लुडबूड
लुडबूड
बाबा, लुडबूड म्हणजे हो काय? तेजोमयीनं बाबांना विचारलं.
लुडबूड
म्हणजे दुसऱ्याच्या कामात मध्येमध्ये करणं.
हे चांगलं की वाईट?
कुणाला चांगलं वाटत - जसं मला. कुणाला चांगलं वाटत
नाही.
जसं मम्मीला!तेजोमयी म्हणाली.
अगदी
बरोबर.बाबा म्हणाले.
पण,आज कां बरं तुझी लुडबूडची गडबड चाललीय?बाबांनी विचारलं.
जरा
मम्मीच्या स्वयंपाकघरात लुडबूड करावी म्हणते, मी
या रविवारी...तेजोमयी म्हणाली.
बापरे बाप!
असं
कां साप दिसल्यासारखं कापलात हो बाबा तुम्ही!
अगं
मम्मीच्या स्वयंपाक खोलित लुडबूड करणं म्हणजे सिंहाच्या गुहेत जाऊन त्याला हॅलो
म्हणण्यासारखं आहे.
जावं म्हणते मी. जो हो गा देखा जायेगा.तेजोमयी खट्याळपणे म्हणाली.
जेव्हा पाठीत धपाटे भेटतील तेव्हा समजेल,जो हो देखा जायगा.
समजा,
उलट झालं तर...
म्हणजे, तुला काय म्हणायचय?
मी
आईकडून शाबासकी मिळवली तर...
तुला पज्ञ्मश्री आणि तुझ्या आईला पज्ञ्मभूषण...
मग
लागली आपली शर्यत ! तेजोमयी म्हणाली.
ओके! बाबा उत्तरले.
000
तेजोमयी आणि बाबांचं संभाषण बाप्पांनी एैकलं. ही सवय वाईट असल्याचं त्यांना
ठाऊक होतं. त्यांनी महादेवांची क्षमा मागितली. आईच्या स्वयंपाकघरात तेजोमयी, नेमकी काय लुडबूड करणार याची त्यांना
उत्सुकता लागून गेली. ती प्रार्थनेसाठी कधी आपल्यासमोर उभी राहते याची ते वाट बघू लागले.
सकाळची प्रार्थना झाल्याने आता संध्याकाळपर्यंत
निवांतपणा.एवढा वेळ कसा काढायचा?त्यांना प्रश्न पडला. ते अस्वस्थ झाले. त्यांना राहवेना. त्यामुळे ते देवघरातून बाहेर पडले नि
तेजोमयीच्या खोली समोर उभे राहिले. दार न ठोठावता आत जावं, असं त्यांना वाटलं. पण आधीच एका वाईट सवयीला बळी पडलो, आता दुसऱ्या सवयीला बळी पडायचं नाही
असं त्यांनी स्वत:ला बजावलं. त्यांनी तेजोमयीच्या खोलीच्या दारावर
टकटक केलं. दुसऱ्या वाईट सवयीला बळी पडलो नाही म्हणून ते स्वत:ची पाठ थोपटू
लागले. तोच
तेजोमयीनं खोलीचं दार उघडलं. समोर बाप्पांना बघून तिला धक्का बसला.
बाप्पा तुम्ही आणि इथे! मला बोलावलत असतं तरी तुमच्याकडे धावत आली असती.
अगं
कळवणार कसं? माझ्याकडे तुझ्यासारखा मोबाईल थोडाच
आहे.
मग बाबांना
सांगून एक विकत घेऊन देऊ का तुम्हाला?
मोबाईलचं नंतर बघू, आधी आत तर येऊ दे. बाप्पा तेजोमयीस म्हणाले.
सॉरी, बाप्पा या या...तिने बाप्पांना खोलीच्या आत घेतलं. बाप्पा आपल्याकडे
एवढया तातडीनं कां आले असतील? याचा विचार ती करु लागली. दोन क्षण स्तब्धतेत गेले. न राहवून तेजोमयीच बोलली,
बाप्पा एवढं काय अर्जंट काम काढलं हो
तुम्ही?
अगं, मी मघा तुझं आणि तुझ्या बाबांचं बोलणं
एैकलं. तू मम्मीच्या खोलित लुडबूड करणार. मम्मी तुला काहीच म्हणणार नाही. बाबा
तुला पज्ञ्मश्री देणार असं ...
खरय
ते...
मला
उत्सुकता लागलीय की नेमकी कोणती लुडबूड तू करणार ते..
ते
तर मी तुम्हाला सांगेलच बाप्पा...पण...
पण
काय?
पण,तेजोमयी चाचरत म्हणाली...तुम्ही आमच्या दोघांमध्ये मध्येमध्ये
केल्यानं लुडबूडचा अर्थ मात्र चांगला कळला हं! हे एैकल्यावर बाप्पाही खुदकन हसले.
000
तेजोमयी स्वयंपाकघरात लुडबूड करणार हे
दोघांमधील गुपित बाबांनी न राहूवन आईला सांगितलच.
करु
द्या हो.त्याचीच मी वाट बघत होते.आई म्हणाली.
क
का काय,
म्हणालीस? बाबा
आश्चर्यचकीत होऊन म्हणाले. आईचं उत्तर एैकून बाबा चाटच पडले. हे त्यांना अनपेक्षित
होतं. आपण स्वप्नात तर नाही ना, असंही त्यांना वाटलं.
अहो, तुम्हाला झालं काय? आईनं विचारलं.
नाही म्हणजे, तू तेजोमयीला स्वयंपाक घरात लुडबूड करु देणार! आश्चर्यच म्हणायचं.नाही म्हणजे...
नाही म्हणजे काय हो? आई जरा जोरात म्हणाली.
नाही म्हणजे...म्हणजे नाही ...म्हणजे... हो तसं नाही...
हे
नाही
-हो, हो-नाही, नाही-होचं काय पालूपद चालवलय?
म्हणजे
माझा विश्वासच बसत नाहीय गं!
अहो, सुटीच्या दिवशी तेजूनं टाइमपास
करायच्या एैवजी स्वयंपाक घरातलं काही शिकावं असं वाटलं होतं मला. संधीची वाटच बघत
होते. स्वत:हून लुडबूड करु इच्छिते म्हणजे चांगलंच आहे की! कूकर लावायला शिकली,पोळी लाटायला शिकली, कांदा कापायला शिकली, गॅस सुरु करायला शिकली तरी खूप काही
शिकली असं समजेन हो.हे सगळं येणं म्हणजे एखादी कला येण्यासारखीच नाही का? आई म्हणाली.
अं, हो हो...बाबा कसे बसे उद्गारले.
000
तेजोमयीला बाबांनी हाक मारली. ती त्यांच्याकडे येताच ते म्हणालं, तेजू तुला मी पज्ञ्मश्री बहाल केली आणि
तुझ्या आईला पज्ञ्मभूषण देणार आहे.
अहो पण बाबा, मी अजून आईच्या स्वयंपघरात लुडबूड
केली नाहीय ना!
अगं
तू केली नसशील, पण मी केलीय ना!
अय्या खरच बाबा!तेजोमयी बाबांच्या गळयात हात टाकत म्हणाली. मग बाबा तुमच्या वाटेला काटे आलेत की
फुलं!
अगं
बाई, मी प्रत्यक्षात केलं काहीच नाही. पण तू स्वयंपाकघरात लुडबूड करणार हे
गुपित काही माझ्या पोटात राहिलं नाही. ते ओठात आलं नि आईपर्यंत पोहचलं.
मग
काय झालं?
आई
वाव,
म्हणाली. ती तर द्रोणाचार्याच्या भूमिकेत जायला कधीचीच तयार आहे.
याला म्हणतात स्पिरिट! नाही तर तुम्ही?
मी
काय?
मोबाईला हात लावला तर बटना बिघडतील, कॅमेराला
हात लावला तर काळजी घे, कॉम्प्युटरला हात लावला, सांभाळून...अशी टेप लावणार! रेडियो सुरु करायचा म्हंटला तरी तुमचा
चेहरा लांब होणार! हो की नाही? पण मम्मी बघा एका क्षणात तयार! रविवारची धम्माल मी स्वंयपाक घरात करणार
नि एंजाय करणार!
000
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment