विकेट उडाली बाबांची


 

विकेट उडाली बाबांची

    विनयच्या घरी आज फार खडाजंगी झाली. त्याचं कारण घडलं एक पिटुकला वाद.

    बाबा म्हणाले उन्हाळयाच्या सुटीत गोष्टीची खूप पुस्तक वाचायची.त्यासाठी वाचनालय लावायचं. विनयने मात्र पुस्तक वाचाण्यासाठी ठाम नकार दिला. वर्षभर अभ्यासाची पुस्तकं वाचलीत आता परत पुन्हा पुस्तक वाचायची नाहीत.त्याने सांगितलं.

    मग काय उंडारक्या करत टामपास करणार आहेस का?बाबा ओरडले.

    मी कुठे उंडारक्या करणार म्हणतोय.

    पुस्तकं नाही वाचणार म्हणजे याचा अर्थ मी काय समजायचा?

    अहो बाबा तुम्ही जरा गोष्टींच्या पुस्तकांच्या पलिकडे बघाना.

    शहाण्या ,तू मला समजवणार आहेस का आता.

    छे हो बाबा मोठयांना कुठं समजावयचं असतं.लहानांनीच समजून घ्यायचं असतं.

    हे बघ तू फारच आगावू झालास हं.

    बाबा मी म्हणालो की गोष्टींच्या पुस्तकांच्या पलिकडे बघू या ना..

    तुला म्हणायच तरी काय?

    बाबा वर्षभर माझ्या असं लक्षात आलय की माझी शब्दसंपत्ती फारशी चांगली नाहीय.या उन्हाळयात ही शब्दीसंपत्ती गोळा करण्यात घालवली तर मला किती फायदा होईल नाही. अहो वेगेवगळी पुस्तकं वाचतांना या शब्दांचाच मला फायदा होईल की नाही? तुम्हीच सांगा.

    आता यावर काय बोलावं हे बाबांना कळेना. विनयने त्यांची चांगलीच विकेट घेतली होती.

सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!