बिघडता बिघडता घडायचं..
बिघडता बिघडता घडायचं..
बाप्पा आणि तेजोमयी गप्पा मारत बसले होते. बोलता
बोलता बाप्पांनी तेजोमयीला विचारलं,
नवीन वर्षाचा काय संकल्प केलास तू तेजू? अचानक आलेल्या या प्रश्नानं तेजोमयी काही क्षण स्तब्ध
झाली. मग खाली नजर करत हलकेच म्हणाली...
यंदा
काहीही संकल्प केला नाही बाप्पा.
कां
बरं? बाप्पांनी आश्चर्य व्यक्त करीत विचारलं.
त्याचं
कारण सांगितल्यावर तुम्ही हसायचं नाही बरं का बाप्पा, तेजोमयी म्हणाली.
अगं मी कशाला हसू? तुला तसं वाटत असेल तर मी माझे ओठच शिवून
घेतो किंवा चेन लावून त्याला बंद करतो...बाप्पा डोळे मिचकावित म्हणाले.
नको नको बाप्पा, असं काही करु नका. मी लगेच
सांगतेना यंदा कां संकल्प केला नाही? ते...
वा वा ...गूड गर्ल.. सांग
बघू...बाप्पांनी उत्सुकतेने विचारलं.
अहो बाप्पा, गेल्यावर्षी तुमच्या
साक्षिने जो संकल्प मी केला होता, तो जानेवारीच्या १८ तारखेलाच धारातीर्थी पडला की?
म्हणजे काय झालं? बाप्पांनी आपणास काहीही न कळल्याचं
दर्शवत विचारलं.
अहो बाप्पा, माझा संकल्प भूर्र उडून गेला...
अरे वा
छान! वॉSव! बाप्पा उत्स्फुर्तपणे बोलून गेले. बाप्पा आपली खेचताहेत असं तेजोमयीला वाटून
तिने डोळे मोठ्ठे करुन बाप्पांकडे बघितलं.
अहो
बाप्पा, तुम्ही मला चिडवण्यासाठी असं बोललात ना. संकल्प मोडला यात कसला आलाय वाव टाव. उलट तुम्ही मला झापायला हवं, रागवायला हवं तुमचं ऐकलं नाही म्हणून.
असं
कोण म्हणतय? तू
माझं एैकलं नाही ते आणि मी चिडवतोय असं कां वाटलं तुला?
मी
तुमचं प्रामाणिकपणे ऐकलं नाही असं मलाच वाटतं ...तेजोमयी म्हणाली.
अरे वा छान!
पुन्हा तेच. तुम्हाला झालं तरी काय बाप्पा? तेजोमयी नाराजी व्यक्त करत म्हणाली.
अगं,
आपल्या चुका कळायला आणि त्या मान्य करायला धैर्य लागतं. ते तुझ्याकडे आहे, म्हणून त्यासाठी वा S व..
हे
मात्र बरय हं बाप्पा.आधी चुका आम्ही करायच्या. त्या कबूल केल्या की तुम्ही झालात
धैर्यवान! तुम्ही
मला बिघडवताय हं बाप्पा.
आधी
बिघडायचं आणि मग घडायचं! त्याचीही गम्मत असते. आपल्या चुका हळूहळू दुरुस्त केल्या तरी
आपण घडतोच उत्तमरितीने घडतो की. कळतय ना मी काय म्हणतो ते?बाप्पांनी विचारलं.
होय बाप्पा, कळतय मला. तेजोमयी म्हणाली.
मग
हाच ठरवं की तुझा यंदाच्या वर्षाचा संकल्प. बाप्पा हसून म्हणाले.
तेजोमयीने होकारार्थी मान हलवली.

Comments
Post a Comment