संकल्पाचा अर्थ


 

संकल्पाचा अर्थ

नवं वर्षं आलं की, यूंव करणार, त्यूंव करणार असं तेजोमयी करायची.

जानेवारीस सकाळी बाबांना आपली संकल्प यादी दाखवायची. हे करणार, ते करणार अशा दहाबारा गोष्टी त्यात असायच्या. सुरुवातीचे काही दिवस खूप उत्साहाने ती या यादीतील संकल्पाप्रमाणे वागायची सुध्दा. पण हळू हळू तिचा उत्साह कमी व्हायचा आणि महिन्याभरातच  संकल्प यादी अडगळीत जायची. बाबा तिला अधूनमधून आठवण करुन द्यायचा, पण आज करते उद्या करते असं करत ती टाळाटाळ करायची.

यंदाच्या जानेवारीला तेजोयमीनं उत्साहानं,गेल्या वर्षी सारखीच १०-१२ गोष्टिंचा समावेश असणारी संकल्प यादी बाबांना दाखवली.बाबांनी ती बघताच फाडून टाकली.

 तेजोयमीला वाईट वाटलं. ती फुरगुंठून बसली. या दोघांमध्ये तणाव आल्याचं अलेक्झांडरला कळलं. अशावेळी डोळे मिटून पण कान उघडे ठेऊन काय घडतय याकडे लक्ष तो ठेऊन असायचा.

तेजोमयी गाल फुगवून दुसरीकडेच बघू लागल्यावर, झोपेचे नाटक करणाऱ्या अलेक्झांडरचं कान हलकसं पिरगाळत बाबा त्याला म्हणाले, तूच समजावरे बाबा तिलाआपल्याला सारं काही कळलय, असं समजून अलेक्झांडर आळोखे-पिळोखे देत उठला आणि तेजोमयी जवळ जाउुन तिच्याशी लाडीगोडी करु लागला.

त्यांना, सांग माझी कट्टी म्हणून. असं बोलून तेजोमयीने तिसरीकडेच मान वळवली.अशा वेळी आई जिथे कुठे असेल,तिथे जाऊन अलेक्झांडर तिचा पदर ओढत घेऊन यायचा.आताही त्याने तसेच केले.

आई दिवाणखान्यात आल्यावर तिच्या लक्षात आलं की बाप लेकिंच काहीतरी बिनसलय. तिने बाबांना विचारल, तेव्हा बाबांनी घडलेला प्रकार सांगितला.

अहो, मग तुम्ही कशाला तिची संकल्प यादी बघताच फाडून टाकली.आई म्हणाली. आई आपली बाजू घेतेय हे लक्षात येताच तेजोमयी आईकडे वळली..

फुगाबाई, तुला वाईट कशाचं वाटलं ते सांगना जरा,बाबांनी संधी साधली.

माझी यादी कां फाडलीस तू.. मी नाही बोलायची तुझ्याशी.

बाईसाहेब,असं कां केलं ते समजून घ्या ना

हे मात्र बरोबर….काय रे ठोंब्या. अलेक्झांडरकडे बघत आई म्हणाली.त्याने मान हलवली..

बघ, त्याला कळलय..

मग त्यालाच समजावून सांगाना..तेजोयमीचा राग काही जाईना

मग बाबा अलेक्झांडरकडे बघून पण तेजोमयीस उद्देशून म्हणाले,

     अलेक्झू, तिला सांग की संकल्प करायचे ते करण्यासाठी,केवळ कागदावर लिहिण्यासाठी नाही.संकल्प कागदावरच राहिले तर काही साध्य होत नाही.कागदावरचं मनात उतरवायचं नि मग उत्साहानं, जे ठरवलं ते दररोज करायचं.बाबांच्या या बोलण्यावर अलेक्झांडरने मान हलवली.

बस झालं तुम्हा तिघांचं हे नाटक नाटक खेळणं.आई बाबांकडे बघत म्हणाली.

तेजोमयीला आपल्या कुशीत घेऊन ती तिच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणाली,

हे बघ तेजो,तुझ्या रागाला पळवून लाव बघू,गेल्या वर्षी तू इंग्रजी शब्द पाठ करण्याचा संकल्प केला होतास ना,तो काही पूर्ण झाला नाही..तोच यंदा पूर्ण करना.एक ना धड भाराभार चिंध्या असं करण्याऐवजी तू हाच एकमेव संकल्प पूर्ण केलास ना की बघ तू ३६५ इंग्रजी शब्दांनी श्रीमंत होशील. इंग्रजी बोलणं अवघड जाणार नाही. निबंध लिहिताना नवे नवे शब्द वापरता येतील.ते बघून तुझे सर कौतुक करतील तुझं. आईनं तेजोमयीस समजावलं.ते तिला पटलं. यंदा एकच संकल्प,दररोज एक शब्द पाठ करण्याचा..असं तिने जाहीर केलं.बाबांनी तिला जवळ घेऊन तिची पप्पी घेतली.

अलेक्झांडरच्या डोळयात आनंदी भाव उमटले.

सुरेश वांदिले

 

 

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!