आपलं सामर्थ्य


 

आपलं सामर्थ्य

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलन मनलावून तेजोमयीनं बघितलं. इतकं टक लावून तेजोमयी बघतेय हे लक्षात आल्यानं अलेक्झांडर टीव्हीवर नजर रोखून बसला.एका पथकात सैन्यातील डॉगीही थाटात संचलन करताना  दिसताच,त्याला आनंद झाला.त्या आनंदात त्याने टुणदिशी उडी मारली आणि स्वयंपाकघरात काम करत असलेल्या आईकडे जाऊन लाडीगोडी केली. आईनं त्याची त्याच्या आवडीचे डॉगी बिस्किटं त्याला दिले.स्वारी खुष. पुन्हा दिवाणखान्यात येऊन टीव्हीवरील संचलन एकटक तो बघू लागला.

संचलानात असणारे रणगाडे,विमान,जहाज अत्याधुनिक शस्त्रे,बंदुका,रायफल आणि गणवेषधारी सैनिक बघून तेजोमयीचा उर भरुन येत होता. मध्येमध्ये ती टाळ्याही वाजवायची. अलेक्झांडर शेपटी हलवून आनंद व्यक्त करायचा.

बाबांना यात काही रस दिसत नव्हता.ते पेपरमध्ये डोके खुपसून बसले होते. मध्येच एखादेवेळस शहामृगासारखी मान वर करुन बघायचे आणि लगेच शहामृगाची मान खाली. आईचा तर प्रश्नच नव्हता.ती स्वयंघरात मग्न एकदोन वेळेला तेजोमयीनं तिला हे संचलन बघण्याठी आवाज दिला.एकदा ती दिवाणखान्यात डोकावून गेली.

अगं,हे दरवर्षीच असतं.पुढच्यावर्षी बघता येईलना, असं बोलून ती स्वयंपाकघरात निघून गेली.

या मोठ्यांच काही कळत नाही बुवा. तेजोमयी मनात म्हणाली. प्रजासत्ताकाचं महत्वं यांना शिकवलं की नाही यांच्या शिक्षकांनी, अशीच शंका येते,असा एक विचार तेजोमयीचा मनात आला आणि ती खुदकन हसली. त्या हसण्यानं बाबांचं पेपरमधील लक्ष विचलित झालं.

काय गं, हसण्यासारखं काही घडला या संचलनात,बाबांनी तेजोमयीस विचारलं.

त्यासाठी ते तुम्ही बघायला हवं की नाही बाबा..

अगं ते दरवर्षीच असतं.पुढच्या वर्षी बघू..बाबा म्हणाले. आईही अशीच म्हणाली होती.बाबांच्या या बोलण्याचा तेजोमयीस राग आला.त्यामुळे तिने टीव्ही बंद केला. काही तरी भलतच घडतय हे लक्षात आल्यानं अलेक्झांडर सावध झाला आणि त्याने कान टवकारले. टीव्हीचा आवाज ऐकूनासा झाल्याने आई स्वयंपाकघरातून बाहेर आली. बाबांनीही पेपर बाजूला ठेवला. टीव्ही कां बंद केला, दोघांनिही एकाच वेळी तेजोमयीस विचारलं.

तेजोमयीनं मान फिरवली.

बाईसाहेबांना राग आलेला दिसतोय, बाबा तिच्या जवळ जात म्हणाले.

रागोबा काय बुवा, एका जणाच्या नाकावरच मुक्कामाला असतोतेजोयमीच नाक हलकसं ओढत आई म्हणाली.

आम्ही संचलन बघत नाही याचा राग आला होय तुला,बाबांनी विचारलं.

होय आला..तेजोमयी गुस्स्यात म्हणाली.

हात्तिच्या.. बस एव्हढचं..आई उत्सुर्फतपणे म्हणाली.

हात्तीच्या काय आई, मला सांग आत्ता तुझ्या आवडीची मालिका आणि बाबांची एखादी क्रिकेट मॅच असती तर तुम्ही दोघांनी तुमच्या तुमच्या आवडीचे कार्यक्रम हातचं सारं सोडून बघितले नसते का..तेजोमयीनं विचारलं.

आँ,बाबा आणि आईने एकाच वेळी आँ फाकला. आता काहीतरी घडणार हे अलेक्झांडरच्या लक्षात आलं.उत्सुकतेनं तिघांकडे बघू लागला.

यात रागवण्यासारखं काय….

बाबा, तुम्हीच सांगताना की आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला,प्रजासत्ताक व्हायला खूप कष्ट करावे लागले..

खरय ना ते..

मग इतक्या कष्टानं प्रजासत्ताक झालेल्या आपल्या देशानं कशी प्रगती केली,आपला देश कसा सामर्थ्यशाली झाला हे घरबसल्या बघण्याच कष्ट, तुम्हाला घ्यावे वाटत नाही.

आईने पुन्हा एकदा आँ फासला. बाबांना तेजोयमीचा त्रागा कळला. तिला ते सॉरी म्हणाले. तेजोमयीच्या चेहऱ्यावर हसू परतलं.

या संचलनात दिसणारी आपल्या देशाची प्रगती बघून मनात जे रोमांच उठतात,त्याचा आनंद मोठा की मालिकांमध्ये तेच तेच बघण्याचा आंनद मोठा..तेजोमयीनं आईला विचारलं..

आईनं कान पकडला. आईलाही चूक कळली असावी. तेजोमयी तिला बिलगली आणि छानशी पप्पी दिली.

सुरेश वांदिले

 

 

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!