विकेट उडाली बाबांची


 

विकेट उडाली बाबांची

    विनयच्या घरी आज त्याचे बाबा आणि तो यांच्यात किंचित खिटपीट झाली.त्याचं कारण घडला एक फुटकळ वाद.

    बाबा विनयला म्हणाले,

यंदाच्या उन्हाळयाच्या सुटीत गोष्टीची खूप पुस्तक वाच. त्यासाठी वाचनालय लाव.मी सुध्दा खूप पुस्तक आणून देईन.

 विनयने मात्र पुस्तक वाचण्यासाठी ठाम नकार दिला.

अहो बाबा, वर्षभर अभ्यासाची पुस्तकं वाचलीत ना, आता परत पुन्हा पुस्तक वाचायला सांगू नका बॉ. विनय म्हणाला.

    मग काय उंडारक्या करत टाईमपास करणार आहेस का? बाबा विनयवर ओरडले.

    मी कुठे, उंडारक्या करणार म्हणतोय?

मग मोबाईलमध्ये घुसून बसशील नाही तर टीव्हीपुढे बसलशील चिकटपट्टीसारखा. बाबा चढ्या आवाजात म्हणाले.

अहो बाबा, एक तर तुम्ही मला मोबाईल दिलेला नाही, त्यामुळे मोबाईलमध्ये घुसण्याचा प्रश्नच शिल्लक राहत नाही. रिमोटचा ताबा आईकडे असल्याने तोही प्रश्न मिटला. विनय डोळे मिचकावत म्हणाला.

त्याचं म्हणणं बरोबर असल्याचं बाबांच्या लक्षात आल्याने त्यांनी नरमाईनं विचारलं..

अरे मग, तू पुस्तकं नाही वाचणार म्हणजे याचा अर्थ मी काय समजायचा?

    अहो बाबा, तुम्ही जरा गोष्टींच्या पुस्तकांच्या पलिकडे बघाना.बाबांच्या नजरेला नजर भिडवित विनय म्हणाला.

    शहाण्या,तू मला समजवणार आहेस का आता? बाबा पुन्हा चढ्या आवाजात म्हणाले.

    छे हो बाबा मोठयांना कुठं समजावयचं असतं.लहानांनीच समजून घ्यायचं असतं.विनय मिश्किलपणे म्हणाला.

    हे बघ तू फारच आगावू झालास हं.

    बाबा, मी म्हणालो की गोष्टींच्या पुस्तकांच्या पलिकडे बघू या ना.यात कसला आलाय आगावूपणा ? विनय म्हणाला.

    तुला म्हणायच तरी काय? बाबांनी विचारलं.

    बाबा, वर्षभर माझ्या असं लक्षात आलय की माझी मराठी आणि‍ इंग्रजी शब्दसंपत्ती फारशी चांगली नाहीय. या उन्हाळयात ही शब्दीसंपत्ती गोळा करण्यात घालवली तर मला किती फायदा होईल. अहो वेगेवगळी पुस्तकं वाचतांना या शब्दांचाच मला फायदा होईल की नाही? तुम्हीच सांगा.

    आता यावर काय बोलावं हे बाबांना कळेना.शब्दसंपत्ती वाढवण्याची आयाडिया मस्तच होती. विनयने दररोज पाच शब्द जरी पाठ केले तर या  उन्हाळाच्या दोन महिन्यात त्याचे ३०० शब्द पाठ होतील. तो या ३०० शब्दांनी श्रीमंत होईल. या विचारात बाबा गढून गेले. या विचारात त्यांच्याकडून विनयच्या या मस्त कल्पेनेचं कौतुक करायचं राहून गेलं.

सुरेश वांदिले

000

 

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!