मास्क मार्शल
मास्क मार्शल
कॉलनीतले
पिंटू,मिंटू,चिंटू
आणि छिंटू
हे चार
पक्के मित्र. एकाच
वर्गात शिकणारे. आजूबाजूच्या सदनिकेत राहणारे. मौज-मस्ती-दंगा-खेळ
आणि अभ्यास
एकत्र करणारे. सर्वच
बाबतीत आघाडीवर
असणारे. कोरोनामुळे
मात्र या
चौघांच्या सगळयाच
हालचालीवर बंधनं
आलित.गप्पा-टप्पा-कागाळ्या-उखाळ्या-पाखाळ्या, सारं
काही स्मार्ट
फोनच्या मदतीनं.
स्मार्ट
फोन वापरण्यात
चौघेही तरबेज
झालीत. झूम
मीटिंग कसं
करायचं हे
त्यांनी शिकून
घेतलं.काका-काकू,आजी
आजोबांच्या ऑनलाइन
मिटिंग त्यांनी
घेतल्या. घरात
बंदिस्त राहूनही
कॉलनीतली मंडळी
एकमेकांच्या घरी
अशी पोहचत
राहिली.
मार्चमध्ये
आलेला करोना, आता
जाईल..उद्या
जाईल असं
म्हणता म्हणता
आपला मुक्काम
डिसेंबरपर्यंत लांबवला.हा
नकोसा पाहुणा
नव्या वर्षात
तरी जाणार
की नाही
याची शंका
यायला लागली.
पिंटू,मिंटू,चिंटू
आणि छिंटूने
ठरवलं की
आपणच या
करोनाच्या पाठीमागे
लागून त्याला
पळता भूई
थोडे करु
या की..परवा
ही चौकडी
कॉलनीतल्या आंब्याच्या
झाडाखाली भेटली
तेव्हा ही
चर्चा झाली.
अरे, चिंट्या, एखादयाला
पळवायचं म्हंटल
की तो
आधी दिसायला
हवा की
नाही. उंदराला
मांजर दिसते
तेव्हाच तो
पळतो की
नाही.पिंटू
म्हणाला.
हा कोरोना
उंदिर आहे
की मांजर
आहे की
साप आहे
की मुंगूस
आहे हेच
कळत नाही.
पण हा
कुणी असलेना
त्याला आपण
भ्यायलाच नको..जो
भ्याला तो
गेला, अशी
म्हणच आहे
ना..
मग काय
करायचं..
नव्या वर्षात
कसं बिनधास्त
राहयाचं..घाबरायचं
नाही..
म्हणजे काय
करायचं..
हा मास्क
आहे ना, त्यानेच
भीती वाढते.तो
घातला की
करोनाचं भूत
आठवू लागतं.हे
भूत उरवण्यासाठी मास्क फेकून
द्यायला हवा..आता
तर काय
लस पण
आलीय
अरे, बाबा
असं काही
करायचं नाही
हं..हा
कोरोना म्हणजे
दबा धरुन
बसलेला कोल्हा
आहे. मास्क
घालून आणि
हातातोंडाची स्वच्छता
पाळून आपण
त्याचा जीव
बराच कासावीस
केलाय की…आतापर्यंत
कळ काढली
आता नव्या
वर्षात आणखी
काही महिने
कळ काढू..
छिटूचं
म्हणनं टोळीला
पटलं..कॉलनीतली
मोठी मंडळीसुध्दा आज काल
मास्कविनाच फिरायला
लागल्याचं त्यांनी
बघितलं होतं. मास्कविना
फिरणारी ही
वडीलधारी मंडळी, करोना
विषाणू कॉलनीत
घेऊन आली
तर गेलो
आपण सारेच
बाराच्या भावात..पिंटूने
भीती व्यक्त
केली.
नव्या वर्षात
आपण मास्क
मार्शल म्हणून
काम केलं
तर रे..
म्हणजे काय..
अरे, आपण
काही दिवस
कॉलनीच्या गेटवर
पहारच देऊ
आळीपाळीने. जे
काका काकू
मास्क शिवाय
बाहेर जातील
किंवा बाहेरुन
येतील, त्यांना
टोकत राहू..आता
मास्क स्वस्त
झाल्याने आपल्या
खाऊच्या पैशातून
मास्क घेऊन
ठेऊ.. मास्क
विसरलेल्यांना देत
राहू..काहीतर
परिणाम नाही
का होणार..लाजेकाजेस्तव ही मंडळी
नाही का
मास्क घालणार..
वा S वा
सर्वजण एका
सुरात म्हणाले..टोळीने
नव्या वर्षात
मास्क मार्शल
होण्याचा निर्धार
केला..कॉलनीच्या
व्हॉटस्ॲप ग्रुपवरुन
त्यांनी तसं
जाहीरही करुन
टाकलं..
००००
पिंटू,मिंटू,चिंटू
आणि छिंटू
टोळीने पाठवलेला
मास्क मार्शल
कां आणि
कशासाठीचा व्हॉटसॲप
संदेशामुळे थोडीफार
खळबळ माजलीच.आगावू
होतीच आता
अतिशहाणीही झाली
टोळी,अशा
प्रकारच्या प्रतिक्रिया काहींनी लिहिल्या.काहींनी
तुम्ही कोण,आम्ही
आमच्या मनाचे
राजे अशा
आशयाचं उत्तर
दिलं.काहिंनी
आवरा आपल्या
कार्ट्यांना,असं
तिखट बोल
पिंटू,मिंटू,चिंटू
आणि छिंटूच्या
आईबाबांना ऐकवलं.याचा
नाही म्हणायला
थोडा फार
परिणाम चौघांच्याही आईबाबांवर झाला.प्रत्येकाला त्यांच्या घरी
बोलणं खावं
लागलं.नसते
उपदव्याप करण्यापेक्षा शिष्यवृत्ती परीक्षेचं
यूट्यूबरील व्हीडिओ
बघून वेळ
सत्कर्णी लावा
असं सांगितलं
गेलं.हे
पण करु
आणि ते
पण करुच
करु,असा
निर्धारच टोळीनं
केला.
ही टोळी
जेव्हा काही
ठरवते तेव्हा
माघार घेत
नाही. हे
कॉलनीतल्या बहुतेकांना
ठाऊक होतं.त्यामुळे
नाही म्हंटल
तरी बऱ्याच
जणांनी त्यांचा
धसका घेतला..मात्र
हा उत्साह फार काळ
काही टिकणार
नाही,असही
बऱ्याच जणांना
वाटलं.१
जानेवारीला सकाळी
सकाळीच टोळी
कॉलनीच्या दारात
दत्त म्हणून
उभी राहिली.
मास्क विना
कॉलनीच्या बाहेर
जाऊ पाहणाऱ्या
देशपांडे काका
आणि वानखेडे
काकांना चौघांनी
अडवलंच..
पिंटू त्यांना
मास्क दिला
मला नाही
घालायचा…आतापर्यंत
घालतच होतो
की..जुने
वर्षं गेलं..सोबत
त्याने कोरोनालाही
नेलं..वानखेडे
काका रागावून
म्हणाले..
ते काही
नाही तुम्हाला
घालावचं लागेल..
जबरदस्ती आहे
की काय…पोलिंसांकडे तक्रार करीन.देशपांडे
काका म्हणाले
चौघेही हसले.
काय रे
गधड्यांनो मी
विनोद नाही
केला..हॅ
हॅ हॅ
करायला..
अहो काका,पोलिसात
तुम्ही आमची
तक्रार केली
तर आधी
तुम्हालाच दंड
करतील,मास्क
नाही घातला
म्हणून..आमचं
कौतुक करतील
मास्क लावला
म्हणून..एवढयात
जोशी काका
तिथे आले.त्यांनी
तोंड झाकेल
असाच मास्क
घातला होता.नाक
उघडच होतं.कावळे
काका बाहेरुन
आले.त्यांनी
तर फक्त
गळयातच मासक
लटकवला होता.एखादया
हारासारखा.या
दोघांनांही टोळीनं
टोकलच.बघता
बघता गर्दी
वाढली.टोळीचे
आईबाबाही तिथे
आले.इतरही
मंडळी आली.काहींनी
बाचाबाची सुरु
केली.भांडण
होते की
अशी परिस्थिती
निर्माण झाली.त्याचवेळी
बाजूच्या रस्त्यावरुन मोटर सायकलवरुन
जात असलेल्या
इंस्पेक्टर लहाने
ही गर्दी
बघून थांबले
आणि आत
आले.त्यांना
बघताच बाचाबाची
थांबली.
त्यांनी उत्सुकतेनं
काय घडलय
ते विचारलं.कुणीही
काही सांगेना.तेव्हा
छिंटूनं धिटपणे
सारं काही
सांगून टाकलं.
देशपांडे काका
हळूच म्हणाले,हा
आगावूपणाच नाही
का या
शहाण्यांचा….
लहानेंच्या लक्षात
सगळा प्रकार
आला.त्यांनी
मग सर्व
सूत्र हाती
घेतली.त्यांनी
आबांच्या झाडाजवळ
सर्वांना एकत्र
केलं.तिथे
असलेल्या चबुतऱ्यावर
ते उभे
राहिले.सर्वांना
उद्देशून ते
म्हणाले
ही मुलं
नक्कीच आगावूपणा
करीत आहेत.पण
ते त्यांचं
वयच आहे
की.मात्र
तुम्ही जे
करताहात ते
काय बरं..
म्हणजे..वानखेडे
काकांनी आश्चर्यानं
विचारलं
म्हणजे असं
साहेब,की
तुम्ही मास्क
न लावून
जे काही
करता आहात
ते काय..तो
मूर्खपणा आहे
असं मी
म्हंटलं तर..मोठ्यांना
असा मूर्खपणा
चालतो का…
काहीतरीच काय
इन्स्पेक्टर साहेब..देशपांडे
काकांनी नाराजी
व्यक्त केली..
हे बघा
मंडळी,नवं
वर्ष आलं
तरी करोना
विषाणू गेला
असा त्याचा
अर्थ नाही
ना..तो
कुणाच्याही थुंकीतून
इकडे तिकडे
जाऊ शकतो..आतापर्यंत
जे झालं
ते झालं..पुढचे
काही दिवस
महत्वाचे…ही
पोर सांगतात
तसा हा
विषाणू लपून
बसलाय…मास्क
ही पहिली
ढाल संरक्षणाची..दुसरी
ढाल लसीची..ती तुम्ही घतलीच असणार. तरी सुध्दा सावधगिरी
बाळगायचीच असं सर्वच डॉक्टर सांगताहेत ना..मग त्यांचं नको का
ऐकायला....एकदा
विषाणू या
नाकातून त्या
नाकात, या
तोंडातून त्या
तोंडात शिरला
तर मग..तुम्हाला
त्रास,घरी
आजोबा आजी
असतील तर
त्यांना अधिकच
त्रास..नवीन
वर्ष मजेत
आनंदात घालवायचं
असेल तर
तुम्ही सुध्दा
मास्क घालण्याचा
पक्का निर्धार
केलाच पाहिजे..आणि
या पोरांचं
ऐकलं पाहिजे..
बरोबर ना..जोशीकाकांडे बघत लहाने
म्हणाले……मुलं
ही देवाघरची
फुलं असं
कोण म्हणालं
होतं,त्यांनी
गर्दीला विचारलं,कुणीतरी
म्हणाल साने
गुरुजी..
ते थोर
होते की
नाही..
होते..
मग,त्यांनी
सांगितल्याप्रमाणे या
देवाघरच्या फुलांचं
ऐकण्यात शहाणपणा
आहे की
आपल्या हेकखोरपणा
करण्यात शहाणपणा…
लहानेंनी बाउंसरच
टाकला..यावर
काही क्षण
कुणीही बोललं
नाही.पिनड्रॉप
शांतता निर्माण
झाली…
या शांततेने
माझ्या प्रश्नाचं
उत्तर मिळालं.. लहाने
म्हणाले.त्यांनी
सर्वांना नव्या
वर्षाच्या शुभेच्छा
दिल्या.आणि
ते निघून
गेले..देवा
घरच्या फुलांचं
ऐकण्यातच आपलं
हित असल्याचं
बहुतेकांच्या लक्षात
आलं…
सुरेश
वांदिले
Comments
Post a Comment