वेगळी रंगपंचमी
वेगळी रंगपंचमी
तेजोयमी आणि तिच्या मित्र मैत्रिणींनी रंगपंचमीची जोरदार तयारी केली.
स्वत: बाजारात जाऊन रंग आणले. कॉलनीतल्या सगळयांना जोरदार रंगवायचं असं टोळीनं
ठरवलं.
तुम्हीसुध्दा या आमच्या सोबत रंग खेळायला. फुल्ल टू धम्माल करु आपण.. तेजोमयी बाप्पांना म्हणाली.
आलो
असतो गं, पण मला दुसरीकडे जायचंय रंगपंचमी
खेळायला..
कुठे हो..सांगाना, तेजोमयीनं विचारलं.
तुला आवडायचं नाही..
सांगा तर, मी उंदरांसोबत खेळणार आहे रंग.
शी..तेजोमयी म्हणाली
शी काय...
अहो,रंग खेळायचा असेल तर
कार्तिकस्वामी, श्रीकृष्ण, नारद,इतर देव मंडळींसोबत खेळाना. उंदरांसोबत काय खेळता.
अगं, त्यांना सुध्दा रंगांचा आनंद घ्यावासा वाटतो.
पण त्यांच्याकडे कुणी जातच नाही. म्हंटलं आपणच यंदा त्यांना हा आनंद द्यावा. मला
तर असं वाटतं,तुम्ही सुध्दा तुमच्या कॉलनीच्या पलिकडे बघायला हवं..
म्हणजे हो काय ?
कॅन्सर हॉस्पिटलमध्ये खूप मुलं
उपचारांसाठी आलेली असतात. त्यांच्याकडे जा..त्यांच्यासोबत रंग खेळा. त्यांनाही
आंनद द्या. त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलू द्या. त्याचा तुम्हाला सुध्दा जो आनंद
मिळेल तो केवळ अवर्णनीय राहील..असं बोलून बाप्पांनी डोळे मिटले.
बाप्पांची ही आयडिया तेजोमयीला आवडली. तिने टोळीसह कॅन्सर हॉस्पिटलकडे
जाण्याचा निर्धार केला.
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment