चुकिची कबूली
चुकिची कबूली
तेजोमयीस टीव्हीवर क्रिकेटचे सामने बघायला
आवडायचे. त्यामुळे कितीही उशीर झाला तरी ती सामन्यांचा आनंद घ्यायचीच. भारत आणि इंग्लंड संघातील १९ वर्षाखालील एक
दिवसीय क्रिकेट जागतिक स्पर्धेतील अंतिम सामनाच्या आदल्या दिवशीच तेजोमयीनं जाहीर
केलं की ती हा सामना पूर्ण बघणार. दुसऱ्या दिवशी सुटी असल्यानं सकाळी उशिरा उठलं
तरी चालणार होतं. त्यामुळे आईबाबांनी बाबांनी तिला सामना बघण्याची परवानगी दिली.
दुसऱ्या दिवशी सामना सुरु झाला तेव्हापासून तेजोमयी टीव्हीला खिळून
बसले.तिच्यासोबत आई बाबाही सामन्याचा आनंद घेऊ लागले. भारताची बँटिंग संपली.
दोघांचे डोळे पेंगुळायला लागले.ते बघून तेजोमयीने दोघांनाही झोपण्यासा सांगितलं.
बघून झालं की टीव्ही,लाईट बंद करशील आठवणीनं, आईने झोपायला जाता जाता तेजोमयीला बजावलं.
हो गं बाई ,काळजी करु नकोस. ती म्हणाली. आई- बाबांनी तिला
गुडनाईट केलं नि ते झोपायला गेले.
तेजोमयी मॅच बघण्यात दंग आली. बघता बघता
डोळा कधी लागला हे तिला कळलं नाही. मध्यरात्रींनतर बाबांना जाग आली. टीव्हीचा आवाज
ऐकून ते बैठकीच्या खोलित आले. तेजोमयी झोपलेली आणि टीव्ही सुरु असलेला असं दृष्य
त्यांना दिसलं. त्यांनी टीव्ही बंद केला. दिवे विझवले. तेजोमयीच्या अंगावर पांघरुन
टाकलं नि ते आपल्या खोलित झोपायला गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी तेजोमयी उठल्यावर आई आणि
बाबांनी टीव्ही सुरु राहण्याचा विषय काढला.
तेजोमयी पटकन म्हणाली,मी तर बंद केला होता.
बाबांना हसू फुटलं. आईचा चेहरा रागाने लाल
झाला.
अगं,तू
तशीच झोपली होतीस.बाबा म्हणाले.
मी
तर टीव्ही बंद केला होता. तेजोमयी पुन्हा म्हणाली.
अगं मी रात्री टीव्ही बंद केला. बाबा
पुन्हा म्हणाले.
पण,
बाबा मी टीव्ही बंद केला होता. रिमोट माझ्या बाजूला होता. त्यावर हात पडून
कदाचित..
कदाचित टीव्ही सुरु झाला
असच तुला म्हणायच ना. एक खोटं बोललं की ते
खरं आहे हे सिध्द करण्यासाठी पुन्हा पुन्हा खोटं बोलावं लागतं. आई कडाडली.
तिच्या रागाचा कडेलोट होण्याआधी परिस्थिती
शांत करायला हवी हे बाबांनी ओळखलं.
हे बघ बाळ, चूक झाली तर ती कबूल केली ना तर काहीच बिघडत नाही.खोटं
बोलण्याने सगळयांना त्रास होतो. नाही का गं. असं म्हणून त्यांनी आईकडे बघितलं.
सॉरी बाबा.तेजोमयी म्हणाली.
यापुढे खोट बोलायचं नाही हे जस खरं तसचं
कबूल केलेली चूक पुन्हा करायची नाही हे त्याहून खरं...
हो बाबा. असं म्हणून तेजोमयी पप्पांना बिलगली,आईकडे वळून तिलाही सॉरी म्हंटलं.
सुरेश वांदिले
0000
Comments
Post a Comment