिक्षकांनी
असं विचारतच बाबा चपापलेच.
शिक्षकांना त्यांचा रागही आला. त्यांनी बाबांना मुख्याध्यापकाकडे
नेले. बाबांनी तेजोयमीवर अप्रत्यक्षपणे घेतलेल्या शंकेबद्दल जेव्हा मुख्याध्यापकांना
सांगितलं, तेव्हा त्यांचा चेहरा गंभीर झाला. एक पालक आपल्या मुलीला वेड लागलं असं
कसं समजू शकतो? असं ते बाबांना करड्या स्वरात म्हणाले.
अहो, जीएंची पुस्तकं वाचायाला मागितली, म्हणजे
काही आभाळ कोसळलं नाही ना? चांदोबा-चंपकच्या खूप खूप पलिकडचं काही एखाद्या मुलास वाचावं वाटत असेल
तर त्यात वेड लागणं कुठं आलय?
मुख्याध्यापकांनी बाबांची खरडपट्टी काढली.
कशासाठी आपण शाळेत आलो असं बाबांचं झालं. ते जेव्हा जायला उठले, तेव्हा
मुख्याध्यापकांनी त्यांना बसायला सांगितलं. ग्रंथपालास बोलावलं. ग्रंथालयात जर जीए
कुलकर्णी यांची पुस्तकं असतील तर त्यातली दहा पुस्तकं माझ्या नावावर लिहून ताबडतोब
घेऊन या, असं त्यांनी ग्रंथपालास आदेशच दिला. पंधरा वीस मिनिटांनी ग्रंथपाल धापा
टाकत आला. ग्रंथालयात पाच सहाच पुस्तकं होती. अगदी नवी कोरी. इतक्या वर्षात त्यांच्याकडे
कुणी बघितलंही नव्हतं.
मुख्याध्यापकांनी ही पुस्तकं बाबांना
दिली. ती, तेजोयमीस वाचायला द्या असं सांगितलं.
समजा तिला या पुस्तकातलं नाही समजलं तर
पुन्हा पुन्हा वाचेल ना ती! तुम्हाला विचारेल. शाळेत विचारेल. कंटाळा आला तर ठेऊन देईल. पण तिला
जीएंची पुस्तकं देण्याऐवजी तुम्ही तिच्या मेंदुला गंभीर आजार झाला समजता, हे
तुम्हाला शोभत नाही. मुख्याध्यापक नाराजी व्यक्त म्हणाले. मुख्याध्यापकांचा कसाबसा
निरोप घेऊन तेजोमीयचे बाबा पडल्या चेहऱ्याने शाळेतून बाहेर पडले.
०००
स्कूटरवरुन घराकडे येताना त्यांना
रस्त्यात, डॉ राजेंद्र सरदेशमुख, मानसोपचार तज्ज्ञ अशी पाटी दिसली. तो डॉक्टर सरदेशमुखांचा
दवाखाना होता. बाबांनी स्कूटरचा ब्रेक करकचून दाबला. डॉक्टरांना भेटून आपली शंका
विचारायला हवी, असं बाबांना तीव्रतेनं वाटलं. बाबांना दरदरुन घाम फुटला होता. जावं
की जाऊ नये या अशा विचारात ते आत गेलं. केबीनच्या बाहेर असलेल्या स्वागतकक्षातील
व्यक्तिला त्यांनी भेटीची वेळ मागितली. आतमध्ये डॉक्टर एका रुग्णास तपासत होते.
त्यांची तपासणी पूर्ण झाली की, बाबांचा क्रमांक होता. अर्ध्यातासानंतर बाबांना
डॉक्टरांनी आत बोलावलं. आत शिरताना बाबांना खूप दडपण आलं. एसीच्या गारेगार हवेतही
त्यांना घाम फुटला. त्यांची ही अवस्था बघून डॉक्टर खुर्चीतून उठले आणि त्यांनी
बाबांना खूर्चीवर बसवलं. त्यांच्या टेबलवर असलेली बिसलेरीची एक लहान बॉटल दिली. बाबांचा
हात इतका थरथरत होता की त्यांना बिसलेरीचं झाकणही उघडता येईना. तेव्हा डॉक्टरांनीच
झाकण उघडून दिलं. बाबांनी गटागटा पाणी पिलं.
काय हो इतकं घाबरायला काय झालं? डॉक्टरांनी विचारलं. डॉक्टरांच्या
या प्रश्नानं बाबांना रडू कोसळलं. डॉक्टरांनी त्यांना कसंबसं शांत केलं. थोड्यावेळ
तुम्ही शांत बसा, मग आपण बोलू, असं डॉक्टरांनी बाबांना सांगून त्यांनी त्यांच्या
टेबलच्या ड्रावरमधून एक पुस्तक काढलं. बाबांचं पुस्तकाकडे लक्ष गेलं, पुस्तकाच्या
नावाखाली लेखकाचं नाव होतं, जी.ए.कुलकर्णी !
ते बघताच, बाबा ताडकन उभे राहिले आणि जोराने
म्हणाले, म्हणजे डॉक्टर, तुम्ही सुध्दा!
या अनपेक्षित प्रश्नाने डॉक्टर गडबडलेच, तुम्हीसुध्दा
म्हणजे? त्यांनी आश्चर्यानं
विचारलं.
बाबा या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी
थांबलेच नाहीत. गर्रकन माघारी वळले आणि तडक केबीनच्या बाहेर आले.
डॉक्टरांनी, एकदा पुस्तकाकडे आणि केबिनच्या
बाहेर वेगाने जाणाऱ्या बाबांकडे बघत, वेडाच वाटतो हा गृहस्थ, असं स्वत:शी पुटपुटत
जीएंच्या पुस्तकात डोकं घातलं.
०००
त्या दिवशी बाबा ऑफिसमध्ये न जाता,
शहरातले जितके म्हणून पुस्तक विक्रते होते, तितक्या ठिकाणी गेले. एक-एक करत
त्यांना जी.ए कुलकर्णी यांची १०-१२ पुस्तकं मिळालित. ती नवी कोरी पुस्तकं बघून
सकाळपासून त्यांच्या मनावर आलेलं दडपण कमी झालं. घरी परतताना तेजोमयीस आवडणारं
आईसक्रीम त्यांनी घेतलं. घरात पाऊल टाकताच त्यांनी तेजोमयीस हाक मारली. तेजोमयी
आतल्या खोलित अभ्यास करत होती. आई स्वंयपाक खोलित आणि तिच्या अवतीभवती अलेक्झांडर
होता. ते तिघेही लगबगीनं बाहेर आले.
तेजोमयीला बाबांनी आपल्या कवेत घेतलं आणि
त्यांना रडू कोसळलं. पण लगेच त्यांनी स्वत:ला सावरलं. जी.ए.कुलकर्णी यांची नवी
कोरी पुस्तकं तिच्या समोर ठेवली. आईसक्रीम दिलं.
वा वा! बाबा तुम्ही
खरच ग्रेट आहात हं? तेजोमयी म्हणाली आणि त्यांना बिलगली.
अखेर जी.एं.चं भूत उतरलं म्हणायचं तुमच्या
डोक्यावरचं! आई हसत म्हणाली. वातावरणातला तणाव दूर झाला. बाबांच्या
चेहऱ्यावरचा ताणही कमी झाला. अलेक्झांडरने बाबांना मिठी मारुन हा ताण पूर्णच
घालवला.
सुरेश वांदिले
७०१,सातवा माळा,देवराई सहकारी गृहनिर्माण
संस्था,चारकोप,सेक्टर सहा,कांदिवली पश्चिम,मुंबई ४०००६७,
भ्रमणध्वनी ९३२४९७३९४७
०००
दररोज एक बालकथा

.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment