वाघोबा रागावले (भाग एक)
वाघोबा
रागावले (भाग एक)
सगळी
टोळी आनंदात होती. कारण अनेक महिन्यांपासून ठरवलेलं स्वप्न साकार होणार होतं.
ताडोबाच्या जंगलात जाऊन वाघोबांचं दर्शन घ्यायच, असं घरी अनेक दिवसांपासून ठरत
होतं. या टोळीमध्ये रवी, शशी, मीना, तेजोमयी आणि रंगनाथचे आईबाबा होते.
ताडोबाच्या
जंगलामध्ये वाघोबाचं दर्शन करण्याच्या पहाटे दुपारी आणि रात्री अशा तीन वेळा
असतात. रात्रीच्या दर्शन-सफारीला फार कमी लोकांना परवानगी दिली जाते. ही परवानगी
ऑनलाइन पध्दतीनं दिली जाते. रवीच्या बाबांकडे ऑनलाइन बुकिंगचं काम सोपवलं होतं.
पहाटे आणि दुपारी दोनच्या सफारीचं झालं. मात्र रात्रीच्या सफारीचं बुकिंग होऊ शकलं
नाही.
सकाळी
सहा वाजताची पहिली सफारी असल्याने रवीचे आईबाबा इतरांसोबतच आदल्यारात्री ताडोबा
जवळच्या अंधारी अभायरण्याच्या बाहेर असणाऱ्या हॉटेलमध्ये मुक्कामास थांबले.
दुसऱ्या
दिवशी सकाळी सगळी मंडळी वेळेवर तयार झाली. बरोबर सहा वाजता सफारीच्या गाडीमध्ये
गाईडसोबत बसून मंडळी ताडोबाच्या जंगलात शिरली.
अद्याप
सूर्य उगवायचा होता. त्यामुळे अंधाराचे साम्राज्यच सभोवताल होते. थंडगार वारा
सुटला होता. झाडाच्या पानांची सळसळ सुरु होती. गाडी जशी समोर जात होती तसे काही
प्राण्यांचे आवाज ऐकायला येऊ लागले. काही पक्षांचं गुंजन सुरु झालं होतं. मोठ्या
मंडळींना पक्षांच्या या गुंजरवात फारसा रस दिसला नाही. सर्व वडीलधारी मंडळी, वाघ
कधी दिसणार या चर्चेतच गुंग होती.
सफारीची
गाडी या वाटेतून त्या वाटेकडे जात जंगल भ्रमंती घडवत होती. रस्त्यात माकडांचा थवा
आला तेव्हा गाडी थांबली.
माकडांना
काय बघायचं, रवीची आई म्हणाली.
इथे
वेळ दवडला तर वाघोबाचं दर्शन घडायचं नाही.
तेजोमयीचे बाबा म्हणाले.
काय रे बरोबर ना, मीनाच्या आईने गाईडला
विचारलं.
तो फक्त
हसला. याचा अर्थ गाईड आपल्याबाजूने बोलतो असं टोळीच्या आईबाबांना वाटलं.
०००
मुलं माकडांच्या खेळात दंग झाले होते. माकडांचा
खेळ बघतच राहावा असं सर्व छोट्या कंपनीला वाटत होतं, पण आई बाबांनी गाईडला फार काळ
तिथे राहू दिलं नाही. त्यामुळे मुलांचा हिरमोड झाला.
गाडी
पुढे निघाली. काही क्षणानंतर हरणांची टोळी रस्त्यावर बागडताना दिसली. हरणांना
प्राणी संग्रहालयात सर्वांनी बघितलं होतं. पण प्रत्यक्ष जंगलात बघण्याची त्यांची
ही पहिलीच वेळ होती. सर्व हरणं आपल्याच तालात त्या ठिकाणी विहरत होती.
मीनाचे
बाबा गाईडला म्हणाले,
अरे,
हरण बघायला आम्ही थोडच इथे आलो आहोत. वाघ दिसला तरच खरी सफारी.
गाईड यावर काहीच बोलला नाही. फक्त हलकसं हसला.
गाईडने गाडी पुढे काढली.
०००
गाडी
पुढे जात असताना गाईडनं गाडी थांबवली. सर्वांचं लक्ष एका झाडाकडं वेधलं, त्या
झाडाच्या फांद्यांवर ५० पेक्षा जास्त पोपट बसले होते. जणू काही पोपटांची शाळाच
भरली होती. झाडांच्या फांद्यावर झुलणारी लाल चोच आणि हिरवाकंच रंगाचे पोपट बघून
छोट्या मंडळींना फार आनंद झाला.
काही तरी सळसळ झाली,त्यामुळे पोपटांची ती रांग
उडाली. एकत्रच पन्नास पोपट पहिल्यांदाच मुलांनी बघितले होते. धनुष्यबाणासारखा आकार
करत ते उडणारे पोपट बघून मुलांनी टाळया वाजवल्या. वडिलधाऱ्या मंडळींना यात फार रस
दिसला नाही.
रविच्या
बाबा म्हणाले, अरे, हे काय दाखवत बसलास, वाघ दाखव ना.
हो साहेब, असं गाईड बोलला आणि त्याने
गाडी पुढे काढली. पाच मिनिटानंतर गाडी एके ठिकाणी थांबली. रस्त्याच्या एका बाजुला
चारपाच बारशिंगे उभे होते. गाडी थांबल्याबरोबर ते सावध झाले आणि आत झाडीत पळाले.
राखाडी रंगाचे ते बारशिंगे बघून मुलांचा आनंद व्दिगुणित झाला. गाईडने आता गाडी
हळूहळू पुढे न्यायला सुरुवात केली. कारण त्याच्यामते आणखी काही बारशिंगे त्यांना
दिसू शकले असते. त्याचे म्हणणे खरे ठरले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आठ- दहा छोटे
मोठे बारशिंग गवत चरत होते. त्यांचं काही गाडीकडे लक्ष नव्हतं. त्यामुळे मुलांना
छानरीत्या बारशिंग्यांना बघता आलं. डौलदार बारशिंगा बघून सर्वांना आनंद झाला.
बारशिंग्यावर हल्ला करण्याआधी वाघही विचार करतो अशी माहिती गाईडकाकाने मुलांना
दिली.
०००
मुलांना सर्व प्राणी पक्ष्यांमध्ये आनंद मिळत
होता तर मोठ्यांचं मात्र वाघोबा कधी दिसणार, कधी दिसणार असं चाललं होतं.
गाईड तेजोमयीच्या आईला म्हणाला, अहो
ताई,वाघोबा जसा या जंगलाचा राजा आहे तसा स्वत:च्या मनाचाही राजा आहे.त्याला वाटेल
तेव्हाच तो आपल्याला दर्शन देईल ना.
म्हणजे
काय, वाघ दिसणारच नाही का, सीमाचे बाबा म्हणाले.
असं
मी म्हणालो नाही साहेब. वाघ जिथं जिथं येऊ शकतो, त्या ठिकाणी मी तुम्हाला नेतच आहे.
कधीनाकधी तो या ठिकाणी आलेला आहे. आज तो आतापर्यंत कां आला नाही, हे मी कसं
सांगणार.
म्हणजे वाघ दिसणारच नाही का, मीनाचे बाबा
निराश होत म्हणाले.
असे निराश होऊ नका,आता नाही दिसला
तर दुपारी दिसेल.
दिसेल,दुपारी
दिसेल, रवी आणि सीमा हसत हसत म्हणाले.
गाडी
पुढे निघाली.
गाडी
हळू हळू जात होती. एके ठिकाणी दोन मोर आणि तीन चार लांडोर उभे होते. मुलांनी
मोरपीस बघितलं होतं, पण मोरास पहिल्यांदाच बघत होते. मोरांना बघून सर्व मुलं हरखून
गेली. एकटक त्यांच्याकडे बघत राहिली. अचानक एका मोराने पिसारा फुलवला. तो
पिसारा,पंखा हलवतो तसा हलवू लागला. ते दृष्य अतिशय मनोहारी होते. पिसारा हलवता
हलवता तो मोर मागे पुढे करत होता. त्यामुळे तो जणू काही नाचत आहे असं वाटतं होतं.
नाचरे मोरा, आंब्याच्या वनात नाच, अशी कवितेची ओळ रविला आठवली. हे आंब्यांचं वन
आहे का हो, असं त्याने गाईडला विचारलं. या ठिकाणी आंबा, साग, वेळू अशी
वेगवेगळी झाडं आहेत. फक्त आंब्याची नाही. मोर फक्त आंब्याच्याच वनात नाचतो असं
नाही. तो इथे रस्त्यावर येऊनही नाचू शकतो. जंगलात वाघ दिसणं हे आपल्या हाती नसतं
तसं मोराचं नाचणं हे सुध्दा आपल्या हाती नसतं. आजचा दिवस चांगला म्हणून हा पिसारा
फुलवलेला मोर दिसला. गाईड म्हणाला. (अपूर्ण)
०००००००
दररोज
एक बालकथा

.jpg)
Comments
Post a Comment